या आधीची "१ - व्हॅन गॉव" पोस्ट इथे पहा.
पॉल गोगॉं...
मी
माझा संसार
मातीत कालवला
अन् त्याला आकाशाच्या थडग्यांत पुरून
ताहितीच्या नागड्या मातीशीं
रंगरेषांचं मैथुन केलं !
(पृष्ठ १२, 'निवडक सदानंद रेगे', १९९६/ २०१३)
टीप - या कवितेचा आधीचा, व्हॅन गॉव वरचा भाग, कांहीं दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता.
Artist: Paul Gauguin, 'The Day of the God', 1894
चित्रकार दीनानाथ दलाल आणि कवी/ चित्रकार सदानंद रेगे एकेकाळी अतिशय जवळचे मित्र होते, त्याच्या खुणा 'अक्षर गंधर्व: सदानंद रेगे', १९८७ ह्या त्यांच्या मुलाखती , डायरी वर आधारित पुस्तकात...
पण नंतर हे दोन प्रतिभावान चित्रकार मित्र दूर झाले (भांडणातून नव्हे), तो दुरावा बहुतेक दलालांच्या अकाली मृत्यूपर्यंत गेला नाही...
.
त्या संबंधात माझ्या मनात आलेले विचार verse च्या रूपात :
व्हॅन गॉव ने एक कान गमावला
कसा?
माहित आहे, पण सदानंद रेगेंच्या शब्दात ऐकायला मजा येते ...
व्हॅन गॉव ने दुसरा कान पण जवळजवळ गमावला
(काहीतरीच) कसा?
दाखवेन लौकरच ....
पॉल गोगॉं ने स्वतःचा संसार मातीत कालवला
आणि केले ताहितीच्या नागड्या मातीशीं रंगरेषांचं मैथुन
आपले भाग्य की ते पाहिल सदानंद रेगेंनी
कशी होती त्यावेळची ताहिती
दाखवेन लौकरच ....
व्हॅन गॉव आणि पॉल गोगॉं काहीकाळचे जिवश्चकंठश्च मित्र, एकत्र राहिलेले, नंतर दुरावलेले.... म्हणून त्यांना पुन्हा एकत्र आणले रेगेंनी,
२०व्या शतकात रेगेंनी स्वतः असे मित्र केले आणि गमावले
त्यामुळे कलेच्या बरोबरीने मानवी संबंधांबद्दलची उत्सुकता
No comments:
Post a Comment