#MoonlandingAt50
आज जुलै २१
२०१८ला मानवाने पहिल्यांदा चंद्रावर
उतरणे या घटनेच्या
सुवर्ण जयंती वर्षाची सुरवात
होत आहे
Italo Calvino, ‘The Distance of the Moon’, 1965:
“....In reality, from the top of the ladder, standing erect
on the last rung, you could just touch the Moon if you held your arms up. We
had taken the measurements carefully (we didn’t yet suspect that she was moving
away from us); the only thing you had to be very careful about was where you
put your hands. I always chose a scale that seemed fast (we climbed up in
groups of five or six at a time), then I would cling first with one hand, then
with both, and immediately I would feel ladder and boat drifting away from
below me, and the motion of the Moon would tear me from the Earth’s attraction.
Yes, the Moon was so strong that she pulled you up; you realized this the
moment you passed from one to the other: you had to swing up abruptly, with a
kind of somersault, grabbing the scales, throwing your legs over your head,
until your feet were on the Moon’s surface. Seen from the Earth, you looked as
if you were hanging there with your head down, but for you, it was the normal
position, and the only odd thing was that when you raised your eyes you saw the
sea above you, glistening, with the boat and the others upside down, hanging
like a bunch of grapes from the vine....”
माझ या जगातल पहिल दशक चंद्ररोहणमय होत.... सगळीकडे अपोलो यानाच्या प्रतिकृती... दिवाळीतल्या किल्ल्यांवर, गणेशोत्सवात.... दिवाळी अंकात... हिंदी , मराठी सिनेमाच्या डायलॉगमध्ये, गाण्यांत: आता चंद्रावर पोचलो म्हणजे मानव म्हणून कशी महान प्रगती केली वगैरे अशा अर्थाचे शब्द .. चंद्राला पाय लावला म्हणजे आता भविष्यावरती लोकांचा विश्वास कमी होणार अशी भाकीत... (माझ्या आधीच्या दोन पोस्ट पहा :
१,
२) वगैरे... आणि आज पहा: चंद्र ज्याचा भाग आहे असे उपास तापास भरपूर चालू असतील, करवाचौथ सारखे व्रत माझ्यासारख्यांना (जे कित्येक वर्षे माहीतच नव्हते) माहित झाले, पण एरवी बहुतेक कोणी मान वर करून चंद्राकडे बघायला तयार नाही.... अशी असतात सांस्कृतिक फॅड्स....
आज मानवाला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर मानव असा पर्यावरणाचा नाश करत राहिला तर पृथ्वीवर कितीकाळ टिकू शकेल.... आणि म्हणून डिनोसार आता फॅड् आहेत कारण त्यांनी कोट्यवधी वर्ष पृथ्वीवर राज्य केलं...
पन्नास वर्षात मानवाच जग, महायुद्धाशिवाय, इकडच तिकड झाल....
श्याम जोशींचे खालील चित्र पुढच्या दशकातले, थोड उशीराच... दि. जोशी बऱ्याच जणांना त्यांच्या सुंदर व्यंगचित्रांमुळे ('कांदेपोहे', रविवारचा महाराष्ट्र टाईम्स) माहित आहेत पण त्यांनी अतिशय सुंदर मुखपृष्ठे आणि सजावट केली आहे... इतके प्रेमळ आणि लडिवाळ चित्र!.... त्यांची अशी चित्र मला दीनानाथ दलालांची आठवण करून देतात....
नवविवाहित कसे धूमकेतू/
अस्टेरोइड सारखे दाखवलेत पहा.... पुरुषाचे डोळे मिटलेले आहेत, बाईचे
उघडे...
चित्रकार: श्याम जोशी, वाङ्मय शोभा, दिवाळी १९७५
No comments:
Post a Comment