Strindberg
ज्यांनी ज्यांनी "पिंगळावेळ" नुस्त उचलून उघडून बघितलंय , त्या सर्वांना हे अर्पणपत्रिकेतील (चपखल शब्द epigraph) वाक्य वीजेसारखे चमकते... जीए हे 'वेगळे' लेखक आहेत याची जाणीव तिथून सुरु होते, किमान माझ्याबाबतीत ती १९८१ साली झाली....
जीएंच ते मला ब्ध्येय वाक्य वाटत... "माझ्या लेखनात नावीन्य पाहू नका, माझ्या प्रत्येक कथेकडे दुखऱ्या नसेकडे जायचा प्रयत्न म्हणून पहा."
अलीकडे वाटू लागले हे वाक्य इतके भारी आहे, याच्या आजूबाजूचा परिसर पण तसाच तेजस्वी असेल. म्हटल बघूया कुठे आहे ते वाक्य....स्ट्राइंडबर्ग (१८४९- १९१२) यांचे सर्व लेखन गेली कित्येक वर्षे पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि ठिकठिकाणी उपलब्ध आहे.....
मला मात्र हे वाक्य स्वीडिश स्ट्राइंडबर्ग यांच्या कोणत्याही इंग्लिश मधील अनुवादित पुस्तकात अजून मिळालेले नाही!
त्यांच्या गाजलेल्या, सहजपणे इंग्लिश मध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांत पहिले. नंतर गूगल आणि Google Books वर शोधले Delphi Collected Works of August Strindberg (Illustrated).
Sue Prideaux यांच्या अत्यंत गाजलेल्या Strindberg यांच्या चरित्रात ('Strindberg: A Life', २०१२) मध्ये ते नाही ...
तुम्हाला कोठे मिळाल्यास जरूर कळवा .....
------ह्या संबंधित माझ्या दोन तीन पोस्ट - एप्रिल ३ २०१६, जानेवारी ३० २०१७ , मार्च १२ २०१६- When There Were No Wikipedia and Google...and Now That They Are Here... ,
गोडसेंचा गोंधळ : कुठाय चांदण्यातील मखमली नीलिमा?...James Abbott McNeill Whistler's Two Nocturnes आणि
जी. एंचा पहिला यात्रिक अनुल्लेखित दुसर्याचा...Henry van Dyke's 'The Story of the Other Wise Man', 1895 पाहू शकता.
------त्याशिवाय फेसबुकवर लिहल्या प्रमाणे जी. एंची एक कथा 'संवेदना', वाङ्मय शोभाच्या जुलै १९५०च्या अंकात छापून आली होती. ती कथा अनुवादित आहे पण मूळ लेखकाचा, कॉपीराईट चा उल्लेख कुठेही नाही!
.---- त्यांची आणखी एक कथा 'नारिंगी हातरुमाल' वाङ्मय शोभा डिसेंबर १९५० च्या अंकात आहे, पुन्हा अनुवादित पुन्हा मूळ लेखकाचा , कॉपीराईट माहितीचा उल्लेख नाही...
---- तसेच :
ऑक्टोबर ९ १९५९ला श्री पु भागवतांना लिहलेल्या पत्रात, जीए, रॉबर्ट ग्रेव्हस यांच्या एका कवितेच्या दोन ओळी quote करतात :
"Alas, it is late
Already bolder tenants are at the gate."
त्या ओळी तशा नाहीत तर अशा आहेत:
"Too far, too late:
Already bolder tenants were at the gate." ,
'Here Live Your Life Out!' from 'The New Yorker', March 1959....
.... भरपूर फरक आहे, दोन अवतरणांमध्ये
-----In one of the most impressive passages from N G. Kalelkar's (ना गो कालेलकर) book '"bhasha ani sanskriti" (भाषा आणि संस्कृती) he says:
When a class containing Lord Byron (1788 – 1824) was asked to write an essay on the subject of the Last Supper, Byron wrote just one line- 'The water saw its Lord and blushed'...Water in Latin is feminine...etc. etc. (page 47, edition December 1982)
This moved me so much that since my first reading of it in the 1980's, I memorised it and kept quoting it in my conversations.
There are a couple of problems with this.
First, it was not the Last Supper but Marriage at Cana. And second, it was not Lord Byron- then a third grade boy- who first said this. In fact it was Richard Crashaw (c.1613-1649) who wrote:
'The conscious water saw its God, and blushed' (original in Latin: Nympha pudica Deum vidit, et erubuit)
I feel Kalelkar should have attributed this to Crashaw but did he know that it was Crashaw who first wrote it?
A lot of stuff written in Marathi has gone unchallenged.
पुस्ती : हे वाक्य Strindberg यांचे नसून जीएंचे असल्यास मला त्यांच्या बद्दल वाटणारा आदर आणखी वाढेल!
courtesy: Delphi Classics
No comments:
Post a Comment