Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Wednesday, March 15, 2017
Saturday, March 11, 2017
आर्यत्वाचा उन्माद...अमली पदार्थांनी भरून वाहणाऱ्या पुष्करणी व नद्या ...Breaking Bad in Hitler's Germany!
Once a popular German song in Berlin cabarets:
Sweet alcohol, that beast,
Brought warmth and sweetness to our lives,
But then the price increased.
And so cocaine and morphine
Berliners now select.
Let lightning flashes rage outside
We snort and we inject!
त्यांचं पुस्तक मराठीतलं बेस्ट सेलर, काही आधुनिक राजकीय पुढाऱ्यांकडून होणारे त्यांचे गौरवपूर्ण उल्लेख, त्यांच्या बरोबर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नेहमी होत असणारी तुलना, १९४७सालच्या आधी काही महत्वाच्या नेत्यांचे, संघटनांचे आणि त्यांचे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष संबंध, कै इरावती कर्वेंबाबत कै. दुर्गाबाई भागवतांनी काढलेले खालील उद्गार:
"...पण जेव्हा हा अभिमान परछळाचा पाया होतो, अभिमानाचे रुप अहंगंड घेतो, अस्मितेला असहिष्णुतेचे स्वरूप येते, तेव्हा मात्र हा अभिमान रास्त राहत नाहि. या अभिमानापोटी काही मंडळी इंग्लंडात न जाता जर्मनीला गेली. त्यावेळी हिटलरने आर्यस्तोम माजवले होते...पण आर्यत्वाची मोहिनी असणारे कित्येक जण जर्मनीत गेले. तिथल्या पदव्या त्यांनी घेतल्या. इरावतीबाई (व त्यांचे पतिराज) त्यांपैकीच होते. वास्तविक इरावतीबाईंनी एम. ए. चाच प्रबंध जर्मनीत थोडा बदल करून पीएच. डी. ला दिला… "
('आठवले तसे', १९९१/२०१४) ... अस कितीतरी!
नॉर्मन ओलार (Norman Ohler) यांचे 'ब्लिट्झड : ड्रग्स इन नाझी जर्मनी' (Blitzed: Drugs in Nazi German) हे पुस्तक २०१६ साली प्रसिद्ध झाले. त्याचे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कौतुक झाले आहे. त्याचे काही भाग आणि त्याची परिक्षण वाचून बायार (Bayer) , म्यॅर्क (Merck) या महाकाय औषधे आणि रसायने बनवणाऱ्या कंपन्यांचा युद्धावरती - केमिकल शस्त्रे बनवून नव्हे- केवढा मोठा परिणाम होता हे जाणवत.
हिटलर, इतर अनेक नाझी आणि मोठ्या प्रमाणात सामान्य जर्मन लोक, सैन्य किती व्यसनी ('चरसी'/ 'गांजेकस') होते हे वाचून मन थक्क झाले आणि इतिहास हा कसा कायम इव्हॉल्व्ह होत रहातो याची जाणीव झाली. वाचून, पाहून कल्पिलेल्या युद्धकालीन जर्मनीतील प्रत्येक गोष्टीवर याचे सावट पडले. वाचलेला इतिहास, सिनेमा, डॉक्युमेंटरी थोडा का होईना बदललीय अस वाटू लागल.
थोर विद्वान आणि अभ्यासू कै. स अ जोगळेकरांनी त्यांच्या वाङ्मय शोभा मार्च १९५०च्या लेखात प्राचीन- 'आर्य' कालातील मद्यपानाबद्दल लिहले आहे:
कै. अरुण कोलटकरांनी 'द्रोण', २००२ या त्यांच्या दीर्घ कवितेत रामायणातील लंकाविजया नंतरच्या जेत्यांच्या काल्पनिक ऑरजी (orgy) चे वर्णन केले आहे.
पण कै जोगळेकर आणि कोलटकर आज असते तर त्यांना समजले असतेकी आधुनिक आर्य-जर्मन लोक दारू बरोबरच अमली पदार्थांच्या आहारी किती गेले होते ते!
