ऑक्टोबर १९९१ मध्ये मी कलकत्त्याहून द ग गोडसे यांना एका पत्रात विचारले होते की : शिवाजी महाराजांनी १६६६ साली नुकताच (१६५३) पूर्ण झालेला ताजमहाल पाहिला असेल का?
त्यावर गोडसेंनी मला हे उत्तर ऑक्टोबर १९९१ मध्येच पाठवले.
(गोडसे आणि माझी भेट झालीच नाही, त्यांच्या साठी आसामच्या चहाच्या बागेतून आणलेला, सिल्वर फॉईल मध्ये रॅप केलेला उत्तम प्रतीचा चहा दुसऱ्यांच्या नशिबात होता.... )
मुख्य प्रश्नाला त्यांनी बगल दिली आहे पण ते लिहतात:
".... ताजमहाल आणि रायगड हे थोड्या फार फरकाने समकालीन आहेत. पण दोघांच्याही वृत्ती प्रवृत्तीत किती अंतर आहे? महाराष्ट्रात ताजमहाल होणे नाही तसाच आग्र्याला रायगड होणे अशक्य! प्रत्येक भूप्रदेश आपले <?> वेगळे घडवीत असतो..."...
No comments:
Post a Comment