दिलीप चित्रे: "तुकाराम वाण्या, भेंचोद, तू खेचलंस मला मराठी भाषेच्या दलदलीत." (पृष्ठ : सोळा, प्रस्तावना, 'पुन्हा तुकराम', १९९०/१९९५)
मी: "दिलीप चित्र्या, भेंचोद, तू खेचलस मला तुकारामाच्या दलदलीत."
दुर्गा भागवत: "... दिलीप चित्रे सारखा माणूस देशीपरदेशी खूप हिंडून आला. पण आता तुकारामाकडेच परत आलाय. तुकारामालाच धरून बसलाय. आणि अगदी प्रगल्भ तऱ्हेन धरून बसलाय. त्यानं आता तुकारामाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलंय. आता सगळं जग तुकाराम वाचेल. ही फार मोठी देणगी त्यानं आपल्याला दिलेली आहे..."
(पृष्ठ ५६, 'ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी', ले: प्रतिभा रानडे, १९९८
मला त्यांची सर्वात आवडलेली कलाकृती ही आहे:
एक पलड़े में नपुंसकता,
एक पलड़े में पौरुष,
और ठीक तराजू के कांटे पर,
अर्ध सत्य
ज्यावेळी चित्रे वारले त्यावेळी मी ओळीने सात पोस्ट त्यांच्यावर ह्या ब्लॉगवर लिहल्या होत्या. डिसेंबर १६ २००९ ला मी हे लिहल:
Chitre chooses this poem of Tukaram for the last section "Farewell to Being" (असण्याचा निरोप) in his book "Punha Tukaram" (पुन्हा तुकाराम, पृष्ठ १९१).
सकळ ही माझी बोळवण करा
परतोनि घरा जावे तुम्ही
कर्मधर्में तुम्हा असावे कल्याण
घ्या माझें वचन आशीर्वाद
वाढवूनि दिलो एकाचिये हाती
सकळ निश्चिंती जाली तेथे
आतां मज जाणे प्राणेश्वरासवे
माझिया भावे अनुसरलों
वाढविता लोभ होईल उसीर ।
अवघीच स्थिर करा ठायी
धर्म अर्थ काम जाला एके ठायी
मेळविला जिही हाता हात
तुका म्हणे आतां जाली हे चि भेटी
उरल्या त्या गोष्टी बोलावया (१६०३)
Following picture of great Saul Steinberg has appeared on this blog before.
Chitre painting the image of his great forebear, Tukaram, complete with a horn in his mouth, and Tukaram in turn places a wreath on Chitre's head for a job well done!
Artist: Saul Steinberg, The New Yorker, January 6 1962