1> डिलन यांची गाणी मी क्वचितच ऐकली आहेत...पण त्याच्या बद्दल वाचल होत...त्यांचे काही उद्गार, गाण्याचे शब्द अगदी आत भिडले होते....
उदा: हे त्यांनी १९९१ साली म्हटलय:
"Well, my daddy, he didn't leave me much, you know he was a very simple man, but what he did tell me was this, he did say, 'Son,' he said, he say, 'you know it's possible to become so defiled in this world that your own father and mother will abandon you, and if that happens, God will always believe in your ability to mend your ways.'"
मी आणि माझ्या वडलांच्या संबंधांच्या अनुशंगाने हे वाचून डोळ्यात पाणी आल होत....अजुनही येत...
2> श्री. प्रल्हाद जाधवांचा कै. कोलटकरांवरचा अतिशय उत्कृष्ट लेख ३० मे २००४ साली लोकसत्तात वाचला होता... बराच लक्षात होता...पण सुदैवाने कापून पण ठेवला होता आणि आत्ता लकीली सापडला...त्यात जाधव म्हणतात:
'बिटल्स, बॉब डिलन यांचा त्यांच्यावर प्रभाव होता'...(बिटल्सवर डिलनचा प्रभाव होता!)... ते कोलटकर वाचताना जाणवत...अर्थात माझ्यासारख तुम्ही कोलटकरांनंतर डीलन वाचत असाल तर, उलट वाटत... तीच थेट सोपी भाषा, प्रत्येक शब्द चपखल बसलेला...साधारणत्व व विश्वात्मकता... सचोटी आणि विनम्रता...एक प्रकारची गेयता...
जाधव पुढे म्हणतात :
"स्वतःच्या कवितांना चाल लावण्याचा प्रयत्न ते करीत होते... 'स्वतःचे शब्द लिहून ते गायचे, हा माझा प्रकल्प अर्धवट राहिला' असे ते बोलताना एकदा म्हणाले...पखवाज शिकण्यासाठी त्यांनी अर्जुन शेजवळांकडे शिकवणी लावली होती...३५ वर्षांपूर्वी काही इंग्रजी गाणी लिहून ती स्वतः संगीतबद्ध केली होती आणि स्वतःच्या आवाजात गायली होती... चौथे गाणे 'you have slept on a railway platform' म्हणजे या सर्व गाण्यांचा क्लायमॅक्स आहे. हे गाणे ऐकताना रेलगाडी धाडधाड करत आपल्या ङ्गवाय येत आहे, असे वातावरण कोलटकरांनी निर्माण केले आहे. या गाण्याच्या शेवटी बराच वेळ शब्दरहित संगीत ऐकू येत रहाते आणि हळूहळू रेल्वे दूर निघून गेल्याचे (बहुदा त्या माणसाच्या अंगावरून) भाव निर्माण होतात. हे गाणे कोलटकर यांच्या स्वानुभावर आधारित असावे असा तर्क निश्चितच करता येतो..."
डिलन यांचे १९६३ सालचे हे गाणे पहा:
(कोलटकरांचे 'मुंबईनं भिकेस लावलं' हे एक होबो साँगचं आहे.)
3>स्वतःचे शब्द लिहून ते गायचे...जे बॉब डिलन आज कित्येक दशक मोठ्या प्रभावीपणे करत आले आहेत, जे मराठीत मोठ्या प्रमाणात कित्येक शतकांपूर्वीपासून सुरु आहे, ते कोणी सुरु केल? प्रामुख्याने संत-कवींनी...आणि त्यात आघाडीला तुकाराम...
कै. म वा धोंड असा अंदाज (speculation) बांधतात की तुकाराम पंढरपुरात एकतारीवर शेवटचे कीर्तन करून कायमचे नाहीसे झाले..."... तुकोबांनी आपल्या संपूर्ण जीवनात कीर्तनाखेरीज दुसरे काहीही केले नाही. संपूर्ण जीवन म्हणजे दुष्काळोजर एकवीस-बावीस वर्षांचे जीवन. त्याची सुरवात एकादशीच्या कीर्तनाने झाली आणि सांगता निर्वाणाच्या कीर्तनाने..." (मटा, वार्षिक २००३)...
आणि डिलननी तरी दुसर काय केलय आयुष्यात, कीर्तनाशिवाय?...एकतारीच्या ऐवजी गिटार एवढाच फरक...
कोलटकरना तसे 'सुख' मिळाले नाही, ते कॅन्सर होऊन बिब्वेवाडी पुण्यात (ना कोल्हापुरात, ना मुंबईत) बिछान्यात गेले...आज त्यांची गाणी मला तरी कोणी मोठ्यांदा म्हटल्याचे ऐकू येत नाही...
हां तसा त्यांच्या 'द्रोण'च्या अभिवाचनाचा प्रयोग मी पुण्यात जानेवारी २००५ मध्ये पहिला होता... मला आवडला होता, त्याच्याबद्दल मी इंग्लिश मध्ये लिहल पण होत. पण कोलटकरना त्यापेक्षा जास्त भव्य अभिप्रेत असावं...आपण डिलनसारख्या कॉन्सर्ट बद्दल बोलतोय!
