खालील कार्टून 'वाङ्मय शोभा' मासिकाच्या ऑगस्ट १९४९ मधले आहे. दुर्दैवाने कलाकाराचे नाव समजत नाहीय.
कार्टून बघून मला गंमत एकाच गोष्टीची वाटली की १९४९ साली 'परदेशी जाणे / भारतात परत येणे' वगैरे विषय 'सकाळ' मध्ये चर्चिले जात आणि वाङ्मय शोभा सारखे आघाडीचे मासिक त्याला पुनर्प्रसिध्दी देत असे!
६८वर्षात सकाळ आणि आपण किती बदललो हे सांगायला नकोच!
आता माकड हा शब्द अपमानास्पद रित्या वापरायचा ठरवलाच तर, भारतात न राहिलेले उच्चशिक्षित लोक भारतात राहिलेल्या उच्चशिक्षित लोकांना माकड म्हणतील... ६८ वर्षात भारत कायमचा सोडणे, अयोध्येला गेल्यावर गायब होणे याला इतकी प्रतिष्ठा येईल असे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आले नसते.
आज वरील कार्टूनची कॅप्शन बदलली पाहिजे .... 'आम्हाला अमेरिका दाखवा' नाही.... 'आम्हाला कायमचे अमेरिकेत नेवून सोडा'!
अरुण कोलटकर त्यांच्या 'द्रोण', २००२-२००४ मध्ये लंका विजयानंतरच्या पार्टीचे वर्णन करतात. त्यात एक पाण्याचे तळ आहे जे ट्रान्सफॉर्मर सारखे माकडाला माणूस आणि माणसाला माकड करते.
पण जशी पार्टी संपत येते तस काही माकड विचार करायला लागतात की आपल्याला आता पुन्हा माकड व्हायचय की नाही.... त्यावेळी वानरांच्यात चर्चा सुरु होतात...त्या मला आवडल्या:
"एक वृद्ध कपी म्हणाला:
आज तुम्ही त्यांचं
अंधानुकरण करू पाहताय प्रत्येक बाबतीत,
पण कौटुंबिक जीवनाचे आपले आदर्श,
आणि त्यांचे,
सर्वस्वी वेगळे आहेत..."
"त्यांच्या भावजीवनाला
उथळपणाचा शाप
मिळाल्याशिवाय कसा राहील?
मग भले ते राज्य
करीनात का समुद्रवलयांकित पृथ्वीवर
किंवा आणखी कशावर,
मला तर त्यांची कीवच वाटते,
किंबहुना कुठल्याही वानराला
"
No comments:
Post a Comment