जोगळेकर म्हणतातकी शहराला वेढा पडलेला असताना महाभारतकालीन सर्वसाधारण नागरिकांना मद्यपानाची सक्त मनाई होती पण बर्लिनला रशियनांचा वेढा पडल्यावर हिटलर आणि मंडळींचे ड्रग थैमान जमेल तसे चालूच होते!
दुसय्रा महायुद्धावरील गाजलेल्या अनेक पुस्तकांचे लेखक सर अँटनी बीव्हर 'दी न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स', मार्च ९ २०१७ मध्ये लिहतात :
श्री. ओलार पुस्तकात एका ठिकाणी म्हणतात:
Artist: E. O. Plauen aka Erich Ohser (1903-1944)
Tuesday, March 07, 2017
...जरी त्या क्रांतीचा मुडदा पडला तरी...The Russian Revolutions@100
'Bolshevik’, 1920, by Boris Mikhailovich Kustodiev
Isaiah Berlin, ‘A Message to the Twenty-First Century’, The New York Review of Books, November 25, 1994/ October 23 2014:
Simon Sebag Montefiore, ‘The Romanovs: 1613-1918’, 2016:
John Gray:
"Driven by ‘an amalgam of self-admiration and self-contempt’, intellectual and political leaders in Russia, China, India, Africa and the Islamic world responded to the incursions of imperialism by attempting to transform their societies along Western lines. Rejecting traditional elites and values, they imbibed Western ideologies, such as Marxism and Social Darwinism. By emulating the West, they hoped to defeat it. Instead, they have succumbed to the West’s pathologies and disorder"
Artist: Saul Steinberg (1914-1999), The New Yorker, February 25 1961
वरील इंग्रजी अवतरणातून रशियन क्रांतीने जगात काय घडवून आणले हे समजते. आणखी एक गोष्ट म्हणजे या आधीच्या अमेरिकन (१७६५-१७८३) आणि फ्रेंच (१७८९-१७९९) क्रांत्यांना जे जमल नाही ते या क्रांतीने केले: तीने महाराष्ट्राच्या (वाङ्मयीन) सांस्कृतिक जीवनात दीर्घ पल्ल्याची उलथापालथ नक्कीच घडवून आणली.
तिचे भयानक रक्तरंजित वास्तव आणि आर्थिक दिवाळखोरी साक्षर महाराष्ट्रात समजायला कित्येक दशके लागली. पण तो पर्यंत डझनाने मराठी साहित्यिक (उदा: साने गुरुजी, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, शं वा किर्लोस्कर, अनंत काणेकर, पु य देशपांडे, वि स खांडेकर, ग त्र्यं माडखोलकर, वि वा हडप ...) तिच्या (आणि पर्यायाने मार्क्सवादाच्या) प्रोपॅगांडाला कमी-जास्त प्रमाणात बळी पडले होते. लेखनात समाजवादी असण्याला मराठी साहित्य विश्वात मोठी प्रतिष्ठा मिळायला सुरवात झाली. समाजवाद आणि वास्तववाद याची गल्लत व्हायला सुरवात झाली. क्रांती हा शब्द मराठीत सहज वापरला जाऊ लागला. भांडवलदार, (मोठा) जमीनदार ह्या शिव्या बनल्या. साहित्य कृतीत चालेल पण पैशा बद्दल साहित्य विश्वात बोलायच नाही असा पायंडा पडत गेला. लेखकांमध्ये विज्ञानाच महत्व दिवसेंदिवस वाढत गेल आणि देवाच कमी होत गेल. नास्तिक असण्याला सुद्धा प्रतिष्ठा आली.
