Birds glide their old remembered way,
Dive in red-gold setting tide
And write dark alphabets on evening sky;
Whether an epitaph, chorus or strange augury -
little man you only hope to know!"
("सांजशकुन", १९७५ चा एपिग्राफ)
याचा मी केलेला अनुवाद:
"ह्या विस्मृतीत गेलेल्या संगमरवरी स्तंभांवरून
पक्षी घेतात त्यांची जुनी आठवणीतील संथ भरारी,
सूर मारतात तांबड्या-सुवर्ण अस्ताला निघालेल्या लाटेत
आणि लिहतात गूढ बाराखडी संध्याकाळच्या आकाशावर;
ते आहेत समाधीवरील शब्द, पालुपद का अपरिचित प्रारब्ध -
खुज्या माणसा ते समजायची तू फक्त आशा धरू शकतोस!"
"
(कृतज्ञता : कै जीए यांच्या वाङ्मयाचे कॉपीराईट होल्डर्स)
ही कविता जीए यांचीच आहे!
"जीएंची पत्रवेळा" मध्ये मे ११ १९७५ रोजी जीए ग्रेस ना लिहतात (पृष्ठ ५६, ५७) :
"परवा एका जुन्या डायरीत लिहून ठेवलेल्या ओळी पुन्हा दृष्टीस पडल्या. अगदी अचानक. मी त्या विसरूनही गेलो होतो.... हे मराठीत जसेच्या तसे आणता येईल ? बहुदा नाही. पण बघू...".
त्या ओळी म्हणजे वरील कविता.
आता दुसरा प्रश्न पडला, या कवितेला अनुरूप, साजेसे असे चित्र मिळेल का? मिळाले...