Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Saturday, January 06, 2018
Wednesday, January 03, 2018
माझ्या आईच्या पोर्ट्रेटवर बसलेली माशी...To Be a Man and Mortal...
जी ए कुलकर्णी, ऑर्फियस (१९७३), पिंगळावेळ, १९७७ :
Priam the king of Troy:
उजवीकडचा माझ्या आईचा फोटो, त्यावेळच्या एका प्रसिद्ध (आणि महागड्या), लक्ष्मी रोड, पुणे येथील , फोटो स्टुडिओत काढला आहे. माझ्या वडिलांनी त्यांना अजिबात न परवडणारे पैसे त्यासाठी खर्च केले होते. आईला केसात फुल घालून यायला फोटोग्राफरनी सुचवले होते. ते दोघे त्यावेळी, प्रेमविवाहानंतर नुकतेच, जवळजवळ कफल्लक होते. तिच्या गळ्यातले मणिमंगळसूत्र पहा. तेवढा एकच दागिना तिच्याकडे होता.
त्या फोटोचे खूप कौतुक आजपर्यंत मी बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे. मी ऐकल आहे की फोटोस्टुडिओत काही आठवडे तो 'display' वर सुद्धा होता.
डावीकडील १४७० सालचे, सुन्न करणारे, 'पोर्ट्रेट ऑफ ए वूमन ऑफ दि हॉफेर फॅमिली' चित्र २०१७मध्ये पाहिल्यावर वाटले, मी ती आईच्या फोटोतील माशी आई जाईपर्यंत जणू पहातच नव्हतो...
Sunday, December 31, 2017
फेसबुकावरील स्मारके -२....Memorials on Facebook-II
मराठीतील कित्येक दिवंगत लेखक, मासिके, वर्तमानपत्रे- ते टिकायचे असतील तर- इंटरनेट वर उपलब्ध होणे आवश्यक आहे...
'वाङ्मय शोभा'च्या पाठोपाठ माणूस , सत्यकथा, मौज, ललित (?) यांचे सर्व अंक उपलब्ध होणार असे ऐकून आहे ... हे अत्यंत स्वागतार्ह आहे....
पण त्यातील प्रत्येक गोष्ट searchable पाहिजे ... उदा: बुकगंगा वरचे 'वाङ्मय शोभा' चे अंक searchable नाहीयेत .... त्यामुळे गुगल सर्च मध्ये 'वाङ्मय शोभा' मधील result केंव्हाच येत नाही... आवडो न आवडो, विकिपीडिया आणि गुगल जे विसरत, ते हळूहळू सगळे विसरतात!
मराठी वर्तमानपत्रे, काही मासिके याबाबत बोटचेपी भूमिका घेत आहेत कारण त्यातील बरेच जण ब्लॉग, विकिपीडिया, फेसबुक, व्हाट्सएप, इंटरनेट मंडळे यांना आपला प्रतिस्पर्धी मानायला लागले आहेत (आणि ते बऱ्याच प्रमाणात खर आहे!). त्यामुळे ते त्यांचा बऱ्याचदा उल्लेख सुद्धा करत नाहीत. (इंग्रजी मधील प्रसिद्ध वर्तमानपत्रे, छापलेली मासिके मात्र त्यांचा उल्लेख आता जास्त करायला लागले आहेत.)
मराठी वर्तमानपत्रांचे भविष्य काय याबद्दल मला काहीही अंदाज नाही पण सध्या त्यांचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे फेसबुक आणि व्हाट्सएपला फीड किंवा विकिपीडिया बदला साठी संदर्भ म्हणून आहे. म्हणजे बरीच लोक वर्तमानपत्रे सोशल मीडिया वरती छायाचित्राच्या स्वरूपात फक्त पाहतात.
मराठी वर्तमानपत्रांकडून, मराठी लोकांच्या सर्व प्रकारच्या इतिहासाचे जतन करण्या बाबत thought-leadership ची अपेक्षा मी तरी करत नाही.
