परवा (मे २९) योगेश गौर वारले....
आज (जून ४) बासू चॅटर्जी वारले. असे वाक्य लिहून
त्यांच्या सिनेमांनी माझे भावविश्व एकेकाळी किती ढवळून निघाले होते ह्याची
सुरवात सुद्धा होत नाही.
Chhoti Si Baat (1975),
Chitchor (1976), Khatta Meetha , Priyatama (1977), Baton Baton Mein
(1979), हे त्यांचे सिनेमे अगदी आवडीने थेटर मध्ये पाहिले आहेत. दहावी
-बारावीची महत्वाची वर्षे त्यांनी dominate केली.रजनीगंधा(१९७४) या शतकात पाहिला.
त्यात सगळ्यात जास्त प्रभाव पाडणारा सिनेमा होता - छोटीसी बात.
पालेकर यांचे काम मला फार आवडले नाही. ते (म्हणजे त्यांचे पात्र) साधे , बावळट वगैरे सिनेमात कधीच दिसत नाहीत. सिनेनट सोडले तर त्या दिवसात सगळे तसेच दिसायचे. पालेकर त्या दिसण्या, वागण्याची नक्कल करतात. चांगले बेरके आहेत, स्वार्थासाठी काहीही करतील असे पहिल्या फ्रेम पासून वाटते.
सिनेमा बघून मी विद्या सिन्हा यांच्या मात्र प्रेमातच पडलो होतो. इतका त्यांचा अभिनय प्रामाणिक आहे. त्यानंतर काही महिनेतरी बऱ्यापैकी दिसणारी प्रत्येक मुलगी विद्या सिन्हा (त्याही वारल्या) दिसत असे! मी पालेकर आहे असे मात्र कधी वाटले नाही.
No comments:
Post a Comment