रशियन क्रांती- पहिल्या महायुद्ध काळात नावाजलेला धुरीण (समाजातील अल्पजन) वर्ग (ह ना आपटे, वि स खांडेकर, ना सी फडके, विश्राम बेडेकर ...), ज्यावर १९व्या आणि आधीच्या शतकातील ब्रिटिश कादंबरीचा मोठा प्रभाव होता, तो कथा, कादंबरी या वाङ्मय प्रकारासाठी वास्तववादाकडे जवळजवळ पूर्णपणे वळला होता. जसा बहुजन लेखक त्याकाळानंतर हळूहळू लिहता झाला तो अल्पजनांप्रमाणे वास्तववाद अंगीकारूनच. विलास सारंग म्हणतात: "...स्वातंत्र्यपूर्व धुरीण पिढीने कवटाळलेले ध्येयवाद, सुधारणावाद १९६० नंतरच्या बहुजन लेखकांनी सब-कॉन्शस अनुकरणप्रियतेने स्वीकारलेला दिसतो. काही नवीन वैचारिक मार्ग शोधण्याचा प्रयत्न क्वचितच आढळतो..." (पृष्ठ ६६, 'वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव', २०११)
माझ्या मते बहुजन साहित्यिकांना वेगळा, कधी पूरक- समांतर तर कधी काटकोनात (orthogonal) असा पंथ धरता आला असता. त्यांच्यावर शतकानुशतक झालेला अन्याय, त्यातून निर्माण झालेला आक्रोश किमान काही लेखकांना तरी विडंबन (satire) , अद्भुत (फँटसी), फार्स सारख्या साहित्य प्रकारातून (genre) अतिशय मनोरंजक आणि प्रभावी प्रकारे व्यक्त करता आला असता: उदा: जोनाथन स्विफ्ट यांची 'ए मॉडेस्ट प्रपोजल', १७२९ किंवा मिखाईल बल्गाकॉव्ह यांची 'दी मास्टर अँड मार्गारिटा', १९२८-१९४०.
महाराष्ट्रातले समाजसुधारक प्रखर वास्तव साध्या (ज्योतिराव फुले तर कधीतरी अतिशय लालित्यपूर्ण) मराठी भाषेत १९व्या शतकापासून मांडतच होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी विडंबनाची ताकत समर्थपणे दाखवून दिली होती. अण्णासाहेब किर्लोस्करांचा 'संगीत सौभद्र' नावाचा फार्स कमालीचा लोकप्रिय झाला होता. मराठीत केंव्हाच अनुवादित झालेल 'अरेबियन नाईट्स' सारख उत्तम दर्जाच फँटसी वाङ्मय उपलब्ध होत. प्रखर वास्तव, अतिवास्तव आणि फँटसी यांच्या सीमेवर संचार करणाऱ्या अस्सल देशी जातक कथा होत्या. शील-अश्लील असली दांभिकता धुडकारून देणार, बहुजनांच सामान्य जीवन तरलतेन मांडणार आणि सेलिब्रेट करणार जगातील एक महान पुस्तक 'गाथा सप्तशती' होत....
१९८९सालापर्यंत जरी या रशियन क्रांतीचा जगात इतर अनेक ठिकाणी मुडदा पडला असला तरी मराठी साहित्यावरील तीचा पगडा अजून बऱ्याच प्रमाणात कंटाळवाण्या, कल्पनाशून्य अशा ढोबळ वास्तववादाच्या (आणि ध्येयवाद , आदर्शवाद , परिवर्तनवाद) रूपात कायम आहे. लेखक आणि समाजसुधारक यातील फरक नष्ट झाला आहे...
Friday, March 03, 2017
पिकासोंच्या चित्रातील सेक्सचा 'वास'!...Nosing Sex in a Picasso!
The Guardian reported on January 30 2017: “Tate Modern to host 'once in a lifetime' Picasso (1881-1973) exhibition. Landmark show will focus on ‘year of wonders’ 1932, at height of painter’s affair with young lover Marie-Thérèse Walter (1909-1977).”
In a delightful comedy "The Curse of the Jade Scorpion", 2001, Woody Allen plays an insurance investigator and cracks the case of a missing Picasso.
He explains succinctly how difficult the operation was:
"...I'm supposed to be looking for a picture of a woman with a guitar, but it's all little cubes. It took me two hours to find the nose."
Now, but for the critic, I would have never known every place the sex was....but I thought there was some amount of objectification of female body in all this and therefore was elated to see the following cartoon that is now almost 70-year-old...
Artist: Whitney Darrow, Jr. (1909-1999), The New Yorker, May 3 1947









