श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यांच्या ह ना आपटे यांच्या 'पण लक्षात कोण घेतो?", १८९० कादंबरीच्या परीक्षणात अस लिहल होत:
"रा. आपट्यांनी स्त्रियांच्या दुःखाची कहाणी सांगितली आहे तशी मागासलेल्या जातीच्या दुःखाची सांगितल्यास ती मिसेस स्टौच्या 'टॉम काकाची कोठडी' या कादंबरीच्या खालोखाल क्रांतिकारक होईल अशी खात्री वाटते. "
विजय तेंडुलकर:
"...पांढरपेशा जगाच्या सीमा संपवून पांढरपेशा हिशेबांनी 'नो मॅन्स लँड'- निर्मनुष्य प्रदेश- जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, 'गोलपिठा' नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते..."
('गोलपिठा'च्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना)
दिलीप पुरषोत्तम चित्रे:
"... समकालीन कवींमध्ये मर्ढेकर, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा काही कवींमध्ये तुकारामी परंपरेच्या काही छटा आल्या..."
(पृष्ठ बारा, 'पुन्हा तुकाराम', १९९०/ १९९५)
John Gray, New Statesman, June 2010:
"....John Wyndham's The Day of the Triffids (1951) is full of terrifying images of human life under siege from ambulatory plants, but concludes with a handful of survivors emerging from their ordeal essentially unchanged to renew civilisation in the comically improbable environs of the Isle of Wight...
...Even at its most pessimistic, science fiction has always been a humanist genre. The consoling assumption has been that while civilisation may be flawed and fragile, it can always be rebuilt, perhaps on a better model, if only humans have the will to do it. The possibility that it is the species that is flawed has rarely been explored..."
Ursula K. Le Guin, 1977:
तेंडुलकर त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात की ढसाळांची कविता मला शब्दशः समजत नाही. बरोबरच आहे, पण तेंडुलकर म्हणतात तसा तो निर्मनुष्य प्रदेश नाही तर, एका पांढरपेशा माणसासाठी, एखाद्या विज्ञान कथेत वर्णन केल्यासारखा आहे- a post-apocalyptic, आणि ते जग वर्णन केलेली भाषा समजायला ते जग आधी थोडेतरी समजले पाहिजे, किमान त्याची कल्पना तरी करता आली पाहिजे.
(अलीकडील काही वर्षात पुण्यातील संध्याकाळच्या वेळात स्वारगेट चौक पाहून सुद्धा पोस्ट-अपोकॅलिप्टिक भविष्याची थोडी कल्पना यायला लागलीय.)
कृतज्ञता: कलाकार : संदेश भंडारे
No comments:
Post a Comment