मराठीभाषेला डिजिटायझेशनच्या चळवळीची जास्त गरज आहे कारण सध्या त्यात लिहणारे बरेच जण 'wheel reinvent' केलेल्या आवेशाने लिहीत असतात. १९-२०व्या शतकात मराठीत विविध विषयावरती प्रचंड लेखन झाले आहे. त्यातले बरेच पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध सुद्धा झालेले नाही. ज्या लेखनाची पुस्तके झाली ती बाजारपेठेतून केंव्हाच नाहीशी झाली आहेत आणि त्यांचे पुनर्मुद्रण व्हायची शक्यता शून्य आहे. (बरीच लोक मला- मी प्रसिद्ध केलेल्या फेसबुक पेजवर- हे पुस्तक कुठे मिळेल असे विचारत असतात. ) लिखित शब्दांची ही अवस्था तर चित्रांची काय वर्णावी ? सध्या मराठीत फक्त 'committed' किंवा 'उपोयोगी' किंवा 'डाव्या' लेखनाचा/ कलांचा उदोउदो करण्याची फॅशन आहे. उदा: महात्मा फुले (१८२७-१८९०) यांचे बहुतांशी लेखन उत्तम स्वरूपात उपलब्ध आहे पण त्यांच्या बहुतेक समकालीनांची परिस्थिती बिकट आहे.
पण हे बदलू शकत. पुढच्या पिढ्यांना सर्व प्रकारच्या लेखनात इंटरेस्ट वाटू शकतो. त्यांच्या विचाराच्या कक्षा फार मोठ्या प्रमाणात रुंदावू शकतात. वर्तमानाचे बरे वाईटचे निकष पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीला लावण्याची घाणेरडी सवय त्यांना नसू शकते. आपण काहीतरी लिहण्या किंवा बोलण्याआधी इतिहासात अस कोणी लिहिल किंवा बोललय का अशी अभ्यासू सवय त्यांना असू शकते. अशावेळी डिजिटल presence फार उपयोगी पडू शकतो.
Starting August 15 2007, over the past decade and more, I have created a few pages on English Wikipedia:
Vasant Sarwate, T S Shejwalkar, M V Dhond, D G Godse, Y D Phadke, S D Phadnis, Sadanand Rege, Natyachhatakar Diwakar, C V Joshi
I have created a few Facebook pages too. Here, I have listed them in alphabetic order showing likes in December last year and this year.
| Facebook page | Address | Likes as of Dec 29 2016 | Likes as of Dec 25 2017 | %Change in 1 year | |
| 1 | B S Mardhekar& Co बा. सी. मर्ढेकर आणि कंपनी | https://www.facebook.com/myBaSeeMardhekar/?ref=bookmarks | 909 | 1138 | 25.2% |
| 2 | D G Godse, A Search शोध द. ग. गोडसेंचा | https://www.facebook.com/MastaniDaGaGodse/?ref=bookmarks | 356 | 524 | 47.2% |
| 3 | Dinanath Dalal (In Marathi: दीनानाथ दलाल) | https://www.facebook.com/artistdinanathdalal/?ref=bookmarks | 2329 | 2509 | 7.7% |
| 4 | Durga Bhagwat An Appreciation दुर्गा भागवत एक आस्वाद | https://www.facebook.com/durgabhagwatappreciation/?ref=bookmarks | 1341 | 1602 | 19.5% |
| 5 | G A Kulkarni, An Appreciation जी ए कुलकर्णी, एक आस्वाद | https://www.facebook.com/myGAKulkarni/?ref=bookmarks | 874 | 1183 | 35.4% |
| 6 | Gopal Dutt Kulkarni गोपाळ दत्त कुलकर्णी | https://www.facebook.com/gopalduttkulkarni/?ref=bookmarks | 3 | 39 | 1200.0% |
| 7 | Govindrao Tembe गोविंदराव टेंबे | https://www.facebook.com/GovindraoTembe/?ref=bookmarks | 639 | 860 | 34.6% |
