#GaDiMadgulkar100 #गदिमाडगूळकर१००
#MajroohSultanpuri100
Today October 1 2019 is 100th birth anniversary of G D Madgulkar and Majrooh Sultanpuri
मी ऑक्टोबर १५, २०१६ रोजी ह्या ब्लॉगवरील
पोस्ट मध्ये लिहले होते:
"...
अशोक शहाणे म्हणतात:
"...परिंदे मेरे साथ गाने लगे है।
इशारोसे बादल बुलाने लगे है।
हंसी देखकर मुस्कराने लगे है।
कदम अब मेरे डगमगाने लगे है।
ह्या ओळी हिंदी सिनेमातल्या एका गाण्यातल्या आहेत. आणि हा अपवाद नव्हे.
हिंदी सिनेमात अशा कितीतरी आश्चर्यजनक गोष्टी सर्रास असतात..." (पृष्ठ २०, 'नपेक्षा', १९६३/२००५/२००८)
[गीतकार: केदार शर्मा, 'हमारी याद आएगी', १९६१]
माझ्यामते शैलेंद्र, साहिर लुधियानवी, मजरुह सुल्तानपुरी, नीरज
वगैरे लोकांनी हिंदी सिनेमासाठी गाणी लिहिता लिहिता भारतातील काही
सर्वोत्कृष्ट साहित्य लिहले आहे. त्यांची लोकप्रियता तर संतकवींसारखी आहे
पण त्यांचा गौरव साहित्यकार म्हणून जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही.
उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णींच्या असंख्य पत्रातील एका पत्रात ते शैलेंद्र यांना ग. दि. माडगूळकरांच्या तुलनेत कमी लेखताना दिसतात. शैलेंद्र हे जींएच्या योग्यतेचे साहित्यिक होते, गदिमांपेक्षा काकणभर चांगले गीतकार होते आणि जींएच्या पेक्षा हजारो-लाखो पटीने जास्त लोकप्रिय होते आणि अजूनही आहेत.
...."
एक कला म्हणून हिंदी सिनेमाचे महत्व समजलेला एक मोठा मराठी साहित्यिक म्हणजे - कै. भाऊ पाध्ये... पण त्यांची हिंदी सिनेमावरची पुस्तके (उदा : मधुबाला , गुरुदत्त) मला आवडत नाहीत...