courtesy: Propaganda Poster Art Centre, Shanghai and Daily Mail, UK
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Wednesday, December 26, 2018
'The Sun is Chairman Mao, the Sun is the Communist Party' .....Mao Zedong@125
courtesy: Propaganda Poster Art Centre, Shanghai and Daily Mail, UK
Tuesday, December 25, 2018
Saturday, December 22, 2018
स्पॅनिश साहित्यातील समुद्र अनुपस्थिती आणि समुद्र न पाहता समुद्र...Marathi Literature is Not Alone
"…देशबंधू दासांची आणखी एक गंमत सांगते. त्यांनी 'सागरसंगीत' म्हणून समुद्रावर कविता लिहिल्या आहेत. समुद्रावर चाळीस कविता लिहिणारा हा जगातला एकुलता एकच माणूस. त्या कवितांबद्दल साने गुरुजींनी इतक सुंदर, इतक सुंदर लिहिलंय, की ते वाचल्यावर मला बंगाली भाषा शिकायचा मोह झाला. मी शिकले बंगाली आणि मूळ बंगालीतून 'सागरसंगीत'च मराठी भाषांतर केल…" ("ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी", लेखक : प्रतिभा रानडे, पृष्ठ: 59, 1998)
जी ए कुलकर्णी :
: "… मराठी साहित्यात समुद्राच वास्तव किती सातत्याने दुर्लक्षित केलं आहे, हे माझ्या विवेचनाच सार होतं… आपण वास्तवाच्या -वाङमयीन सामग्रीच्या- केवढ्या मोठ्या भांडाराला मुकतो आहोत, हे माझ्या लेखात निर्देशित केलं आहे...मराठी वाङमयातील समुद्राची अनुपस्थिती मराठी समाजाच्या संरचनेशी कशी निगडीत आहे, हे माझ्या लेखात स्पष्ट केलेलं आहे."
("वाङमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव", २०११, पृष्ठ ६६-६७)
नोव्हेंबर २०१७ मध्ये मी हॉर्हे लुईस बोर्हेस (Jorge Luis Borges) यांचे 'Conversations, Volume 1', २०१४ पुस्तक चाळत होतो. बोर्हेस यांच्या दीर्घ मुलाखतीचे हे पुस्तक आहे.
BORGES. The sea, yes, that’s so present in Portuguese literature and so absent in Spanish literature. For example, Quixote . . .
FERRARI. Set on a tableland.
BORGES. The Portuguese, on the other hand, the Scandinavians and—yes—the French since Hugo, feel the sea. Baudelaire felt it; Rimbaud in his ‘Le Bateau ivre’ felt a sea that he had never seen. Coleridge wrote ‘The Rime of the Ancient Mariner’ without having seen the sea; when he did see it, he felt betrayed. And Rafael Cansinos Assens wrote an admirable poem about the sea. I congratulated him and he answered, ‘I hope one day to see it.’ That is, the sea in Assens’ imagination and the sea in Coleridge’s imagination were superior to the mere sea of geography (laughs)...."
Wednesday, December 19, 2018
कोणी मॅरेथॉन पळली, आम्ही नाही पहिली...When Hucarras Ran Marathons...
निरोप्ये, हाकारी : कितीवेळा तो शब्द मी मराठी पुस्तकांतून वाचला असेल पण मला त्यांच्या बद्दल काहीही माहित नव्हते....
माईक डॅश यांच्या 'Thug: The True Story Of India's Murderous Cult' , २००५ पुस्तकातून समजलेली एक माहिती- निरोप्ये, हाकारी लोकांबद्दल (hucarras):
...These low-caste confidential messengers began their training at the age of six with regular ‘walking practice’. A year later, chosen boys started to run three miles at a stretch, moving at ‘a handsome trot’, and gradually increased this distance so that by the age of nine they could cross 10 miles of rough country without rest. Training continued for a further nine years until, at the age of 18, a freshly qualified hucarra would be issued with a water bottle, bread pan and other equipment and set to work. By then he would be capable of running anything up to 100 miles a day, and would be expected to possess a detailed knowledge of the sacred Vedic texts, astronomy, music, five Indian languages and six varieties of script – not to mention being a master of disguise."
ते तत्कालीन मागास वर्गीय समाजातले असत... त्यांना वेद, खगोलशास्त्र , संगीत, ५ भाषा आणि ६ लिप्या माहित असत आणि त्याशिवाय बहुरूपी.... १८व्या वर्षी ते दिवसाला १६० किमी पळू शकत असत!... (किती घोडेस्वार सुद्धा दिवसाला १६०किमी जाऊ शकत असतील?.... माझा ह्या आकड्यावर अजून विश्वास बसत नाहीये)...भारतात मॅरेथॉन चॅम्पियन कसे होत नाहीत?...
ह्याचा अर्थ त्याकाळात भारतातील अनेक भागात मॅरेथॉन नकळत पळाली गेली आहे... पण एक प्रश्न उरतोच...
Artist : Farley Katz , The New Yorker, November 2017
Saturday, December 15, 2018
चांदोबाचे आपल्यावरचे ऋण....Our Debt to Chandamama
लहानपणी (१९६८-६९ च्या पुढे) घरी विकत घेऊन किंवा बाहेर कुठेतरी , 'चांदोबा' मासिक नेहमी पाहण्यात यायचे.... (माझ्या वडिलांना चांदोबा अजिबात आवडत नसे त्यामुळे आम्ही तो कधी नियमित विकत किंवा वर्गणी लावून घेतला नाही. मात्र किशोर मासिक launch झाल्यावर त्याचे पहिल्या अंकापासून काही वर्षे आम्ही वर्गणीदार होतो.)....
