Monday, February 19, 2018

शिवाजी महाराजांच्या शासनात कारभार कसा नसेल याचे एक उदाहरण ...Advertisement of PMC on Shivjayanti

#Shivjayanti2018


John Keay, 'India: A History', 1999:
"...As well as causing a sensation at the time, Shivaji’s extraordinary exploits would transcend their immediate context to dazzle his successors, console Hindu pride during the looming years of British supremacy, and provide Indian nationalists with an inspiring example of indigenous revolt against alien rule..."

शिवाजी महाराजांच्या शासनात कारभार कसा नसेल याचे एक उदाहरण त्यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या जयंती संबंधातले....

आज फेब्रुवारी १९ २०१८ रोजी लोकसत्तात महाराजांना अभिवादन करणारी एक पूर्ण पान जाहिरात आहे .  त्या जाहिरातीच्या तळास काही मान्यवरांचे आणि इतिहासकारांचे उद्गार दिले आहेत. मी ते नीट वाचले.

सौजन्य: पुणे महानगरपालिका आणि लोकसत्ता

 १> जपानचे बॅरन कादा कोण हे मला गुगल करून सुद्धा समजले नाही.
२> युरोपियन इतिहासकार अॅनाल्ड टायबर्न कोण? विकिपीडिया मध्ये Anold Tyburn नाहीत. बहुतेक हे Arnold J. Toynbee असावेत.
३> डॉ डेलॉन मलातरी सापडले नाहीत. पण असतील.
४> डच गव्हर्नर इब्राहीम-लि-फ्रेंडर सुद्धा मला सापडले नाहीत. पण असतील.
५> ग्रँट डफ अधिकारी असतील पण ते इतिहासकार सुद्धा होते म्हणून त्यांचे महत्व
६> व्हॉइसरॉय जनरल वॉरेन हेस्टिंग कोण? हे वॉरेन हेस्टिंग्स असावेत. वॉरेन हेस्टिंग्स भारताचे व्हॉइसरॉय केंव्हाही नव्हते. व्हॉइसरॉय हे पद १८५८साली अस्तित्वात आले (Following the adoption of the Act that transferred the government of India from the East India Company to the Crown in 1858, the Governor-General as representing the Crown became known as the Viceroy).
 हेस्टिंग्स हे गव्हर्नर जनरल होते.

वरील क्रमांक १,३, ४ यांच्या कडे दुर्लक्ष करा. पण बाकीचा मला अत्यंत खेदजनक असा ढिसाळपणा वाटतो.

जाहिरात तयार करणारे, देणारे, आणि वर्तमानपत्रे हे सर्वजण या गोष्टीला जबाबदार आहेत.


करमरकर विरुद्ध करमरकर , २०१८.....Kramer Vs. kramer, 1979

'क्रेमर व्हर्सेस क्रेमर' (Kramer Vs. kramer), १९७९ चा सिनेमा माझ्या वडिलांनी c१९८० साली नाशकात पहिला होता आणि त्यावर त्यांनी 'गावकरी' दैनिकामध्ये अग्रलेख लिहला : 'करमरकर विरुद्ध करमरकर'.

तो लेख माझ्याकडे आत्ता नाही. पण त्यातील एक मुद्दा मला आठवतो  - घटस्फोट आपल्याकडे पण वाढणार आहेत ....आणि तसच झाल.

हे सगळ आठवायच कारण म्हणजे मिसेस करमरकरांनी (मेरिल स्ट्रीप) नी मिस्टर करमरकरांवर (डस्टीन हॉफमन) केलेले आरोप:


"... Take this 1979 interview in Time magazine, in which Meryl Streep described auditioning for a play Hoffman had directed several years earlier. It was apparently the first time they had met. “He came up to me and said, ‘I’m Dustin—burp—Hoffman,’ and he put his hand on my breast,” Streep said. “What an obnoxious pig, I thought.”..."



Dustin Hoffman and Meryl Streep in Kramer vs. Kramer.

courtesy: Michael Ochs Archives/Getty Images - © 2011 Getty Images