Today August 2 2018 is the beginning of the bicentenary of Herman Melville's birth (Aug 1 1819-Sept. 28 1891).
विलास सारंग:
"...मराठी वाचकांनी तर मोबी डिकसारखी कादंबरी वाचलीच नसती. (त्यांना वांती झाली असती) मोबी डिकमधली काही वर्णनं मोठमोठं व्हेल मासे कापण, भल्या मोठ्या परातीत ते तळण, धुराचा उग्र वास आणि हे सगळं रात्रीच्या काळोखात; अक्षरशः नरकाचं (Hell) वर्णन शाकाहारी वाचकांना 'टू मच' वाटेल..."
('लिहित्या लेखकाचं वाचन', २०११)
वरील अवतरण जीएंची आठवण पुन्हा एकदा देऊन गेलं, त्यातील metaphor (रूपक) शब्दामुळे - जीएंचा आवडता शब्द . जेम्स वूड म्हणतायत की मेल्व्हील, जे श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या मध्ये हिंसकपणे लटकत होते, या कल्पनेने हादरले होते की परमेश्वराकडे रूपकातून पोचता येत नसेल तर तो फक्त एक रूपक आहे... जीएंना हे आवडल असत अस वाटत कारण जीए स्वतः श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या मध्ये प्रवास करताना मला दिसतात ...
खालील दोन्ही कार्टून पूर्वी या ब्लॉगवर येऊन गेलीयत पण पुन्हा द्यायला तेवढाच आनंद होतोय .... दोन्ही मध्ये Captain Ahab आहेत... Kanin यांच्या कार्टून मध्ये देवमाशाचा आकार इरावती डॉल्फिन एवढा झाला आहे... मेल्व्हील यांचा लेखक म्हणून प्रवास मात्र इरावती डॉल्फिन ते मोबी डिक.असा होता!
Artist: Benjamin Schwartz, The New Yorker , November 2015
Artist: Zachary Kanin, The New Yorker, October 2015
हर्मन मेल्व्हील यांचा लेखक म्हणून गेल्या दोनशे वर्षातील प्रवास मात्र इरावती डॉल्फिन ते मोबी डिक असा आहे ......
No comments:
Post a Comment