#fifa
Today June 14 2018, 21st FIFA world cup starts
T. S. Eliot, 'The Love Song of J. Alfred Prufrock'::
".....I have measured out my life with coffee spoons;...."
Brian Cumings:
"...Football is hope against experience, desire against frustration, time captured while time is lost. Perhaps football is not an escape from life, it is like life after all..."
वर्ल्डकप च्या संबंधातील माझी एक अतिशय हृद्य आठवण आहे. कोरियात झालेला त्यावर्षीच्या कप मधील खेळाचा दर्जा १९७०च्या कप सारखा उत्कृष्ट होता- (मी १९७० पेले कप live पहिला नाहीये, १९८६पासून सगळे live पाहिलेत, त्या आधीचे सिनेमाच्या आधी Indian news मध्ये थोडे highlights आणि अर्थात काही वर्षांनंतर TV वर). कोरियात असल्यामुळे टीव्ही वर पाहायला वेळा सुद्धा भारतासाठी सोयीच्या होत्या.
जून ३० २००२ला जेंव्हा वर्ल्डकप संपला तेंव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा ढसढसा रडायला लागला. आम्हाला समजेचना. त्याने आणि मी जवळ जवळ जमेल तेवढा कप शेजारी बसून टीव्ही वर पहिला होता. मग त्याने सांगितले की वर्ल्डकप संपला म्हणून रडू आले!
मला त्याचा क्षणभर हेवा वाटला.... कारण मला सुद्धा रडू येत होत पण अशी रडायची क्षमता मी केंव्हापासून घालवून बसलोय!
आणखी एक वर्ल्डकप मधला असा क्षण मुलाच्या संबंधीतलाच आहे. त्याचा जन्म मार्च १९९४ मधला आणि त्यावर्षी वर्ल्डकप होता जून- जुलै मध्ये अमेरिकेत. जुलै ९ १९९४ ला क्वार्टर फायनल मॅच ब्राझील आणि हॉलंड मध्ये झाली.
फिफा च्या वेबसाईट वर त्याचे वर्णन असे:
Artist: Christopher Weyant, The New Yorker
No comments:
Post a Comment