दिलीप पुरषोत्तम चित्रे, 'पुन्हा तुकाराम', १९९०-१९९५:
"... आधुनिक मराठी समीक्षकांना तुकोबांचे महत्व दिसले नाही, तर त्यामुळे एवढेच सिद्ध होते की, मराठी कवितेभोवती म्हणण्याजोगी वाङ्मयीन संस्कृतीच शिल्लक उरलेली नाही..." (पृष्ठ सोळा, प्रस्तावना)
विश्रब्ध शारदा या पुस्तकाचे सगळे खंड मराठी भाषेसाठी एक गौरवास्पद गोष्ट आहे ...
त्याचा तिसरा खंड "भारतातील चित्रकाल व शिल्पकला" या विषयावर असून ,. त्याचे संपादन ह वि मोटे आणि अरविंद मंगरूळकर यांनी केले असून , प्रस्तावना दिनकर कौशिक यांनी लिहली आहे.
मराठीत कोणत्या दर्जाचे लेखन होऊ शकते आणि व्हायचे त्याची झलक म्हणजे ती प्रस्तावना आहे.
मराठी साहित्यातील देशीवादा बद्दल थोडे वाचले आहे पण चित्रकले बद्दल ते वाचले नव्हते ...
कौशिक म्हणतात : "... अजिंठा दर्शनानंतर महाराष्ट्रीय चित्रकार स्वतःची अभिजात परंपरा ओळखूच शकले नाहीत. तिथल्या पद्मपाणी बुद्धासमोर किंवा श्यामा राजकुमारीसमोर उभे राहूनदेखील त्यांची सौन्दर्यचेतना रोमांचिली नाही...."
आणि ह्यात महादेव विश्वनाथ धुरंधर सुद्धा होते!
या उलट ज्यावेळी त्यांच्या नंतर २०वर्षांनी नंदलाल बोस जेंव्हा तिथे गेले , तेंव्हा ते उद्गारले : "... सौन्दर्याच्या अलिबाबा गुहेत आपण शिरलो आहोत ...
प्रस्तावनेतील तो मजकूर सोबतच्या दोन पानांवर वाचा ...
पृष्ठ २५-२६, प्रस्तावना , विश्रब्ध शारदा , खंड तिसरा , १९९३
चित्रकार मुकुल चंद्र डे (१८९५-१९८९) ह्यांनी त्यांच्या कोलकताहून , प्लेगच्या छायेत, खडतर प्रवास करून झालेल्या अजिंठा भेटीवर पुस्तक लिहले आहे: "My pilgrimages to Ajanta and Bagh" , १९२५.
"It is impossible for me to make my reader realize my feelings when I first saw the site of, the caves. I was spell-bound. The natural splendour of the scene, its utter seclusion, the amphitheatre of bills enclosing the glen with a rugged rampart, shaped like a crescent moon, the little murmuring stream which flowed so gently through a landscape of such wild grandeur affected me deeply. As I looked more closely I perceived that out of the stone, which was of a glorious tinge of bluish mauve, had been hewn richly carved arches and columns, and that these formed the entrance to a series of cave-temples surpassing all that I had imagined. My companion and I remained for long in silent ecstasy. I felt completely satisfied. Just this one vision repaid the trouble of my journey a thousandfold...
I was stunned but extremely happy when I first saw the paintings, for I felt that they had been done with the utmost care, and yet, I thought hereafter I would be able to cover similarly large pieces of walls by myself, in the same way. I actually fell in love with many; in fact with all of the paintings on the walls, especially some of the beautiful paintings of the most lovely women..."
Girl's Head, Cave 17 by Mukul Chandra Dey
अजिंठा, नंदलाल बोस यांना किती खोल भावले होते?
Deep Seek says on Jan 29 2025:
"नंदलाल बोस यांनी अजिंठा लेण्यांच्या भित्तिचित्रांचा अभ्यास केला आणि त्यातील कलात्मकता, रेषा, रंगसंगती आणि भावव्यक्ती यांनी त्यांच्या कलेवर खोल प्रभाव पाडला. अजिंठा चित्रांमध्ये बुद्ध आणि बोधिसत्त्वांच्या जीवनातील घटना, जातक कथा (बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा) आणि इतर बौद्ध विषयांचे चित्रण केलेले आहे. या चित्रांमधील सौंदर्य आणि कलात्मकता यांनी नंदलाल बोस यांच्या कलात्मक दृष्टिकोनाला नवीन दिशा दिली.
नंदलाल बोस यांनी अजिंठा कलेचा अभ्यास करून त्याचे आधुनिक कलेत समावेश केले. त्यांच्या चित्रांमध्ये अजिंठा कलेतील रेषा, रंग आणि भावनांचा वापर दिसतो. त्यांनी भारतीय कलेच्या परंपरेशी आधुनिकतेचे सुंदर सामंजस्य साधले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय कलेच्या इतिहासात अजिंठा कलेचे महत्त्व पुन्हा एकदा उजेडात आले.
अजिंठा लेणी ही
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि नंदलाल बोस
यांनी या कलेचा अभ्यास करून तिचे महत्त्व जगापुढे मांडले. त्यांच्या
कार्यामुळे अजिंठा कलेचा प्रभाव आधुनिक भारतीय कलेवर पडला आणि भारतीय
कलेच्या इतिहासात त्यांनी एक नवीन अध्याय जोडला."
No comments:
Post a Comment