Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Thursday, April 26, 2018
Sunday, April 22, 2018
अनौपचारिकतेची फसवी नक्षी...Saul Steinberg, Vasant Sarwate and The Enigma of Reason
हे अलीकडेच प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पहा. हे चित्र स्टाईनबर्ग यांचे आहे हे तर लगेचच कळते.
सरवटे या चित्राबद्दल बोलले आहेत:
"...बॉसचं आपल्या असिस्टंटशी बोलणं. घोगरा, दमदार आवाज, दुसऱ्याला बोलण्याची संधी न देणारा, भाषा औपचारिक, अनौपचारिकतेची फसवी नक्षी, करवतीसारखे दात असलेली धारदार तरी किंवा गाफील राहिल्यास पेचात पकडणारी. एकूण सर्व बोलणं दडपण आणणारं. बॉस-असिस्टंट या 'संवादा'ची सर्व वैशिष्ट्य एक शब्दही न वापरता केवळ रेषांमधून स्टाईनबर्ग आपल्याला अक्षरश 'दाखवतो'!
('चौकटीबाहेरची चित्रं', महाराष्ट्र टाइम्स दिवाळी वार्षिक , १९९५)
वरील मुखपृष्ठवाल्या पुस्तकाचे लेखक लिहतात:
Wednesday, April 18, 2018
ग्लोरिया ग्रॅहम आणि मीना कुमारी....The Girls Who Couldn't Say No
"...You want to leave me? People have been walking out on me my whole life, honey..."
Meena Kumari:
"Badi Bechari Hai
Meena Kumari
Jisko Lagi Hai
Dil Ki Bimari" (quoted in Vinod Mehta's 'Meena Kumari: The Classic Biography', 1972/2013)
'Film Stars Don't Die in Liverpool', २०१७ हा अतिशय चांगला चित्रपट नुकताच पहिला. ग्लोरिया ग्रॅहम (Gloria Grahame) १९२३-१९८१ यांच्या जीवनावर तो आधारित आहे.
अॅनेट बेनिंग (Annette Bening) यांचा उत्कृष्ट अभिनय हे या सिनेमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल.
दोघीही महान अभिनेत्र्या.... दोघींबद्दल निंफोमॅनियाक हे विशेषण वापरल गेलेल... काही असो, दोघी प्रेमाला भुकेल्या...
सिनेमा बघून हेही वाटल: मीना कुमारींच्या जीवनावर या दर्जाचा सिनेमा हिंदीत कधी निघेल का?
I do not know whether it is true today, but in the ’70s there was a battery of hangers-on attached to a star. They could be distant relatives, secretaries, legal counsels, hairdressers, brothers-in-law, chauffeurs, etc. These people’s fantasies of making it big courtesy the star were at once sad and gripping. The fantasists were, happily, a valuable source of classified information, which helped me reconstruct Meena Kumari’s life. To be sure, they would crazily exaggerate their importance, influence and proximity to the star. One hanger-on invited me to inspect a secret bedchamber, with lots of mirrors, tucked away in his office. This is where he claimed he serviced the actress...”
Saturday, April 14, 2018
जालियनवाला बागेच्या हत्याकांडाला शंभर वर्षे होतील....Amritsar’s Unfortunate Association with Violence did Not End in 1919
The Duke of Connaught:
Joseph Lelyveld, ‘Great Soul: Mahatma Gandhi and His Struggle With India’, 2011:
कितीतरी गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत - पहिल्या महायुद्धातील भारताच्या मोठ्या योगदानामुळे हत्याकांडाला दिल गेलेल ब्रिटन मधल महत्व, Edwin Samuel Montagu ह्या ज्यू सेक्रेटरी ऑफ स्टेट यांच्यावर झालेले आरोप ('some of Dyer's defenders accused the Jewish Secretary of State of being part of a global conspiracy of Jews against British power'), भारतीय राजकारणातील 'गर्दी'चे पदार्पण आणि महत्व (The Hunter inquiry marked the arrival of a new force in Indian politics: the crowd)- जे २१व्या शतकात दिवसेंदिवस वाढत चालले आहे....
Jon Wilson:
Wednesday, April 11, 2018
विश्वामित्रांची प्रतिसृष्टी ...Westworld and a New Heaven
(सौजन्य: मराठी विश्वकोश)
"...Dr. Ford: Hello, Dolores. Do you know where you are?
(HBO's 'Westworld', Season 1, Episode 5, 'Contrapasso')
Artist: Ghulam 'Ali, c1597-1605
courtesy: Wikimedia Commons
Twenty models, who have been turned into ‘humanoid’ robots by body artists to promote 'Westworld'
Sunday, April 08, 2018
आरशातील उत्पात आणि कल्लोळ !....G A Kulkarni and Orson Welles
जी ए कुलकर्णींच्या 'प्रवासीं ('रमलखुणा', १९७५) कथेतील एक विलक्षण प्रसंग (पृष्ठ २६-३५) म्हणजे प्रवाशाचे त्याच्या कुत्र्यासोबत शिकाऱ्याच्या आरसेगृहातील (House of mirrors) आगमन आणि सुटका.
इतक्या वेळा वाचून सुद्धा मला त्याचे सगळे पैलू समजले असे वाटत नाही. अदभुत आणि चिरंतन याची सांगड जीए ज्या कौशल्याने घालतात त्यामुळे त्याचे लेखन इतक्या वर्षानंतर सुद्धा ताजे वाटते, हटके वाटते.
अस आरसेगृह जीएंच्या आयुष्यात लहानपणीच, ते जेंव्हाजेंव्हा जत्रेला गेले असतील, त्या त्या वेळी आले असेल. पण मला वाटत की जीएंना ऑर्सन वेल्स यांच्या 'दि लेडी फ्रॉम शांघाय', १९४७ मधील हाऊस ऑफ मिरर्स सुद्धा लक्षात असणार.
जीएंच्या भाव आणि कला जीवनावर हॉलीवूडचा, एकूणच चांगल्या चित्रपटांचा खूप प्रभाव होता अस मला त्यांची पत्रे वाचल्यापासून कायम वाटत आले आहे.
शिवाय जीए स्वतः एक चित्रकार असल्यामुळे ते त्यांच्या लेखनात अनेक प्रभावी चित्रवत प्रतिमा निर्माण करतात. अशा कलाकारावर चित्रांचा आणि इतर visual arts चा प्रभाव इतर लेखांकांपेक्षा अमळ जास्त असणे सुद्धा सहाजिक आहे.
'प्रवासी'तील आरसेगृहातील वर्णन म्हणजे एखाद्या निष्णात पटकथालेखकाने एखाद्या उत्तम सिनेदिग्दर्शकासाठी लिहल्यासारखे आहे.








