Today July 10 2017 is 94th birth anniversary of G A Kulkarni (जी. ए. कुलकर्णी).
(नास्तिक कार्ल मार्क्सना विष्णुदास म्हणायला काय मजा येतीय!)
"...मी मॅट्रिकला असताना एकदा शिरसी नावाच्या गावी गेलो होतो. तेथे माझ्या दुपटीहून थोडी जास्त वयाची स्त्री दिसली होती. ती सुंदर होती असे म्हणणे understatement होईल. ती देदीप्यमान होती. तिने लग्न मात्र एका काळ्या सामान्य माणसाशी केले. तो अत्यंत बुद्धिमान होता व विशेष म्हणजे त्याला sense of humour फार आकर्षक होता. तो कुठेही गेला, तर 'मी रमाचा नवरा' अशी ओळख करून देत असे व मग मोठ्याने हसून ''असे सांगितल्याने ओळख पटते. रमालाच ओळखणारे लोक जास्त!" हा प्रेमविवाह होता आणि तो विवाह दोघांनाही अतिशय सुखाचा झाला याचे लोकांना आश्चर्य वाटे... रमा नवऱ्याआधी वारली. नंतर त्याचे जीवन हबकल्यासारखेच झाले. त्याने नोकरी सोडली. थोडा पैसा होता खरा, पण तोही त्याने वापरला नाही. बंगळूरला त्याच्या भावाचा कसला तरी छोटा कारखाना होता. तेथे तो दिवसभर बसून असे म्हणे. आज रमा नाही, की विष्णुदास (हे त्याचे नाव) नाही. पण इतक्या वर्षानंतर ती आठवण झाली, की मोसमाबाहेर जाईची वेल उमलल्यासारखी वाटते. 'रमा' हे नाव आकर्षक नसावेच, पण त्याबद्दलची ही आठवण मात्र ओलसर सुगंधी आहे... "
(पृष्ठ १८९-१९०, 'जी एं. ची निवडक पत्रे', खंड १, १९९५)
हे जीएंच पत्र पुष्कळ वेळा वाचल असेन कारण जीए माझ 'कंफर्ट फूड' आहेत. पण खालील माहिती मात्र पहिल्यांदा २०१७साली वाचली आणि हे वरच पत्र आठवल....