"येक हात हालविती। येक पाय हालविती।
येक दांत खाती। कर्कराटें॥
येकांचीं वस्त्रें निघोनि गेलीं। ते नागवींच लोळों लागलीं।
येकांचीं मुंडासीं गडबडलीं। चहुंकडे॥
येक निजेलीं अव्यावेस्तें। येक दिसती जैसीं प्रेते।
दांत पसरुनी जैसीं भूतें। वाईट दिसती॥"...
‘येक हाका मारूं लागले। येक बोंबलित उठिले।
येक वचकोन राहिले। आपुले ठाईं॥
येक क्षणक्षणा खुरडती। येक डोई खाजविती।
येक कढों लागती। सावकास॥
येकाच्या लाळा गळाल्या। येकाच्या पिका सांडल्या।
येकीं लघुशंका केल्या। सावकास॥
येक राउत सोडिती। येक कर्पट ढेंकर देती।
येक खांकरुनी थुंकिती। भलतीकडे॥
येक हागती येक वोकिती। येक खोंकिती येक सिंकिती।
येक ते पाणी मागती। निदसुऱ्या स्वरें॥’
(सौजन्य: समर्थ साधक)
आता 'येकाच्या लाळा गळाल्या', 'येकांचीं वस्त्रें निघोनि गेलीं। ते नागवींच लोळों लागलीं।' 'दांत पसरुनी जैसीं भूतें।'.... वगैरे माझ्या किंवा होमर सिम्पसन यांच्या बाबतीत खरे असेल....
courtesy: 20th Television and creators and developers of "The Simpsons"
... पण झोपणे काहीवेळा सुंदरही दिसू शकते...