सदाशिव आत्माराम (स आ) जोगळेकर, वाङ्मयशोभा , दिवाळी अंक १९५९, भानू शिरधनकर यांना दिलेली मुलाखत :
"...ते पुढे म्हणाले, 'जुन्नर व देवगिरी सभोवतालच्या डोंगरांत असंख्य लेणीं आहेत. हे डोंगर सर्वथैव पोखरलेलेच आहेत म्हणाना! औरंगाबाद, वेरूळ व अजंठा हीं देवगिरीगटांतील लेणीं होत. वेरूळच्या काय पण भारतांतील सर्व लेण्यांत कैलासलेण्याचं स्थान अद्वितीय आहे. कैलासलेण्याला 'रंगमहाल'हि म्हणतात, कारण तें एकेकाळी रंगीत होतं. याची मांडणी, बांधलेल्या मंदिरासारखी आहे. मंदिराचा चौथरा मोकळा करण्यासाठी पाथरवटांना तीस लक्ष घनफूट खडक खोदून काढावा लागला आहे. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे कीं हें लेणं तयार करायला निदान शंभर वर्षे लागली असावीत. महाराष्ट्रांतील त्या वेळच्या कारागीरांनी आपल्या चार-पांच पिढ्या या कामी खर्ची घातल्या असाव्यात. एकाग्रता व सतत परिश्रमांचं हें एक चिरंतन स्मारक खास आहे. ताजमहाल बांधायला बावीस वर्षं लागली, जुम्मा मशिदीला चौदा आणि पिरॅमिडला वीस. या बांधकामांची आपण किती महती गातो! मग शंभर वर्षांच्या कोरीव कामाची आखणी करून या शिल्पांची घडण करणाऱ्या कारागिरीचं किती कौतुक करावं बरं!'..."
सौजन्य ChatGPT