| 8 | My Sadanand Rege माझे सदानंद रेगे | https://www.facebook.com/mySadanandRege/?ref=bookmarks | 431 | 582 | 35.0% |
| 9 | Natyachhatakar Diwakar नाट्यछटाकार दिवाकर | https://www.facebook.com/NatyachhatakarDiwakar/?ref=bookmarks | 78 | 155 | 98.7% |
| 10 | R D Karve, Who? र. धों. कर्वे, कोण? | https://www.facebook.com/rdkarve/?ref=bookmarks | 813 | 1071 | 31.7% |
| 11 | Ram Ganesh Gadkari राम गणेश गडकरी | https://www.facebook.com/RamGaneshGadkari/?ref=bookmarks | 1612 | 1842 | 14.3% |
| 12 | Remembering C V Joshi चिं वि जोशींच स्मरण | https://www.facebook.com/ChinViJoshi/?ref=bookmarks | 44 | 164 | 272.7% |
| 13 | Setu Madhavrao Pagdi, A View सेतु माधवराव पगडी, मला दिसलेले | https://www.facebook.com/mySetuMadhavraoPagdi/?ref=bookmarks | 963 | 1252 | 30.0% |
| 14 | Shripad Krushna Kolhatkar, The Greatest श्रीपाद कृष्ण कोल्हटकर | https://www.facebook.com/ShripadKrushnaKolhatkar/?ref=bookmarks | 502 | 685 | 36.5% |
| 15 | T S Shejwalkar, Lest We Forget त्र्यं. शं. शेजवलकर, विसरलो का? | https://www.facebook.com/HistorianShejwalkar/?ref=bookmarks | 307 | 526 | 71.3% |
| 16 | The Art of Vasant Sarwate वसंत सरवटे यांची कला | https://www.facebook.com/vasantsarwateappreciation/?ref=bookmarks | 893 | 1078 | 20.7% |
| 17 | Two Brothers in Tandem-R K - Narayan & Laxman | https://www.facebook.com/Two-Brothers-in-Tandem-R-K-Narayan-Laxman-283141975063419/?ref=bookmarks | 24 | 37 | 54.2% |
| 18 | Vilas Sarang, a literary critic विलास सारंग, टीकाकार | https://www.facebook.com/vilassarangcritic/?ref=bookmarks | 305 | 485 | 59.0% |
| 19 | Vishwanath Kashinath Rajwade विश्वनाथ काशिनाथ राजवाडे | https://www.facebook.com/VishwanathKashinathRajwade/?ref=bookmarks | 1155 | 1412 | 22.3% |
| 20 | Who was M V Dhond? कोण बर हे म. वा. धोंड? | https://www.facebook.com/MaVaDhond/?ref=bookmarks | 14 | 116 | 728.6% |
| 21 | य दि फडके, एक वाटाड्या Y D Phadke, A Guide | https://www.facebook.com/yadiphadkeaguide/?ref=bookmarks | 7 | 204 | 2814.3% |
| Total Likes for pages | 13599 | 17464 | 28.4% |
Friday, December 29, 2017
वेणी घालताना पाहून, बुचडा बांधताना पाहून.... “Boundless” by S S Hawaldar and Jillian Tamaki
खालील संयुक्त चित्रातील डावीकडील चित्र ह्या वर्षीच्या न्यूयॉर्क टाइम्स च्या २०१७च्या पुस्तकांच्या उत्कृष्ट मुखपृष्ठाच्या यादीत येत. \
त्या चित्राबाबत: “Boundless” by Jillian Tamaki, Designed by Jillian Tamaki , Publisher: Drawn and Quarterly
महत्चाची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स फक्त त्यावर्षीच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावर लेख छापत! (https://www.nytimes.com/…/20…/books/review/best-covers.html…) मी तरी तसा लेख- फक्त त्यावर्षीच्या मराठी पुस्तकांबाबत वाचला नाहीये...