केशवसुत, बा सी मर्ढेकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर हे तुकारामांचे अनुयायी असतील, होते... पण तुकारामांचे वारसदार बॉब डिलन आहेत...
२०व्या शतकातील एका सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकात, 'पुन्हा तुकाराम' १९९०/१९९५, कै. दिलीप पुरुषोत्तम चित्रे तुकारामांच्या ४६००+ पैकी काही निवडक अभंगांचे असे वर्गीकरण करतात :
कवी असणे
माणूस असणे
भक्त असणे
तळमळत असणे
स्वतःच्या स्थळकाळात असणे
ज्ञानी असणे
संत असणे
ब्रह्मानंदी असणे
केवळ असणे
असण्याचा निरोप.
डिलन यांच्या गाण्याचे कोणी वर्गीकरण केलय का मला माहित नाही. पण वरच्या यादीतील 'संत असणे' हे सोडले तर, तीच यादी वापरता येईल!
David Remnick says on October 13 2016: "...Over time, Dylan has been a spiritual seeker—and his well-known excursions into various religious traditions, from evangelical Christianity to Chabad, are in his work as well—but his foundation is song, lyric combined with music,..."
a spiritual seeker?... होती ना तुकारामांची आठवण? आणि त्यांचा पाया होता, वरती उद्धृत केल्याप्रमाणे, कीर्तन...
डिलन यांना मी तुकारामांचे वारसदार म्हणतोय...त्यांची तुकारामांशी बरोबरी करत नाहीये...तुकाराम हे मराठी भाषेच्या आणि आधुनिक महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहेत...डिलन तशी जागा इंग्लिश मध्ये कधीही व्यापू शकणार नाहीत...तुकारामांच्या साहित्याची उंची शेक्सपिअर, गटे, पुष्कीन, टॉलस्टोय, चेखोव अशीच लोक गाठू शकले आहेत...डिलन त्यांच्या जवळपास सुद्धा नाहीत....पण दुर्बळांचा, दुर्लक्षितांचा आवाज, कवितेतील गेयतेचे महत्व, सादरीकरण, थेट, सरळ भाषा, अफाट लोकप्रियता, परात्मतेची बोच, अध्यात्मिकतेचा शोध हे त्या दोघातले साधर्म्य आहे.
(रवींद्रनाथ ठाकुर सुद्धा जास्त करून गीतकारच होते.)
4> A. E. STALLINGS, October 14 2016:
"The greatest poets have sought to make their poetry as musical as possible, not by setting them to music necessarily, but by bringing out the musical qualities of language. It is language’s music, after all, which makes poetry poetry. In turn, the greatest musicians have sought to make their music as poetic as possible, by enriching it with images and ideas which their compositional ingenuity has spun into gleaming jewels which light up our world and stretch our ability to feel it. But without poetry, music is just facile play."
उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णींच्या असंख्य पत्रातील एका पत्रात ते शैलेंद्र यांना ग. दि. माडगूळकरांच्या तुलनेत कमी लेखताना दिसतात. शैलेंद्र हे जींएच्या योग्यतेचे साहित्यिक होते, गदिमांपेक्षा काकणभर चांगले गीतकार होते आणि जींएच्या पेक्षा हजारो-लाखो पटीने जास्त लोकप्रिय होते आणि अजूनही आहेत.
5> Cass R. Sunstein says on October 13 2016:
"Bob Dylan has surpassed Walt Whitman as the defining American artist..Dylan said in an interview that the song originated in a “long piece of vomit,” beginning with “steady hatred directed at some place that was honest” and ending with a kind of revenge, captured in the famous chorus: “How does it feel/To be on your own/With no direction home/Like a complete unknown/Like a rolling stone?”
The key words are: As people sang the chorus along with Dylan, they were exhilarated, jubilant, exultant. Far from laid low, they were unchained. This is what millions of people experience in Maharashtra today when they sing poetry of Marathi saint-poets. Kolatkar NEVER had that satisfaction. In this regard, he could never become even a little bit like Marathi saint-poets.
6> Liz Thomson writes on October 13 2016:
"The Sixties icon took poetry off the bookshelves and put it on the jukebox...Homer and Orpheus were buskers and Dylan is their modern equivalent — the young man who took poetry off the bookshelves and put it on the jukebox. There can be no arguing that he changed the course of popular music. Not for him the “moon/June” rhymes of 1950s songwriters turning out bubble-gum kitsch. Shakespeare, Eliot, Lorca, Rimbaud, Steinbeck, Guthrie and the Bible were his touchstones. Dylan was the first singer-songwriter, his songs too long for a 45 rpm single. He inspired the Beatles. He wrote for the wronged and the dispossessed, about injustice and war, about love and revenge in songs that were sometimes simple and direct (“Blowin’ in the Wind”) but at the same time profound and mysterious:..."
Artist: Lee Lorenz (1932-), The New Yorker, April 7 1973
No comments:
Post a Comment