मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Tuesday, July 26, 2016

बोटाने तो इंद्रधनुष्य काढतो... पॉकेमॉन दिसत होता, जीएंच्या डॉन आणि सँकोला!...Augmented Reality



जी कुलकर्णी:
"अरे, निर्बुद्ध, जड़ जगाविषयी बदलती रुपके करत राहण्यापेक्षा तुझ्या रुपकांप्रमाणे जर जग बदलत जाऊ लागले तर तुला तरी जास्त काय हवे सांग."

Orson Welles:
“What we professional liars hope to serve is truth. I’m afraid the pompous word for that is art. Picasso himself said it. Art, he said, is a lie, a lie that makes us realize the truth.” The alternative is grim. “Reality? It’s the toothbrush waiting at home for you in its glass, a bus ticket, a paycheck, and the grave.”..."


Network (1976):
“...You're beginning to believe the illusions we're spinning here, you're beginning to believe that the tube is reality and your own lives are unreal. You do. Why, whatever the tube tells you: you dress like the tube, you eat like the tube, you raise your children like the tube, you even think like the tube. This is mass madness, you maniacs. In God's name, you people are the real thing, WE are the illusion...”
“...As you move around a city, a park, or a beach, your smartphone’s camera gives you an “augmented” view of your surroundings, so you can spot the fictional creatures under a real-life tree or perched on a real-life park bench...”
 ('How the Pokémon Go craze went corporate')

लोकसत्ता , जुलै  २३ २०१६:
"...मात्र हा खेळ अन्य खेळांहून एका बाबतीत वेगळा आहे, तो म्हणजे त्यासाठी वापरण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान. वास्तव आणि अवास्तव यांची सांगड घालून वास्तवाचे उत्कटीकरण करणे हा या तंत्रज्ञानाचा गाभा. मोबाइल फोनमधील कॅमेरा, जीपीएस यांची सांगड घालून हा खेळ मोबाइलमधील संगणकीकृत वास्तव आणिवास्तवातील वास्तव हे एकाच प्रतलावर आणतो. हा खेळ सुरू करायचा. कॅमेरा रोखत पुढे पुढे चालत जायचे आणि अचानक आपणांस परिसरातील एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी खेळातील पात्र दिसते. ते टिपायचे आणि आपले गुण वाढवायचे असे ते चाललेले असते. त्यातील ठिकाण खरे असते, पात्र मात्र संगणकीय असते. वास्तव आणि आभास या दोन मितींमधले आपले जगणे हे या खेळाने असे एकाच ठिकाणी आणून ठेवले आहे. आजवरच्या संगणकीय खेळांनी माणसांना आभासी विश्वातच अडकविले होते. या खेळाने त्याला थोडे खऱ्या जगात आणून सोडले. हाही तसा वेगळा आभासच. परंतु यामुळे अनेकांना आपण वास्तव जगाशी जोडलो गेल्यासारखे वाटत आहे...”


Farfetch'd (Pokémon)

courtesy: The Pokémon Company

 After reading the above and witnessing my son's pursuit of the Pokémon, I realized how GA's Don could be seeing a Pokemon as he lay dying!   

"...डॉन सारखा खिडकीकडे पाहत आहे हे सँकोच्या ध्यानात आले. तेथून आत येणार वारा बंद करण्यासाठी तो उठला. सँको पुढे येताच वेडा  झटकन  झुडपाआड गेला. सँकोने खिडकी बंद करण्यासाठी हात पुढे करताच डॉन आवाज ओढत म्हणाला, "अरे, मला त्या वेड्याशी जरा बोलू दे. हे बघ माझे आता सगळे संपले. मी उद्याचे ऊन पाहीन अशीदेखील आता शाश्वती नाही. तेंव्हा जो थोडा वेळ आहे तेवढा मला राहू देत."
 "वेडा, वेडा!", कपाळावर हात मारून घेत वैतागाने सँको म्हणाला. "म्हणजे अजून त्याने तुमची पाठ सोडली नाही तर ! पूर्वी तुम्हाला दिसायचा तोच हा, की नवा ताजा काढलात हा एक दुसराच? लाल ठिगळांचा लांब झगा घातलेलाच?"
 "होय, तोच."
"डोक्यावर घुंगरू लावलेली उंच, टोकदार टोपी आहे, हातात घंटा लावलेली काठी आहे आणि बोटाने तो  इंद्रधनुष्य काढतो तोच ना?"
"होय रे होय, तोच." डॉन समाधानाने म्हणाला... "
(जी कुलकर्णी, 'यात्रिक'/ऑगस्ट १९७५, 'पिंगळावेळ'/ १९७७)


How does that Pokemon look?

लाल ठिगळांचा लांब झगा घातलेला... डोक्यावर घुंगरू लावलेली उंच, टोकदार टोपी आहे, हातात घंटा लावलेली काठी आहे आणि बोटाने तो इंद्रधनुष्य काढतो...