जीएंच्या 'स्वामी' मध्ये हे वाक्य वाचून कुतूहल फार वाढले..."... त्या दिवशी तो आंघोळीसाठी जात असता स्वतःशी म्हणाला, आज तू अगदी गोपीचंद स्नान कर. का, तर आज तुझा वाढदिवस आहे !..." (पृष्ठ ४६, पिंगळावेळ, १९७७)
हा गोपीचंद कोण? मला अजिबात माहित नव्हते.
जुलै २०२४ मध्ये त्याच्या बद्दल सविस्तर माहिती पहिल्यांदा मराठी पुस्तकात वाचली.
पृष्ठ ७४, 'संस्कृतीच्या प्रांगणात', १९६९-२०१२, लेखक - पं महादेवशास्त्री जोशी (१९०६-१९९२)