राज कपूर यांचे आमच्या घरात अग्रणी स्थान होते ... माझे वडील आम्हाला त्यांचे सिनेमा बघायला प्रवृत्त करायचे ... बाकीच्यांना नाके मुरडायांचे ... (नंतर मी त्याची कसर भरून काढली!)... त्यांचे फार कमी सिनेमे मला खूप आवडले - जागते राहो, श्री ४२०, बूट पॉलीश , चोरी चोरी , मेरा नाम जोकर, बॉबी ...
माझ्या आई बरोबर वडिलांचे जे प्रेमप्रकरण १९५०च्या दशकात पुण्यातील पंतगोटात सुरु होते , त्यावेळी त्या दोघांना राज कपूर नर्गिस म्हटले जात असे मी नंतर ऐकले आहे ...
दोन्ही प्रेमप्रकरणे फार यशस्वी झाली असे आज २०२४ साली म्हणवत नाही ..
राज कपूर आणि माझे वडील यांच्या बद्दल खूप लिहता येईल पण ते करायला मन धजावत नाही ... बऱ्याचदा त्त्यांचे सद्गुणच आठवतात ... त्यांचे माझ्यावरचे उपकार आठवतात ...
आणि आज तर कपूर यांची जन्मशताब्दी..
Rishi Kapoor:
"...I have seen my father lament about the lack of talent in his own time. He would get exasperated and say, ‘Thank God Mehboob and Shantaram are not around. If they’d seen the kind of films we’re making, they’d have committed suicide.’ I think my father may have wanted to do the same today. Towards the end of his life, he was horrified by how busy actors had become and how wages had shot up, and how little actors were involved in a film as a whole..."
Raj Kapoor in the greatest Hindi film ever made Amit Maitra and Sombhu Mitra's "Jagte Raho", 1956