Artist: Paul Noth, The New Yorker, September 2015
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Monday, August 06, 2018
पुन्हा कध्धी, कध्धी अमेरिकेला धमकावू नका ...America Means Business and God's On Her Side!
Artist: Paul Noth, The New Yorker, September 2015
Thursday, August 02, 2018
इरावती डॉल्फिन ते मोबी डिक.... A Year From Now, Herman Melville Will Be 200
Today August 2 2018 is the beginning of the bicentenary of Herman Melville's birth (Aug 1 1819-Sept. 28 1891).
विलास सारंग:
"...मराठी वाचकांनी तर मोबी डिकसारखी कादंबरी वाचलीच नसती. (त्यांना वांती झाली असती) मोबी डिकमधली काही वर्णनं मोठमोठं व्हेल मासे कापण, भल्या मोठ्या परातीत ते तळण, धुराचा उग्र वास आणि हे सगळं रात्रीच्या काळोखात; अक्षरशः नरकाचं (Hell) वर्णन शाकाहारी वाचकांना 'टू मच' वाटेल..."
('लिहित्या लेखकाचं वाचन', २०११)
वरील अवतरण जीएंची आठवण पुन्हा एकदा देऊन गेलं, त्यातील metaphor (रूपक) शब्दामुळे - जीएंचा आवडता शब्द . जेम्स वूड म्हणतायत की मेल्व्हील, जे श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या मध्ये हिंसकपणे लटकत होते, या कल्पनेने हादरले होते की परमेश्वराकडे रूपकातून पोचता येत नसेल तर तो फक्त एक रूपक आहे... जीएंना हे आवडल असत अस वाटत कारण जीए स्वतः श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या मध्ये प्रवास करताना मला दिसतात ...
खालील दोन्ही कार्टून पूर्वी या ब्लॉगवर येऊन गेलीयत पण पुन्हा द्यायला तेवढाच आनंद होतोय .... दोन्ही मध्ये Captain Ahab आहेत... Kanin यांच्या कार्टून मध्ये देवमाशाचा आकार इरावती डॉल्फिन एवढा झाला आहे... मेल्व्हील यांचा लेखक म्हणून प्रवास मात्र इरावती डॉल्फिन ते मोबी डिक.असा होता!
Artist: Benjamin Schwartz, The New Yorker , November 2015Artist: Zachary Kanin, The New Yorker, October 2015
हर्मन मेल्व्हील यांचा लेखक म्हणून गेल्या दोनशे वर्षातील प्रवास मात्र इरावती डॉल्फिन ते मोबी डिक असा आहे ......
Tuesday, July 31, 2018
Sunday, July 29, 2018
Wednesday, July 25, 2018
मिकेलएंजेलों, फ्रान्झ काफ्का आणि पीटर स्टायनर यांचा मोझेस....In the End Men Can Only Lead By Means of Harsh, Inexorable Judgement.
शिल्पी कलाकार: मिकेलएंजेलो (Michelangelo)
courtesy: Wikipedia
कलाकार: पीटर स्टायनर (Peter Steiner), दि न्यू यॉर्कर, मे १७ १९९९
Saturday, July 21, 2018
हं ! चंद्र पलिकडेच आहे, मधुचंद्र उरकूनच या !!...One Giant Leap For Mankind Will Be 50 Soon
माझ या जगातल पहिल दशक चंद्ररोहणमय होत.... सगळीकडे अपोलो यानाच्या प्रतिकृती... दिवाळीतल्या किल्ल्यांवर, गणेशोत्सवात.... दिवाळी अंकात... हिंदी , मराठी सिनेमाच्या डायलॉगमध्ये, गाण्यांत: आता चंद्रावर पोचलो म्हणजे मानव म्हणून कशी महान प्रगती केली वगैरे अशा अर्थाचे शब्द .. चंद्राला पाय लावला म्हणजे आता भविष्यावरती लोकांचा विश्वास कमी होणार अशी भाकीत... (माझ्या आधीच्या दोन पोस्ट पहा : १, २) वगैरे... आणि आज पहा: चंद्र ज्याचा भाग आहे असे उपास तापास भरपूर चालू असतील, करवाचौथ सारखे व्रत माझ्यासारख्यांना (जे कित्येक वर्षे माहीतच नव्हते) माहित झाले, पण एरवी बहुतेक कोणी मान वर करून चंद्राकडे बघायला तयार नाही.... अशी असतात सांस्कृतिक फॅड्स....
आज मानवाला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर मानव असा पर्यावरणाचा नाश करत राहिला तर पृथ्वीवर कितीकाळ टिकू शकेल.... आणि म्हणून डिनोसार आता फॅड् आहेत कारण त्यांनी कोट्यवधी वर्ष पृथ्वीवर राज्य केलं...
पन्नास वर्षात मानवाच जग, महायुद्धाशिवाय, इकडच तिकड झाल....
श्याम जोशींचे खालील चित्र पुढच्या दशकातले, थोड उशीराच... दि. जोशी बऱ्याच जणांना त्यांच्या सुंदर व्यंगचित्रांमुळे ('कांदेपोहे', रविवारचा महाराष्ट्र टाईम्स) माहित आहेत पण त्यांनी अतिशय सुंदर मुखपृष्ठे आणि सजावट केली आहे... इतके प्रेमळ आणि लडिवाळ चित्र!.... त्यांची अशी चित्र मला दीनानाथ दलालांची आठवण करून देतात....
नवविवाहित कसे धूमकेतू/ अस्टेरोइड सारखे दाखवलेत पहा.... पुरुषाचे डोळे मिटलेले आहेत, बाईचे उघडे...








