Artist: Alan Dunn (1900–1974), The New Yorker, July 21 1962
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Tuesday, January 16, 2018
A Special Prayer for the Supreme Court.....
Artist: Alan Dunn (1900–1974), The New Yorker, July 21 1962
Sunday, January 14, 2018
स्वातंत्र्यानंतर र धों कर्वे...अजुनसुद्धा दुर्लक्षित .... R D Karve@136
आज १४ जानेवारी २०१८, र धों कर्वेंची १३६वी जयंती
Joseph Lelyveld, 'Great Soul: Mahatma Gandhi and His Struggle With India', 2011:
र धों कर्वेंकडे (१८८२-१९५३) मी संतती नियमनाचे समाज सुधारक एवढ्या मर्यादित दृष्टीने पहात नाही. ह्या ब्लॉग वरील त्यांच्या वरच्या अनेक पोस्ट मंधून त्याचा उहापोह झालेला आहे.
पण ह्या पोस्ट मध्ये कर्वेंचे स्वतंत्र भारतात, १९४७पासून आजवर, काय चीज झाले ह्याबद्दल थोडेसे. माझी माहिती कोठून आली ते प्रत्येक ठिकाणी लिहिले आहे.
१> रामचंद्र गुहा हे महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांचे आवडते इतिहासकार. त्यांचे 'India After Gandhi: The History of the World's Largest Democracy', २००७ पुस्तक गाजलेले, मराठीत अनुवाद झालेले. त्यातील 'Autumn of the Matriarch' ह्या प्रकरणात खालील माहिती आहे:
"...The debates on India’s population size dated from the earliest days of Independence. Social workers had set up a Family Planning Association of India in 1949. The Planning Commission had spoken of the importance of family planning since its inception in 1950–1. However, culture and economics worked in favour of large families. The biases in educational development meant that girls were still valued more as child-bearers than as wage-earners. The continuing dependence on agriculture placed a premium on children. Indian Muslims and Catholics were enjoined by their clergy to abjure family planning...."
ज्या माणसाने आपले सर्वस्व त्याकारणी लावल होत त्या कर्वेंचा उल्लेख संपूर्ण पुस्तकात कोठेही नाही! (गुहांच्या 'Makers of Modern India', २०१० या पुस्तकात सुद्धा र. धों चा उल्लेख कोठेही नाही.)
भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री श्रीमती राजकुमारी अमृता कौर (Amrit Kaur) ह्या ख्रिस्ती होत्या, महात्मा गांधींच्या कट्टर अनुयायी होत्या - त्यांच्या आश्रमात राहिल्या होत्या आणि त्या संतती नियमनाची साधने वापरायच्या विरुद्ध होत्या. त्या गांधीजींप्रमाणेच आणि ख्रिस्ती धर्माच्या कलानुसार आत्मसंयमनाच्या (abstinence) पुरस्कर्त्या होत्या. (ख्रिश्चन धर्माच्या संतती नियमनाबद्दलच्या दृष्टिकोनांबद्दल हे वाचा.)
पंडित नेहरूंचा कुटुंबनियोजनाला किमान १९५२पर्यंत गुळमुळीत पाठिंबा होता. त्यांना ती गोष्ट १९५२पर्यंत महत्वाची वाटतच नव्हती. शिवाय, वर श्री. गुहा म्हणतात त्याप्रमाणे, बहुसंख्य मुसलमान आणि ख्रिस्ती लोक (केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसकट!) त्यांच्या धर्मामुळे कुटुंबनियोजन नाकारत होतेच.
१९५०साली भारत सरकारने कर्वेंना संततिनियमनासाठी लागणाऱ्या रबरी टोप्या आयात करू दिल्या नाहीत.
यदिंच्या पुस्तकातील या महत्वाच्या गोष्टींचे उल्लेख गुहांच्या पुस्तकात नाहीत.
थोडक्यात म्हणजे कर्वेंना आर्थिक किंवा नैतिक - कुठलाही पाठिंबा स्वतंत्र, निधर्मी भारताच्या पुरोगामी पंतप्रधानाच्या कॅबिनेटने जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत दिला नाही. १९५८साली त्यांच्या वडिलांना भारतरत्न देण्यात आले, रधोंना मात्र कुठलाही पुरस्कार मिळाला नाही.
Thursday, January 11, 2018
वासुदेवशास्त्री खरेंची पद्मावती....Vasudev Shastri Khare and Padmavati
मागे फेसबुक वर लिहल्याप्रमाणे, वासुदेवशास्त्री खरे (१८५८-१९२४) यांच्यावरचा चिंतामणराव कोल्हटकरांचा लेख ('बहुरूपी', १९५७) हा जगातील मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखातला एक आहे. (त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी लिहलेला मृत्युलेख सुद्धा उत्कृष्ट आहे.)
