आज बा सी मर्ढेकरांना जाऊन ६८ वर्षें झाली. माझ्या बाबतीतमर्ढेकरांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मला कवी म्हणून पहिले ते आठवतात.
आम्ही डिसेंबर २०२३ मध्ये कोल्हापूर जवळच्या सिद्धगिरी ग्रामजीवन म्युझियम (कणेरी मठ) मध्ये गेलो होतो. तिथले सोबतचे दृश्य पाहून मर्ढेकर आठवले.
"अजून येतो वास फुलांना
अजून माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते.'
..."
(३२, पृष्ठ १०२, मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)