मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Thursday, December 05, 2024

ॲनी बेझंट , र. धों. कर्वे...Badass Annie Besant, She Came Before Margaret Sanger, Marie Stopes, R D Karve

य दि फडके: "... ब्रॅडलॉ आणि   बेझंट यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष संततिनियमनाकडे वळले असावे..." (पृष्ठ ५०, 'र. धों. कर्वे', १९८१). आगरकर संततिनियमनाच्या बाजूने पूर्णपणे होते आणि त्यांचा 'स्त्रीदास्य विमोचन' निबंध- ज्यात संततिनियमन येते- प्रसिद्ध आहे.

अजूनही ॲनी  बेझंट भारतात कीर्तिरूपे 'जिवंत' आहेत. चेन्नई चे उच्चभ्रू वस्ती असलेले बेसंट नगर त्यांच्या नावाची आठवण करून देत असते.

२०२४ च्या सुरवातीला, Michael Meyer यांचे "A Dirty, Filthy Book: Sex, Scandal, and One Woman’s Fight in the Victorian Trial of the Century" हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

हे ॲनी  बेझंट यांच्यावर झालेल्या १८७७ मधील प्रसिद्ध खटल्यावर आहे.लेखकाचे ह्या पुस्तकाबाबत मनोगत ऐकायचे असेल तर History Extra चा हा पॉडकास्ट ऐका.

In 1877 she was involved in one of the trials of the century when she was arrested for publishing an “obscene” pamphlet about sexual education and birth control. Fruits of Philosophy: or the Private Companion of Young Married People was the Lady Chatterley of its time, except that it was written by a reputable American physician, Charles Knowlton. He explained the physiology of conception and methods to treat infertility and impotence, and briefly described a method of avoiding pregnancy by using a sponge to wash the vagina after intercourse.

Victorian society was scandalised when Besant republished the book from her private printing press. She had insisted that the reprint should have a low price of sixpence to reach the working-class population who could most benefit from effective birth control."

बेझंट ह्यांना बहुतेक भारतीय अगदी वेगळ्या कारणांसाठी ओळखतात मी ही त्यातलाच आणि मला ह्या पुस्तकाची परीक्षणे वाचून असे वाटले की मी त्यांना ओळखलेच नाही

य दि फडके त्या खटल्याचा उल्लेख वरील पुस्तकात करतात पण त्यातून  बेझंट बाईंना झालेला त्रास, त्याग आणि त्यांचे व्यक्तिमत्व समजत नाही. त्या र धों कर्व्यांइतक्या किंवा जास्तच लढाऊ होत्या, बंडखोर होत्या.

ह्या तर . धों. कर्वे ह्यांच्या 'पूर्वज' निघाल्या. 

भारतात त्यांनी इतर कार्ये (होमरुल चळवळ, थिऑसॉफिकल सोसायटी वगैरे) न करता संततिनियमन, कुटुंब नियोजना वरती काम केले असते तरी त्या आज तेवढ्याच , किंचित जास्तच लक्षात राह्ल्या असत्या.