श्री. मीना वैशंपायन संपादित "विचारसंचित", २०१५ मधील दोन लेख वाचले.
१>'चेष्टेचा विषय व्हावा तसे रंगविलेले कथानक २२ जून १८९७" , १९८० हा चित्रपट समीक्षा लेख :
२२ जून १८९७ हा १९७९ सालचा 'गाजलेला' आणि बहुपुरस्कृत सिनेमा मी पाहिलेला नाही, आणि तो पहिला नाही याबद्दल बरे वाटले इतके या चित्रपटाचे वाभाडे दुर्गाबाईंनी काढले आहेत.
या शतकात 'पिरियड' टीव्ही आणि चित्रपटांचे मराठीत पेव फुटले आहे. त्या पार्श्व् भूमीवर प्रत्येक प्रेक्षकाने मन लावून तो लेख वाचावा आणि परीक्षण लिहणाऱ्यांनी किती अभ्यास केला पाहिजे हे समजण्यासाठी तो लेख वाचावा.
चित्रपटाचे संवाद विजय तेंडुलकरांचे आहेत आणि त्यात किती ढिसाळपणा आणि खोडकरपणा आहे त्याचे एक उदाहरण खालील एका परिच्छेदात पहा.
त्या शिवाय पुरुषांची वेशभूषा, बायकांची वेशभूषा, पुरुषांची केशभूषा, स्त्रियांची केशभूषा, पुरुषांची शरीरयष्टी, मराठी भाषा, दुर्लक्षिलेला पण अत्यंत महत्वाचा मुंबई शहराचा चापेकरांच्या आयुष्यातील रोल, कीर्तनाच्या दृशांची मांडणी, रँडच्या पुण्यातील पापांचा घडा उघडा न पाडणे हे सगळेच मोठ्या प्रमाणात ढिसाळ आणि वास्तवाला विसंगत आहे.
(दुर्गाबाईनी सत्यजित रेंचा 'घरे बाईरे', १९८४ हा पिरियड सिनेमा बघितला का हे माहित नाही पण त्यांना तो नक्की आवडला असता.)
२> 'कंठस्नान आणि बलिदान', १९७४ हा पुस्तक समीक्षा लेख:
....
हा लेख वाचून मला लक्षात आले की मी हे पुस्तक पूर्वीच मिळवून वाचायचा
प्रयत्न करायला पाहिजे होता. एवढा अभ्यास, एवढे संशोधन १९व्या शतकांतील
महाराष्ट्राच्या इतिहासासाठी (काही देशभक्त आणि काही समाजसुधारक यांच्या
बाबत सोडता) क्वचितच झाले आहे. (महाराष्ट्राच्या सुदैवाने य दि फडके यांनी
सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर केले.) .
दुर्गाबाईंनी विष्णु श्रीधर जोशी यांचे ते पुस्तक कसे थोर आहे हे सिद्ध केलय. शेवटी त्या म्हणतात: "महाराष्ट शासनाने या ग्रंथाची इंग्रजी व भारतीय भाषांत भाषांतर करून घेणे आगत्याचे आहे."...
इतर भाषांतील भाषांतराचे मला माहित नाही पण त्याचे मराठीत भाषांतर होणे गरजेचे आहे कारण आज २०१९साली ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट आहे... बाजारात कुठेही विकत मिळत नाही!
कृतज्ञता: दुर्गाबाईंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स बद्दल,
मुखपृष्ठ कलावंत: रविमुकुल
No comments:
Post a Comment