ह्यावर्षीच मी ह्या ब्लॉगवर सप्टेंबर २५रोजी ही पोस्ट प्रसिद्ध केली: "कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!....वेणी घालताना पाहून...Manspreading is Ugly but Womanspreading?"
त्यामध्ये खालील संयुक्त चित्रातील उजवीकडील चित्र आहे , चित्रकार: एस एस हवालदार, वाङ्मय शोभा, जुलै १९५७.
Monday, December 25, 2017
Getting Jesus Off to Sleep...
Sunday, December 24, 2017
तूपाची मावशी: हिंदुस्तान लिव्हर लिखित चविष्ट अनंतअंकी कौटुंबिक मराठी नाटक.... Andy Warhol Would Have Created Dalda Art
#वसंतसरवटेपाहिलेपुण्यस्मरण
#VasantSarwateOneYearLater
Today December 24 2017 is the first death anniversary of Vasant Sarwate (वसंत सरवटे)...लोक तुमची फार आठवण काढताना मी वाचत नाही पण काळ जाईल, लोक जागे होतील आणि म्हणतील असा कलावंत महाराष्ट्रात होऊन गेला: "भारतातील आजवरचा सर्वोत्तम व्यंगचित्रकार"...
डालडा - माझ्या लहानपणचा एक अविभाज्य भाग ...लहानपणच का? अगदी मोठ होईपर्यंत सुद्धा म्हणता येईल ...पण आता मध्यमवर्गीय घरातून बदनाम झालेला.... तुपाला पर्याय म्हणून तर सोडा पण जणू विषच!....
डालडा त्यावेळी नुसता स्वैपाघरातच नाही तर सारखा जाहिरातीत दिसायचा, व्यंगचित्रात दिसायचा, लेखनात दिसायचा, दिवाळी अंकात दिसायच, डालडाचे डबे सगळीकडे दिसायचे, डालडाला तूप म्हटल जायच, आमच्या घरात त्याचा बराच वापर व्हायचा, डालडात तळलेले पदार्थ मला प्रचंड आवडायचे...डालडा त्यावेळी स्मार्ट होता!
सौजन्य : सरवटेंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
मराठीतील एका प्रचंड बेस्टसेलरच्या- पु ल देशपांडे लिखित 'बटाट्याची चाळ'- पहिल्या आवृत्तीच्या , १९५८ मुखपृष्ठाच्या केंद्रस्थानी काय आहे पहा: डालडाचा डबा !
कस पटवून द्यायच लोकांना की डालडा तुपापेक्षा भारी, आरोग्याला हानीकारक नसून चांगल आहे? प्रतिष्ठेच्या मराठी दिवाळी अंकात डालडा कथा लिहून! (पुढे मग 'लिज्जत' कविता आल्या.)
वरील वाङ्मय शोभेच्या ऑक्टोबर १९५८च्या अंकातील पान वाचा... प्रथमदर्शनी ही एक कथा वाटते...पण ती आहे डालडाची जाहिरात....उजव्या कोपऱ्यात खाली लेखकाचे नाव आहे: हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, मुंबई!
आहे ना प्रॉडक्ट प्लेसमेंट चे जबरदस्त उदाहरण....खर म्हणजे हिंदुस्तान लिव्हर न एखाद नाटक सुद्धा त्याकाळात स्टेज करायला पाहिजे होत: "तूपाची मावशी"
त्यामानाने भारतातील बहुतेक मोठ्या कलावंतांनी डालडाकडे दुर्लक्ष केलेल दिसतय... मला अँडी वॉरहॉल (Andy Warholl) यांच्या कॅम्बल सूपच्या आर्ट सारख म्हणायचय...
courtesy: copyright owners
मला माहीत नाही की कै. सरवटेंनी वॉरहॉलच्या ह्या आर्टची थट्टा त्यांच्या 'मॉडर्न आर्ट : अर्थ ज्याचा त्याचा' ह्या सिरीज मध्ये केली आहे का नाही ते. आज ते असते तर त्यांनाच डायरेक्ट विचारले असते. त्या सिरीजमधले एक उदाहरण ह्याच ब्लॉगवर इथे पहा.
