Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Sunday, May 14, 2017
Wednesday, May 10, 2017
...पोळुं दे आंतून तीतें...Grief-berg Hits C V Joshi, R K Narayan, Mark Twain
"...
घेउं दे आघात तीतें
इंद्रिय-द्वारां जगाचे;
पोळुं दे आंतून तीतें
गा अतींद्रियार्थं आंचें.
..."
(#१, 'आणखी कांही कविता', १९५९/१९७७)
कै. जी ए कुलकर्णींचा पत्र व्यवहार वाचल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात रहाते ती म्हणजे त्यांनी अनुभवलेले अतिशय जवळच्या लोकांचे अनेक अकाली मृत्यू. जी एंच 'भाग्य' म्हणजे त्यांना त्यांच्या पत्नी वा मुलांचा मृत्यू पाहावा लागला नाही कारण ते जन्मभर अविवाहित राहिले. पण ज्या साहित्यिकांनी संसार केले त्यांचे काय? खालील पोस्ट मध्ये तीन उदाहरण आहेत: दोन देशी, एक विदेशी.
२०१७साली 'चिं.वि.: साहित्यातले अन् आठवणीतले' हे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक वाचायला सुरवात केली.
चिं.विंचे (C V Joshi) स्वतःचे लेख सोडून इतर बरेच लेख ('चिं.वि.: साहित्यातले') सामान्य दर्जाचे आहेत, जयंत नारळीकरांची (Jayant Narlikar) प्रस्तावना बरी आहे पण चिं.विंच्या नातेवाईकांनी लिहलेले लेख ('चिं.वि.: आठवणीतले') आयुष्याबद्दल खूप काही सांगून जातात आणि म्हणून ते लेख व दोन कृष्णधवल फोटो मला आवडले.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे - चिं. विं (१८९२-१९६३) आणि त्यांच्या पत्नींच्या (सरस्वती) (१९००- १९६६) जीवनावर पडलेली अपत्य मृत्यूंची गडद छाया. पुस्तक वाचून असे कळते कि त्यांना (बहुदा) एकूण तीन मुली आणि चार मुलगे झाले. त्यातील एक मुलगी आणि चारी मुलगे वारले. ही सगळी मुलं जन्मताच मृत्यू न पडता थोडी थोडी मोठी होऊन गेली. एक मुलगा- परशुराम- तर मॅट्रिक होऊन वयाच्या (बहुदा) पंधराव्या वर्षी, मे ४ १९४० रोजी, टायफॉइडने वारला. सगळ्यांनी आठवणींचे मोठे संचीत आईवडिलांसाठी तयार केले.
त्याकाळी मध्यमवर्गीय घरांतून मृत्यूचे थैमान होते हे खरे पण त्यांचे आर्थिंक आणि सामाजिक स्थान पाहता चिं विंचे कुटुंब खूप यात इतरांपेक्षा कितीतरी जास्त होरपळून निघाले.
पण विशेष म्हणजे या दोन्ही महान लेखकांची प्रतिभा वा बहुप्रसवता या टायफॉइडच्या उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या धक्क्याने आटल्याचे दिसत नाही. नारायण यांची सर्वोत्तम पुस्तके त्यानंतर आली. चिं. विंच्या लेखनाचा दर्जा सुद्धा किंचितही कमी झाल्याच जाणवत नाही. दोघांच्या लेखनावर आधारित लोकप्रिय चित्रपट निघाले, लोकप्रिय टीव्ही सीरिअल निघाल्या, दोघांची जवळ जवळ सर्व पुस्तके आज २०१७साली बाजारात मिळतात.
परशुराम चिं जोशीने वडिलांना शय्येवरून दोनदा सांगितले होते की त्याने गोविंद आपटेकडून (मित्र?) हॉकी स्टिक विकत घेण्यासाठी सहा आणे उधार घेतले आहेत आणि त्याचे ते पैसे परत द्यावेत. नोव्हेंबर २४ १९५८ रोजी चिं.विंनी ते पैसे परत केले. त्यासाठी त्यांनी जे (उत्कृष्ट हस्ताक्षरात) पत्र लिहले ते हे :
चिं.विंना त्या विषयाला पूर्णविराम द्यायचाय. परशुरामला दिलेला शब्द ठेवायचाय. परशुराम तर आयुष्यातून जाणारच नाहीये पण गोविंद आपटेंनी पैसे घेऊन टाकले तर किमान परशुरामची ती 'मेंदू बदडणारी' हॉकी स्टीक तरी जायची आशा आहे.
