""५५.
बोंड कपाशीचे फुटे,
उले वेचतांना ऊर;
आज होईल का गोड
माझ्या हाताची भाकर!
भरे भुइमूग-दाणा,
उपटतां स्तन हाले;
आज येतील का मोड
माझ्या वालांना चांगले!
वांगी झाली काळी-निळी,
काटा बोचे काढताना;
आज होतील का खुशी
माणसं गं जेवताना!"
(मर्ढेकरांची कविता, पृष्ठ ६४, १९५९-१९७७)
गाथा सप्तशतीच्या उत्कृष्ट परिक्षणात दुर्गाबाई भागवत मे १९३७ मध्ये लिहतात:
"... कपाशीची बोंडे तोडून शेतकरी त्यांचे ढीग करून ठेवीत होते. त्यापैकी स्वतःच्या पतीने गोळा केलेल्या बोंडावर वरचेवर हात फिरविताना एका मुलीच्या हातावर वारंवार रोमांच उभे राहत होते...." (पृष्ठ ९८, 'संस्कृतिसंचित', २०१५)
ही गाथा आहे ३५९ क्रमांकांची , 'बोण्ड ' नावाची, स आ जोगळेकर संपादित 'गाथा सप्तशती', १९५६ मध्ये.
त्याचा अनुवाद जोगळेकर असा करतात : "घरधन्याच्या मुलांने कापसाचा पुंजका देंठावरून काढून घेतला होता. तरी वधू त्या देंठावरून उगाच हात फिरवूं लागली. यामुळें तिचा हात थरथरला आणि पुलकित व स्वेदयुक्त झाला.)
'Village Bride' by Dijeshchander Dhar, Vishal Bharat Magazine 1940