Thursday, December 21, 2017
Tuesday, December 19, 2017
मी पोरबपो सगळीकडे वापरलं नाही आणि काही डाग तसेच ठेवले...Using Po Rub Po Selectively!
"मी पोरबपो सगळीकडे वापरलं नाही आणि काही डाग तसेच ठेवले कारण मला तुला तू किती ढिला आहेस याची सतत जाणीव करून द्यायची आहे."
Saturday, December 16, 2017
अलेक्झांडर-द- ग्रेट, तुम्ही पुन्हा जन्माला या....Alexander the great and Cleopatra
असे म्हणतात की महाराष्ट्रा वर सातवाहनांनी इतके चांगले राज्य केले की त्यांची आठवण लोक सातवाहन सत्ता नष्ट झाल्यानंतर जवळजवळ १००० वर्षे- म्हणजे साधारण सन १२०० पर्यंत- काढत असत.
२१व्या शतकात महाराष्ट्रातले सर्व राजकीय नेते शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करत असतातच पण सामान्य माणसाला तर शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर आहे की जगात काय, स्वर्गात सुद्धा त्यांच्या इतका चांगला मनुष्य, राजा नसेल अस त्याला वाटत आणि म्हणूनच महाराष्ट्रात राहणाऱ्या , मराठी येणाऱ्या, माणसाने आजपर्यंत एकदा तरी हे आवाहन नक्कीच वाचले आहे: "राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या."
२०१७च्या सप्टेंबर मध्ये, महाराज वारले त्याला ३३७ वर्षे झाली.
कुरुक्षेत्र केंव्हा झाले याचे अंदाज ख्रिस्त पूर्व ५५६१ पासून ख्रिस्त पूर्व ९५० पर्यंतचे आहेत. ट्रॉय चा पाडाव ११९४-११८४ ख्रिस्त पूर्व वर्षात झाला. अलेक्झांडर द ग्रेट ३२३ ख्रिस्त पूर्व वर्षात वारले. क्लिओपात्रा ख्रिस्त पूर्व ५१साली सत्तेवर आल्या, ११३८ आणि २७२ वर्ष त्या दोन घटनांनंतर.
जसे शिवाजी महाराज आणि महाभारत आपल्या जीवनाचा आजही भाग आहेत तसेच ट्रॉय चा पाडाव ही घटना आणि अलेक्झांडर-द-ग्रेट क्लिओपात्रांच्या जीवनाचा होते.
खालील दोन परिच्छेद वाचा.
क्लिओपात्रांच्या काळात घोड्यांच्या रथांच्या मागे कदाचित लिहले जात असेल: "अलेक्झांडर-द- ग्रेट, तुम्ही पुन्हा जन्माला या"....
courtesy: Wikipedia
Thursday, December 14, 2017
जपानी जोडे- ठाणे ते उटी....Raj Kapoor@93
Rishi Kapoor, ‘Khullam Khulla: Rishi Kapoor Uncensored’, 2017:
मी कै. कपूर यांना खालील कारणांसाठी मोठे मानतो :
१. जागते रहो
२. श्री ४२०
३. २/३ मेरा नाम जोकर
४. आवारा
५. बूट पॉलिश
६. तीसरी कसम
७. बॉबी
यातील पहिल्या दोन सिनेमातील तर प्रत्येक क्षण बघण्यासारखा आहे. 'श्री ४२०' चा शेवट सुद्धा लक्षात राहण्यासारखा आहे कारण तो बनवण्यामागची सौन्दर्य दृष्टी, अपार कष्ट... जे वरील अवतरणात शब्दबद्ध झाले आहेत.