प्रत्येकवेळी वाचताना हसू येत, त्यांच्या ज्ञानाचा हेवा वाटतो आणि शेवटी डोळे किंचित ओलावतात. एक थोर इतिहासकाराला जो skepticism (शंकेखोरपणा) लागतो तो त्यांच्यात होता. Self deprecating humor होता. डोळसपणा होता. कवीत्व होत. प्रचंड साधेपणा होता. संपत्ती आणि प्रसिद्धी यांची हाव नव्हती. धर्माच- पूजापाठाच अवडंबर नव्हत. दांभिकपणा नव्हता. संसारी होते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले होते. छान गायचे. काबाड कष्ट करायचे.
ज्या गावात मी लहानाचा मोठा झाला, त्या मिरजेत असा माणूस होऊन गेला याचा मला अभिमान वाटतो. माझ्या आज्जी आजोबांचे लग्न होण्यापूर्वीच शास्त्रीबुवा वारले होते तरी मी त्यांच्याशी गप्पा मारू शकलो नाही (ते गप्पा मारायला येणाऱ्याला विन्मुख पाठवत नसत म्हणे) याचा मला विषाद वाटतो!
खरेंचे शिवसंभव (१९१९) नाटक लोकप्रिय झाले पण त्यावर वाद झाला होता. चिंतामणरावांनी जेंव्हा खरेंकडे ऐतिहासिक नाटकाची मागणी केली त्यावेळी त्यांचा संवाद जो झाला तो वाचण्यासारखा आहे.
यामध्ये, योगायोगाने, शाहू महाराजांचे अतिशय हृद्य असे व्यक्तिचित्रण झाले आहे. केवढ्या मोठ्या मनाचा, विनोद बुद्धी असलेला , रसिक असा तो राजा होता हे मला पुन्हा एकदा समजले.
सौजन्य : चिंतामणराव कोल्हटकरांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
आता वाचा शास्त्रीबुवांनी कोल्हटकरांना दिलेला सल्ला, जो भारतातील सर्व कलावंतांनी वाचण्यासारखा आहे: <"सर्व प्रसंग , ऐतिहासिक असतील . पण तो अमुकच ठिकाणचा इतिहास आहे, असे तुम्हांला म्हणता येणार नाही".>
(p. s. शेवटी न चि केळ्करांना ['तोतयाचे बंड नाटकाचे लेखक] मारलेला टोला पहा... सदाशिव भाऊंच्या तोतया चा उपयोग नाटककार निर्माण करायला तरी किमान झाला! )
त्या नंतर खरेंनी कोल्हटकरांच्या बलवंत संगीत मंडळी साठी उग्रमंगल नाटक (१९२२) लिहले.... त्यातील एक पात्र होते 'राणी पद्मावती', जी भूमिका दीनानाथ मंगेशकर करत असत!
Tuesday, January 09, 2018
Why NOT Work On Being a Better Fish: Pravasi Bharatiya Divas
Artist: Mick Stevens, The New Yorker, September 2016
Saturday, January 06, 2018
Wednesday, January 03, 2018
माझ्या आईच्या पोर्ट्रेटवर बसलेली माशी...To Be a Man and Mortal...
जी ए कुलकर्णी, ऑर्फियस (१९७३), पिंगळावेळ, १९७७ :
Priam the king of Troy:
उजवीकडचा माझ्या आईचा फोटो, त्यावेळच्या एका प्रसिद्ध (आणि महागड्या), लक्ष्मी रोड, पुणे येथील , फोटो स्टुडिओत काढला आहे. माझ्या वडिलांनी त्यांना अजिबात न परवडणारे पैसे त्यासाठी खर्च केले होते. आईला केसात फुल घालून यायला फोटोग्राफरनी सुचवले होते. ते दोघे त्यावेळी, प्रेमविवाहानंतर नुकतेच, जवळजवळ कफल्लक होते. तिच्या गळ्यातले मणिमंगळसूत्र पहा. तेवढा एकच दागिना तिच्याकडे होता.
त्या फोटोचे खूप कौतुक आजपर्यंत मी बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे. मी ऐकल आहे की फोटोस्टुडिओत काही आठवडे तो 'display' वर सुद्धा होता.
डावीकडील १४७० सालचे, सुन्न करणारे, 'पोर्ट्रेट ऑफ ए वूमन ऑफ दि हॉफेर फॅमिली' चित्र २०१७मध्ये पाहिल्यावर वाटले, मी ती आईच्या फोटोतील माशी आई जाईपर्यंत जणू पहातच नव्हतो...
