"The 2018 inter-Korean summit took place on 27 April, on the South Korean side of the Joint Security Area, between Moon Jae-in, President of South Korea, and Kim Jong-un, Chairman of the Workers' Party of Korea, and Supreme Leader of North Korea. It was the third inter-Korean summit – and the first in eleven years. It was also the first time since the end of the Korean War in 1953 that a North Korean leader entered the South's territory; President Moon also briefly crossed into the North's territory...."
म वा धोंड, 'तरीहि येतो वास फुलांना', १९९९:
२०१८साली दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्या संबंधांमध्ये क्रांतिकारक अशी प्रगती झाली आहे. काय सांगावे, हे दोन देश भविष्यात एक सुद्धा होतील.
Korean leaders Kim Jong Un and Moon Jae-In shakes each other's hands during the 2018 inter-Korean summit
'अजून येतो वास फुलांना', ३२, पृष्ठ १०२, ' मर्ढेकरांची कविता', १९५९/१९७७ ही कविता मर्ढेकरांनी कोरिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहली आहे असे धोंड म्हणतात.
त्याच्या पाठोपाठची कविता क्रमांक ३५, पृष्ठ १०५ आहे
".....
देवासाठीं दगड पूजिला
मानवतेची अतां आरती,
संस्कृत झाला शब्द म्हणुनि का
देव्हाऱ्यावर नवीन कांति!
दगड गाडला, गाडा हाडें;
शेंदुर गेला, रक्त जाउं द्या;
अज्ञानाच्या गळफांसांतच
जरा जगा अन् जरा जगूं द्या.
नळींतलें जग नळींत जगतें
उगाच रुसवा रसायनाचा;
उगाच दावा मानवतेचा
आणिक डंका सामर्थ्याचा!
"
वरील कविता एकूण ६ कडव्यांची आहे, त्यापैकी तीन इथे दिली.
ती लिहली गेलीय १९५१साली आणि पहिल्यांदा प्रकाशित झाली सत्यकथा, मे , १९५१च्या अंकात. म वा धोंडांच्या मते ही कविता सुद्धा कोरिया युद्धावरच (जून १९५०- जुलै १९५३) आहे.
धोंडांनी या कवितेबद्दल 'दैवज्ञश्री", दिवाळी २००० च्या अंकात लेख लिहला. तो अजूनतरी कोणत्याही पुस्तकात नाहीये. स्वतः मला त्यांनी तो पाठवला म्हणून आज माझ्या संग्रही आहे. त्यातला काही भाग (वरील तीन कडव्यांचे आकलन करणारा) खाली पहा. मधली attachment डाउनलोड करून मोठी करून वाचा.
धोंडांचे रसग्रहण उत्कृष्ट आहे पण माझ्या मते ही कविता कोरिया युद्धाशिवाय उभी राहू शकते. इतकच नाही तर, जसा काळ जाईल तसे नवनवीन तत्कालीन संदर्भ या कवितेला चिकटू शकतात आणि त्यातच ह्या कवितेचे सामर्थ्य आहे. अशानेच ही कविता कायम 'नवीन' राहील.
मर्ढेकर न्यायालयाच्या बाहेर (आणि न्यायालयात सुटायचे असेल तर फार अभिनिवेश आणि भावना दाखवून काम कदाचित होणार नाही!) आपल्या कोणत्याही कवितेबद्दल विस्ताराने कधी बोलत नाहीत. ते टीपा देत नाहीत, शीर्षक देत नाहीत, केंव्हा/ कुठे लिहली ते (पुस्तकाद्वारे तरी) सांगत नाहीत, ते श्री पु भागवतांना तोंडावर सांगतात: "एखादी कविता समजली नाही याचा अर्थ ती तुमच्यासाठी नाही". तेंव्हा त्यांच्या कवितेतील अर्थ शोधून काढणे हा बऱ्याच वेळा speculation चा खेळ आहे. त्यांच्या कित्येक कविता मला पूर्ण दुर्बोध वाटतात आणि तरी त्यांच्या शब्दकळेमुळे आवडतात, वाचकाने अशा परिस्थितीत speculation करावे आणि तीला काय वाटते ते समजून घ्यावे.
'ह्या गंगेमधिं गगन वितळलें ' सत्यकथेच्या १९४८च्या गांधी विशेषांकात प्रसिद्ध झाली. सगळ्यांना म. गांधींवरची जबरदस्त कविता म्हणून फार भावली. नंतर मर्ढेकरांनी पत्राने कळवले की गांधींचा आणि त्या कवितेचा काही संबंध नाही म्हणून!
मला तीच्या प्रथम दर्शनी प्रेमात पडणारी कविता गांधींबद्दल केंव्हाच वाटली नाही तर देवाबद्दल/ पंचमहाभूतांबद्दल (असशील जेथे तेथे राहा तू ) वाटली आहे*. मला स्वतःला भारावून टाकणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात ती कायम आठवली आहे. आसामला ब्रह्मपुत्रेचे दर्शन पहिल्यांदा (१९८९) दिब्रुगढला झाल्यावर ती जिभेवर आली आहे.
मला समजणाऱ्या मर्ढेकरांच्या सर्व कवितांचे अर्थ मी स्वत: लावून घेतले आहेत. धोंडांच्या पुस्तकाची, असंग्रहीत लेखांची, विलास सारंगांच्या लेखांची मदत निश्चित झालीय. एखाद्या ठिकाणी तर ती कविता जास्त आवडली, किंवा पूर्ण समजली उदा: "गोमूत्राने पावन अंबर" धोंडांच्या रसग्रहणामुळे. पण माझा मुद्दा आहे की उत्कृष्ट कलाकृती ही तत्कालीन संदर्भांच्या पलीकडे लगेचच जाते आणि प्रत्येक पिढी त्याचे नव्याने रसग्रहण करते. हे भाग्य अर्थातच फार कमी कलावंतांच्या नशिबी असते, मर्ढेकर त्या कंपूमधील एक आहेत, किमान असावेत अशी माझी इच्छा आहे.
जॉन ग्रे यांचे 'Seven Types of Atheism' हे पुस्तक २०१८साली प्रशिध्द झाले. त्यांची नास्तिकतेची व्याख्या सोपी आहे. "Atheism is simply the absence of the idea of a creator-god”. याचाच अर्थ नास्तिकता म्हणजे "absence of god" नव्हे. त्यांच्यामते धर्म म्हणजे : “an attempt to find meaning in events, not a theory that tries to explain the universe”. ते असेही म्हणतात की नास्तिकतेचे सात प्रकार आहेत. त्यातल्या सहाव्या प्रकारातील नास्तिकता, मला असे वाटते, मर्ढेकर अनुसरतात : ""For those who cleave to the sixth type of atheism, there is no purpose in life and the universe is ultimately without meaning. This is an atheism with a profound sorrow at its heart, which is why even devout theists should respect it. Santayana was its most lyrical exponent, but Gray is more comfortable with Joseph Conrad: “What makes mankind tragic is not that they are victims of nature, it is that they are conscious of it … as soon as you know of your slavery, the pain, the anger, the strife – the tragedy begins.” .... ह्या विषयाबद्दल विस्ताराने लिहायचे आहे.]
No comments:
Post a Comment