त्यांच्या पत्नी अपत्य शोकाबद्दल काय म्हणायच्या ते पहा: "... अग, दिवस इतरांचा असतो त्यांच्या समोर काय आपण आपले दुःख सांगत बसायचे, रात्र तर माझी असते, तेव्हा रोज रात्री मी माझ्या मुलांची आठवण काढते..."
डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार चिं.विंवर झाले. त्यात सर्वात महत्वाचे नाव म्हणजे : मार्क ट्वेन (१८३५-१९१०) कारण ट्वेनयांचा प्रभाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांवरांकडून सुद्धा चिं.विं पर्यंत पोचला असणार.
ट्वेनयांच्या जीवनातील शोक पहा... ते लिहतात:
Susy, Clara, Jean- ट्वेनयांच्या मुली.
सुझी (१८७२-१८९६)- स्पायनल मेनन्जायटिसने वारल्या - चिं. विंच्या सगळ्यात धाकट्या मुलीला - विद्युल्लता - हाच रोग झाला होता. ती वाचली पण मेंदूवर आयुष्यभर परिणाम झाला.
जीन (१८८०-१९०९)- फेफरे (seizure) येऊन घरातील बाथटब मध्ये बुडून वारल्या.
Saturday, May 06, 2017
पाहावा तो पावच पाव भाजून घेत होता/ तापल्या तव्यावर...Karl Marx Will Soon be 200
आजपासून कार्ल मार्क्स यांचा व्दिशताब्दी जयंती महोत्सव सुरु होतोय.
पुढच्या एका वर्षाला मार्क्स यांचा रंग या ब्लॉगला नक्कीच लागणार आहे कारण जरी त्यांच्या 'जाळा'वरती अनेक लोकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे- बऱ्याच वेळा विषारी- पाव भाजून , दुसऱ्याला खाऊ घातले असले तरी तो काही मार्क्स यांचा दोष नाही. मला त्यांच्या सारख्या आदर्शवादी लोकांच्या आणि, त्याहून जास्त, त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याबाबत फार मोठे कुतूहल वाटत आले आहे.
John Gray:
रा भा पाटणकर:
"... केवळ अनुभवाधिष्ठित ज्ञानावर विसंबायचे ठरविले तर असे लक्षात येते की, आपल्याला इंग्रज-भारतीय संबंधांच्या आर्थिक बाजूकडे विशेष लक्ष द्यायला हवे; म्हणून फुको किंवा सैद यांच्यापेक्षा मार्क्स हा जास्त चांगला मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे..."
जी ए कुलकर्णी:
"...तेव्हा अखेर प्रत्येकाला जाता जाता स्वतःचेच 'तत्वज्ञान' बनवत जगण्याखेरीज काही मार्ग दिसत नाही., कारण धर्माचे मूळ स्वरूप सदैव वैयक्तिकच राहणार. Institutionalized religion म्हणजे एक fraud आहे, किंवा स्काऊट, रोटरी, लायन चळवळीपेक्षा तिला महत्व नाही. ज्यावेळी धर्मच अपुरा पडू लागला तेव्हा काही जणांना Marxism सारखे secular तत्वज्ञान समाधान देऊ शकले. पण त्याबाबतही मी अगदी असाध्य कोडगा ठरतो. त्याच्याइतके अनाकर्षक, वैराण, हमाली तत्वज्ञान मला कुठे आढळले नाही...मार्क्सवादी माणसाचे चित्र काढायचे झाल्यास ठोकळ्यावर ठोकळे ठेवलेली आकृती काढली की पुरे..."
(पृष्ठ १७९, 'जी एंची निवडक पत्रे', खंड १, १९९५)
The following brilliant poem by Sadanand Rege (सदानंद रेगे) sums up what happened to Marx and Marxism eventually...
"पाहावा तो पावच पाव भाजून घेत होता
तापल्या तव्यावर..."
courtesy: the current copyright holders to the late Shri. Rege's work
Monday, May 01, 2017
महाराष्ट्र शिल्पी कलावंत निर्यात करत होता, आयात नव्हे!...Contribution of Maharashtra to Mahabalipuram
ऑक्टोबर २ २००७ ला मी 'Did Natives Create The Bountiful Art You See In Maharashtra?' ह्या विषयावर लिहले होते.