Sunday, December 31, 2017
फेसबुकावरील स्मारके -२....Memorials on Facebook-II
मराठीतील कित्येक दिवंगत लेखक, मासिके, वर्तमानपत्रे- ते टिकायचे असतील तर- इंटरनेट वर उपलब्ध होणे आवश्यक आहे...
'वाङ्मय शोभा'च्या पाठोपाठ माणूस , सत्यकथा, मौज, ललित (?) यांचे सर्व अंक उपलब्ध होणार असे ऐकून आहे ... हे अत्यंत स्वागतार्ह आहे....
पण त्यातील प्रत्येक गोष्ट searchable पाहिजे ... उदा: बुकगंगा वरचे 'वाङ्मय शोभा' चे अंक searchable नाहीयेत .... त्यामुळे गुगल सर्च मध्ये 'वाङ्मय शोभा' मधील result केंव्हाच येत नाही... आवडो न आवडो, विकिपीडिया आणि गुगल जे विसरत, ते हळूहळू सगळे विसरतात!
मराठी वर्तमानपत्रे, काही मासिके याबाबत बोटचेपी भूमिका घेत आहेत कारण त्यातील बरेच जण ब्लॉग, विकिपीडिया, फेसबुक, व्हाट्सएप, इंटरनेट मंडळे यांना आपला प्रतिस्पर्धी मानायला लागले आहेत (आणि ते बऱ्याच प्रमाणात खर आहे!). त्यामुळे ते त्यांचा बऱ्याचदा उल्लेख सुद्धा करत नाहीत. (इंग्रजी मधील प्रसिद्ध वर्तमानपत्रे, छापलेली मासिके मात्र त्यांचा उल्लेख आता जास्त करायला लागले आहेत.)
मराठी वर्तमानपत्रांचे भविष्य काय याबद्दल मला काहीही अंदाज नाही पण सध्या त्यांचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे फेसबुक आणि व्हाट्सएपला फीड किंवा विकिपीडिया बदला साठी संदर्भ म्हणून आहे. म्हणजे बरीच लोक वर्तमानपत्रे सोशल मीडिया वरती छायाचित्राच्या स्वरूपात फक्त पाहतात.
मराठी वर्तमानपत्रांकडून, मराठी लोकांच्या सर्व प्रकारच्या इतिहासाचे जतन करण्या बाबत thought-leadership ची अपेक्षा मी तरी करत नाही.
मराठीभाषेला डिजिटायझेशनच्या चळवळीची जास्त गरज आहे कारण सध्या त्यात लिहणारे बरेच जण 'wheel reinvent' केलेल्या आवेशाने लिहीत असतात. १९-२०व्या शतकात मराठीत विविध विषयावरती प्रचंड लेखन झाले आहे. त्यातले बरेच पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध सुद्धा झालेले नाही. ज्या लेखनाची पुस्तके झाली ती बाजारपेठेतून केंव्हाच नाहीशी झाली आहेत आणि त्यांचे पुनर्मुद्रण व्हायची शक्यता शून्य आहे. (बरीच लोक मला- मी प्रसिद्ध केलेल्या फेसबुक पेजवर- हे पुस्तक कुठे मिळेल असे विचारत असतात. ) लिखित शब्दांची ही अवस्था तर चित्रांची काय वर्णावी ? सध्या मराठीत फक्त 'committed' किंवा 'उपोयोगी' किंवा 'डाव्या' लेखनाचा/ कलांचा उदोउदो करण्याची फॅशन आहे. उदा: महात्मा फुले (१८२७-१८९०) यांचे बहुतांशी लेखन उत्तम स्वरूपात उपलब्ध आहे पण त्यांच्या बहुतेक समकालीनांची परिस्थिती बिकट आहे.
पण हे बदलू शकत. पुढच्या पिढ्यांना सर्व प्रकारच्या लेखनात इंटरेस्ट वाटू शकतो. त्यांच्या विचाराच्या कक्षा फार मोठ्या प्रमाणात रुंदावू शकतात. वर्तमानाचे बरे वाईटचे निकष पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीला लावण्याची घाणेरडी सवय त्यांना नसू शकते. आपण काहीतरी लिहण्या किंवा बोलण्याआधी इतिहासात अस कोणी लिहिल किंवा बोललय का अशी अभ्यासू सवय त्यांना असू शकते. अशावेळी डिजिटल presence फार उपयोगी पडू शकतो.
