माधव जूलियन यांच्या कडे मी पुन्हा पुन्हा येतो त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या आणि माझ्या वडिलांच्या आयुष्यात असलेलं विलक्षण साम्य. (या बद्दल विस्ताराने नंतर एकदा.)
कै. महादेव पटवर्धन यांना "ज्यूलियन् ऍडरले" (Julian Adderley) असे म्हणायला त्यांच्या वर्गमैत्रिण शांता हेर्लेकर यांनी १९११ च्या सुमारास सुरु केले. त्यावरून महादेव पटवर्धन हे स्वेच्छेने आणि आवडीने 'माधव जूलियन' झाले.
हे ज्यूलियन् ऍडरले, मेरी काॅरेली (१८५५-१९२४) यांच्या 'God's Good Man: A Simple Love Story' (1904) या कादंबरीतील एक पात्र आहे, जे कविता करून दोन मुलींना वाचायला एकाच वेळी देत असत. आणि शांताबाई म्हणतात, माधवराव पटवर्धन तसेच करत असत. (पृष्ठ: ३९-४०, 'माधव जूलियन', गं. दे. खानोलकर, १९५१-१९६८)
“... True — go on with the problem,” — said Julian vaguely, taking off his hat and raking his hair with his fingers as he was wont to do when at all puzzled— “The problem is— ‘why do I write poetry if nobody wants to read it’ — and ‘what’s the good’? Now, in the first place, I will reply that I am not sure I write ‘poetry.’ I try to express my identity in rhythm and rhyme — but after all, that expression of myself may be prose, and wholly without interest to the majority. You see? I put it to you quite plainly. Then as to ‘what’s the good?’ — I would argue ‘what’s the bad?’ So far, I live quite harmlessly. From the unexpected demise of an uncle whom I never saw, I have a life-income of sixty pounds a year. I am happy on that — I desire no more than that. On that I seek to evolve myself into SOMETHING — from a nonentity into shape and substance — and if, as is quite possible, there can be no ‘good,’ there may be a certain less of ‘bad’ than might otherwise chance to me. What think you?... ”
(यात्या पुस्तकातील काही अंश वाचून मला वाटले की शांताबाईंनी Julian Adderley हे नाव माधवरावांसाठी योग्य काढले होते , ते माधवरावांना सुद्धा पटले आणि म्हणून ते त्यांनी 'घेतले'. माधवरावांचे Julian Adderley याच्याशी इतर अनेक बाबीत साम्य असावेसे वाटते.)
A simple love story? शांताबाई आणि माधव जूलियन या दोघांमधल्या नात्याइतकी गुंतागुंतीची कथा मी कुठेच वाचली नसेल... एका क्षणी ते लग्न करायच ठरवतात पण ते फिस्कटत. त्या दोगांच्या संबंधात अनेक नाती निर्माण होतात आणि शेवटी आईचे चुंबन सुद्धा येते... २०व्या शतकातील पहिल्या भागात, मराठी पांढरपेशे लोक हे किती स्त्री-पुरुष नातेसंबंधात गोंधळून गेले होते, याचे हे आणखी एक उदाहरण. (२१व्य शतकात ह्या सीमेवर सगळ आलबेल आहे असा याचा अर्थ नाही.)
ह्या मेरी काॅरेली आज २०२१ साली महाराष्ट्रात कितीजणांना माहित असतील?
Marie Corelli (born
Mary Mackay) was a best-selling British novelist of the Victorian and
Edwardian eras, whose controversial works of the time often label her as
an early advocate of the New Age movement.
In the 1890’s Marie
Corelli’s novels were eagerly devoured by millions in England, America
and the colonies. Her readers ranged from Queen Victoria and Gladstone,
to the poorest of shop girls. In all she wrote thirty books, the
majority of which were phenomenal best sellers. Despite the fact that
her novels were either ignored or belittled by the critics, at the
height of her success she was the best selling and most highly paid
author in England.
No comments:
Post a Comment