इतिहासकार जॉन के ७व्या शतकातील महाराष्ट्राबद्दल काय म्हणतात पहा.
Thursday, April 27, 2017
देवा रे देवा...एअरलिंगळी चावली....Scorpion On Board and In Heart
काय मी करू विंचु चावला..."
एकनाथांच्या उरलेल्या ओळीतून सगळ्यांना बरच काही शिकण्यासारखे आहे.
Sunday, April 23, 2017
मी बिस्वम्भर रॉय नाही पण... Satyajit Ray Died 25 Years Ago Today
Philip French:
"...Beside my working desk as I write is an autographed photograph of Ray and his friend Akira Kurosawa walking a couple of feet apart and deep in thought in front of the Taj Mahal. It was taken in the mid-70s during a trip to Agra from a film festival in New Delhi, on which I had the privilege to accompany them. It is a constant reminder to me of the heights to which cinema, the great new art of the 20th century, can aspire, and why writing serious criticism can be an honourable undertaking."
एप्रिल १९९२च्या शेवटी, रोजच किमान १२ तास लोड शेडींग असलेल (लोकांच्या घरी इनव्हर्टरच्या बरोबरीने छोटे डिझेल जनरेटर असत!), कलकत्ता आम्ही सोडल. रे वारल्यानंतर मी अंजुला म्हणालो आता कलकत्ता सोडायच दुःख कमी होईल कारण इथ आता रे नाहीत. त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी 'नंदन' मध्ये ठेवल होत. मी तेथुन दोन-तीन वेळा तरी चालत गेलो पण आत काही गेलो नाही.
त्यांच घर माझ्या ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर होत. बऱ्याचवेळा मी त्यांच्या घरावरून (बिशप लेफ्रॉय रोड , जे आता पर्यटक आकर्षण झालय म्हणे) चालत गेलो आहे, विचार करत की अत्ता रे आत असतील का, काय करत असतील!
ते गेल्यावरच्या आठवड्यात अंजु न आणि मी त्यांचे जवळ जवळ सगळे सिनेमा दूरदर्शन वर पहिल्यांदा पहिले. त्यांच्या एवढ्या मोठया कलाकाराच जाण अपेक्षेप्रमाणे कडू-गोड ठरल ...सत्यजित रे कसले गेले? सिनेमा दाखवत बसले...
रें चे कितीतरी उल्लेख ह्या ब्लॉग वर आले आहेत. उदा इथे: "Is She J E Millais's "Mariana" or Ray's "Charulata"?"
मला सगळ्यात जास्त आवडलेला रें चा सिनेमा, 'चारुलता'हून सुद्धा काकणभर जास्त: जलसाघर, १९५८ (Jalsaghar).
जशी मराठी मध्यमवर्गाला साधारण सन २००० नंतर आर्थिक सूज येत गेली (प्रामुख्याने मोठ्या शहरातील एक्सपोनेनशियली वाढत गेलेल्या घराच्या किमती, आय.टी., ग्लोबलायझेशनचा चढता आलेख, तगडा डॉलर मुळे) तसा हा सिनेमा मला जास्त आवडत आलाय.
एखाद्या विषयाचा खोल अभ्यास/ वाचन नसताना त्याबाबत हिरीरीने व्यक्त होणारे, कुठल्याही गोष्टीकडे जरासुद्धा दीर्घ/ऐतिहासिक दृष्टिकोनातून न पाहणारे, एकाच नजरेतून जगातील प्रत्येक गोष्ट घटना पाहणारे, ज्याअर्थी आपण (किंवा आपली मुले) आर्थिक किंवा इतर बाबतीत इतके यशस्वी आहोत म्हणजे आपल्याला वाटते ते वैश्विक सत्यच असणार असे समजणारे, बोलण्याचे विषय पैसा-दिसणे-जीम-फिटनेस- वार्षिकव्हेकेशन इतकेच असलेले नवश्रीमंत माहीम गांगुली सर्व क्षेत्रात वाढत गेले, आणि त्यातील काही कधीकधी जवळचे नातेवाईक सुद्धा निघाले!
मी बिस्वम्भर रॉय नाही पण मला त्यांची वेदना समजते- त्यांच्या पत्नी आणि पुत्र शोकाइतकीच ती क्लेशकारक आहे, त्यांचे 'तुफानी' नाहीसे होणे समजते....
पण मला रे सर्वात जास्त आवडतात त्यांच्या लिखाणातील अशा सचोटी मुळे :








