रत्नाकर मतकरी, लोकसत्ता , नोव्हेंबर २०१२:
"...पुस्तक पाहताना पहिल्या क्षणीच ज्यांच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार होतो, त्या माझ्या उपकारकर्त्यांचा आता अगदी शेवटी उल्लेख करतो. हे आहेत अर्थपूर्ण, आकर्षक मुखपृष्ठं तयार करून पुस्तकाला चेहरा देणारे कसबी चित्रकार. माझं भाग्य थोर म्हणून माझ्या पुस्तकांना वसंत सरवटे, श्याम जोशी, रघुवीर तळाशीलकर, पद्मा सहस्रबुद्धे, सुभाष अवचट, पुंडलिक वझे, साईनाथ रावराणे, कमल शेडगे आणि अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी या सर्वच काळात आधुनिक ठरलेल्या थोर चित्रकारांची मुखपृष्ठं लाभली!..."
पद्मा , सौ पद्मा म्हणजेच पद्मा सहस्त्रबुद्धे (Padma Sahasrabuddhe) .... कितीतरी मराठी पुस्तकांची उत्कृष्ट मुखपृष्ठे त्यांनी केली आहेत ... त्यांनी आणि वसंत सहस्रबुद्धेंनी कितीतरी वर्षे 'वाङ्मय शोभा' सजवले ... (पहा http://searchingforlaugh.blogspot.com/…/mukhprushtha-shobha…)
काही वर्षांपूर्वीच माझ्याघरी एकदा आले असता कै वसंत सरवटेंनी सुद्धा पद्मा सहस्त्रबुद्धे यांच्या कामाची खूप तारीफ केली होती.
सर्व चित्रांसाठी कृतज्ञता: पद्मा सहस्त्रबुद्धे, वाङ्मय शोभा, बुकगंगा.कॉम
हे त्यांचे चित्र मला फार आवडले.. हा जो मॉडर्न लुक त्यांनी त्या स्त्रीला दिला आहे तो त्याकाळी (१९७३) भारतात प्रचलीत नव्हता....हिंदी सिनेमातील त्याकाळातील स्त्रिया पहा .... नूतन, गीताबाली , नर्गिस , मधुबाला , मीनाकुमारी नंतरचा काळ .... केसाचे घोसले... स्लीव्हलेस... मोठ्या आयलॅशेस.... कृत्रीम पणे बोलणे ... कानात, गळ्यात मोठ , बटबटीत ....कपाळावर कुंकू नाही...
कोण असेल श्रीमती पद्माच्या डोळ्यासमोर ?
No comments:
Post a Comment