चांदोबा हे त्याच्या काळात (म्हणजे कित्येक वर्षे) मराठीतील सर्वात जास्त लोकप्रिय मासिक असावे....बाबुराव अर्नाळकर, एस एम काशीकर , गुरुनाथ नाईक इत्यादी यांच्या रहस्य कथांच्या कित्येक पट चांदोबा खपत आणि वाचला जात असावा .... कित्येक साक्षर, नवसाक्षर लोक (प्रौढ, वृद्ध, तरुण, बाल, स्त्री, पुरुष, transgender, सर्व जात, धर्म ,गरीब, श्रीमंत) एकच पुस्तक वाचायचे: चांदोबा!..... चांदोबा (वर्तमानपत्रा सारखा) वाचुन घेतला जात असल्याचे सुद्धा मी पहिले आहे.....talk about audio books!
आणि मजा पहा, हे मासिक चेन्नाई मध्ये तयार आणि वितरीत व्हायचे.... आणि ते जवळजवळ सगळे अनुवादित असायचे .....(कै. वि स खांडेकर हे नाव तमिळनाडूत लोकांना तामीळ माणसाचे नाव वाटायचे इतके खांडेकर तिकडे माहित होते आणि इकडे चांदोबा इथला होऊन राज्य करत होता)....कोण म्हणते मराठीत अनुवाद लोकप्रिय नाहीत?.....
आणि त्यामुळे त्यातील चित्रे नेहमी थोडी गंमतशीर वाटत...मी लहानपणी मिरजेला, म्हणजे कर्नाटकाच्या सीमेवर जरी रहात असलो तरी तसे कपडे घातलेले , केशभूषा असलेले, दागिने घातलेले स्त्री-पुरुष मला कधी दिसायचे नाहीत! माझी आई काहीशी दीनानाथ दलालांच्या चित्रातल्या स्त्रियांसारखी दिसायची, चांदोबातल्या स्त्रियांसारखी नाही....चांदोबातील पुराणातील पात्रे सुद्धा राजा रविवर्मांच्या चित्रांहुन (जी अनेक आमच्या जवळच्या दत्ताच्या देवळात लावलेली होती) वेगळी वाटत....
पण कधी मद्रास कडचा सिनेमा बघितला, उदा: तीन बहुरानियां, १९६८, की वाटायच हलता चांदोबा बघतोय .... पण त्या स्त्रीया आकर्षक मात्र वाटायच्या... हे चांदोबाच्या कलाकारांचे यश होते....
१९८१साली ज्यावेळी मी मद्रास ला शिकायला गेलो त्यावेळी गिंडीहून दोन-तीन बसेस बदलून चांदोबाच्या ऑफिस च्या बाहेर पर्यंत वडापलानीला जाऊन आलो .....(मद्रास मध्ये चांदोबातल्यासारखे स्त्री पुरुष दिसायला लागले होतेच!)
चांदोबा आता इतिहासजमा झालेला आहे... मराठीतील पोषाखी समीक्षक वृंद त्याचे महाराष्ट्रावरचे सांस्कृतिक (आणि थोडे सामाजिक सुद्धा) ऋण कधीच मान्य करणार नाही...
Artist: सिवासंकरन (शंकर)
चांदोबाचे इतर प्रसिद्ध कलावंत होते: केसवा राव, वीरा राघवन (चित्रा), वापा, बाशा (राझी), गांधी, महेश, आचार्य
Thursday, December 13, 2018
....ही 'आपली' अमेरिका ....Republican Presidents From March 1861 - December 2018
लिंकन (पाठमोरे) आणि आयसेनहावर (लिंकन यांच्या समोर बसलेले) सोडेले तर उर्वरित जगाने चित्राकडे पाहून चळाचळा कापावे आणि कापता कापता प्रचंड हसावे अशी परिस्थिती आहे.... ....
ह्या चित्राकडे मी एक कॅप्शन नसलेले कार्टून म्हणून पण पाहतोय आणि त्याला काय कॅप्शन जोडता येईल याचा विचार करतोय....
टेडी रूसवेल्ट : "एब आणि आइक तुम्ही थोडे गप्प बसा आणि ऐका ... डॉलर ते आण्विक हत्यारे असे कुठलेही मार्ग वापरून असं साम्राज्य निर्माण करू की जगाला वाटेल याच्या तुलनेत रोमन, मंगोल, आणि ब्रिटिश साम्राज्य हे लुटुपुटुचे खेळ होते.... आणि विरोधी डेमोक्रॅट्स आपल्याला यामध्ये नक्की साथ देतील.... "
Tuesday, December 11, 2018
'काला पानी'ची साठ वर्षे...Kala Pani@60
#KalaPaniofRajKhoslaAt60
डिसेंबर ११ १९५८ रोजी, ६०वर्षांपूर्वी, राज खोसलांचा 'काला पानी' (Kala Pani) प्रदर्शित झाला.
या सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स देव आनंद , नलिनी जयवंतना मिळोत, पण मला फक्त लक्षात राहतात मधुबाला.... 'Achcha Ji Main Haari Chalo Maan Jaao' गाण म्हणणाऱ्या...
This is what Shammi Kapoor said about Madhubala:








