चपलेने मारणे हा मराठीत फार लोकप्रिय वाकप्रचार आहे....नुसता वाकप्रचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृती सुद्धा कधीकधी मोठ्या मर्दुमकीचा भाग आहे...अलिकडच्या काळात आपण त्याचे प्रात्यक्षिक नॅशनल टेलिव्हिजन वर, व्हाट्सऍपवर खूप वेळा पहिले...कितीवेळा फटके मारले, कोणत्या ब्रँडची चप्पल होती हेही चर्चेचे विषय होऊ शकतात...पण चप्पलने मारून कोणी मेल्याचे अजून ऐकले नाही...
... पण चप्पल मुळे कोणी मरू शकते का?
'दी न्यू यॉर्कर' (The New Yorker) साठी ज्यांनी ज्यांनी आजवर व्यंगचित्रे काढली आहेत त्यातील कितीतरी जणांना मी ग्रेट म्हणतो कारण ते ग्रेटच आहेत. मग विशेषणांची काटकसर का? काहीजण महान आहेत. ती लिस्ट थोडी लहान आहे.
त्या ग्रेट लिस्ट मधल एक प्रमुख नाव - चोन डे.
त्यांची काही चित्रे मी ह्यापूर्वी ह्या ब्लॉग वर दिली आहेत. पण खालील चित्र म्हणजे त्यांचे एक अप्रतिम चित्र आहे.
इ-कॉमर्सच्या आधीच्या दिवसातील बायकांच्या खरेदीवर मराठीत शेकडो चित्रे आजवर प्रसिद्ध झाली आहेत पण एक तरी चित्र ह्याच्या जवळ तरी जाते का पहा...
from The New Yorker, December 14 1946
I hate to do this....but just look closer at what the shoe salesman is pulling out of a shoebox. One can use the idea for say a sari salesman in India but the graphic may not turn out as smooth as this because the gun is shown looking similar to the dark colour shoe lying there creating a great camouflage....I feel so fortunate to have even seen this picture....