य दि फडके: "... ब्रॅडलॉ आणि बेझंट यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष संततिनियमनाकडे वळले असावे..." (पृष्ठ ५०, 'र. धों. कर्वे', १९८१). आगरकर संततिनियमनाच्या बाजूने पूर्णपणे होते आणि त्यांचा 'स्त्रीदास्य विमोचन' निबंध- ज्यात संततिनियमन येते- प्रसिद्ध आहे.
अजूनही ॲनी बेझंट भारतात कीर्तिरूपे 'जिवंत' आहेत. चेन्नई चे उच्चभ्रू वस्ती असलेले बेसंट नगर त्यांच्या नावाची आठवण करून देत असते.
२०२४ च्या सुरवातीला,
Michael Meyer यांचे "A
Dirty, Filthy Book: Sex, Scandal, and One Woman’s Fight in the Victorian Trial
of the Century" हे पुस्तक प्रसिद्ध
झाले.
हे ॲनी
बेझंट यांच्यावर झालेल्या १८७७ मधील प्रसिद्ध खटल्यावर
आहे.लेखकाचे ह्या पुस्तकाबाबत मनोगत ऐकायचे असेल तर History Extra चा हा पॉडकास्ट ऐका.
In 1877 she was involved in one of the trials of the century
when she was arrested for publishing an “obscene” pamphlet about sexual
education and birth control. Fruits of Philosophy: or the Private Companion of
Young Married People was the Lady Chatterley of its time, except that it was
written by a reputable American physician, Charles Knowlton. He explained the
physiology of conception and methods to treat infertility and impotence, and
briefly described a method of avoiding pregnancy by using a sponge to wash the
vagina after intercourse.
Victorian society was scandalised when Besant republished
the book from her private printing press. She had insisted that the reprint
should have a low price of sixpence to reach the working-class population who
could most benefit from effective birth control."
बेझंट ह्यांना बहुतेक भारतीय
अगदी वेगळ्या कारणांसाठी
ओळखतात. मी ही त्यातलाच आणि मला ह्या पुस्तकाची
परीक्षणे वाचून असे
वाटले की मी त्यांना ओळखलेच नाही.
य दि फडके त्या खटल्याचा उल्लेख वरील पुस्तकात करतात पण त्यातून बेझंट बाईंना झालेला त्रास, त्याग आणि त्यांचे व्यक्तिमत्व समजत नाही. त्या र धों कर्व्यांइतक्या किंवा जास्तच लढाऊ होत्या, बंडखोर होत्या.
ह्या तर र.
धों. कर्वे ह्यांच्या
'पूर्वज' निघाल्या.
भारतात त्यांनी इतर कार्ये (होमरुल चळवळ, थिऑसॉफिकल सोसायटी वगैरे) न करता संततिनियमन, कुटुंब नियोजना वरती काम केले असते तरी त्या आज तेवढ्याच , किंचित जास्तच लक्षात राह्ल्या असत्या.