Starting August 15 2007, over the past decade and more, I have created a few pages on English Wikipedia:
Vasant Sarwate, T S Shejwalkar, M V Dhond, D G Godse, Y D Phadke, S D Phadnis, Sadanand Rege, Natyachhatakar Diwakar, C V Joshi
I have created a few Facebook pages too. Here, I have listed them in alphabetic order showing likes in December last year and this year.
| Facebook page | Address | Likes as of Dec 29 2016 | Likes as of Dec 25 2017 | %Change in 1 year | |
| 1 | B S Mardhekar& Co बा. सी. मर्ढेकर आणि कंपनी | https://www.facebook.com/myBaSeeMardhekar/?ref=bookmarks | 909 | 1138 | 25.2% |
| 2 | D G Godse, A Search शोध द. ग. गोडसेंचा | https://www.facebook.com/MastaniDaGaGodse/?ref=bookmarks | 356 | 524 | 47.2% |
| 3 | Dinanath Dalal (In Marathi: दीनानाथ दलाल) | https://www.facebook.com/artistdinanathdalal/?ref=bookmarks | 2329 | 2509 | 7.7% |
| 4 | Durga Bhagwat An Appreciation दुर्गा भागवत एक आस्वाद | https://www.facebook.com/durgabhagwatappreciation/?ref=bookmarks | 1341 | 1602 | 19.5% |
| 5 | G A Kulkarni, An Appreciation जी ए कुलकर्णी, एक आस्वाद | https://www.facebook.com/myGAKulkarni/?ref=bookmarks | 874 | 1183 | 35.4% |
| 6 | Gopal Dutt Kulkarni गोपाळ दत्त कुलकर्णी | https://www.facebook.com/gopalduttkulkarni/?ref=bookmarks | 3 | 39 | 1200.0% |
| 7 | Govindrao Tembe गोविंदराव टेंबे | https://www.facebook.com/GovindraoTembe/?ref=bookmarks | 639 | 860 | 34.6% |
| 8 | My Sadanand Rege माझे सदानंद रेगे | https://www.facebook.com/mySadanandRege/?ref=bookmarks | 431 | 582 | 35.0% |
| 9 | Natyachhatakar Diwakar नाट्यछटाकार दिवाकर | https://www.facebook.com/NatyachhatakarDiwakar/?ref=bookmarks | 78 | 155 | 98.7% |
| 10 | R D Karve, Who? र. धों. कर्वे, कोण? | https://www.facebook.com/rdkarve/?ref=bookmarks | 813 | 1071 | 31.7% |
| 11 | Ram Ganesh Gadkari राम गणेश गडकरी | https://www.facebook.com/RamGaneshGadkari/?ref=bookmarks | 1612 | 1842 | 14.3% |
| 12 | Remembering C V Joshi चिं वि जोशींच स्मरण | https://www.facebook.com/ChinViJoshi/?ref=bookmarks | 44 | 164 | 272.7% |
| 13 | Setu Madhavrao Pagdi, A View सेतु माधवराव पगडी, मला दिसलेले | https://www.facebook.com/mySetuMadhavraoPagdi/?ref=bookmarks | 963 | 1252 | 30.0% |
| 14 | Shripad Krushna Kolhatkar, The Greatest श्रीपाद कृष्ण कोल्हटकर | https://www.facebook.com/ShripadKrushnaKolhatkar/?ref=bookmarks | 502 | 685 | 36.5% |
| 15 | T S Shejwalkar, Lest We Forget त्र्यं. शं. शेजवलकर, विसरलो का? | https://www.facebook.com/HistorianShejwalkar/?ref=bookmarks | 307 | 526 | 71.3% |
| 16 | The Art of Vasant Sarwate वसंत सरवटे यांची कला | https://www.facebook.com/vasantsarwateappreciation/?ref=bookmarks | 893 | 1078 | 20.7% |
| 17 | Two Brothers in Tandem-R K - Narayan & Laxman | https://www.facebook.com/Two-Brothers-in-Tandem-R-K-Narayan-Laxman-283141975063419/?ref=bookmarks | 24 | 37 | 54.2% |
| 18 | Vilas Sarang, a literary critic विलास सारंग, टीकाकार | https://www.facebook.com/vilassarangcritic/?ref=bookmarks | 305 | 485 | 59.0% |
| 19 | Vishwanath Kashinath Rajwade विश्वनाथ काशिनाथ राजवाडे | https://www.facebook.com/VishwanathKashinathRajwade/?ref=bookmarks | 1155 | 1412 | 22.3% |
| 20 | Who was M V Dhond? कोण बर हे म. वा. धोंड? | https://www.facebook.com/MaVaDhond/?ref=bookmarks | 14 | 116 | 728.6% |
| 21 | य दि फडके, एक वाटाड्या Y D Phadke, A Guide | https://www.facebook.com/yadiphadkeaguide/?ref=bookmarks | 7 | 204 | 2814.3% |
| Total Likes for pages | 13599 | 17464 | 28.4% |









