"... बुकजॅकेटमध्ये अक्षरशः त्याने (प्रभाकर गोरे) क्रांतीच केली. आज जे बुकजॅकेटच स्वरूप आहे ते गोऱ्यामुळेच आहे, हे तुम्हाला कबूल करावं लागेल. हे दलाल आणि मुळगावकर यांच्यामुळे नाही. दलालमुळगावकर हे गुळगुळीत चित्र काढीत असत. पण जे काही चैतन्य आलं त्या क्षेत्रामध्ये ते सगळं गोरेमुळं आलं. पण गोरे हा तसा अतिशय स्मार्ट मनुष्य होता. उत्तम वाचक होता. अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तक... विविध विषयात त्याला रस होता. शेवटी शेवटी होमिओपाथी, नंतर रंगाद्वारे रोग बरे करणे इथपर्यंत त्याच प्रकरण गेलं होत. त्यामुळे तो अतिशय हुशार मनुष्य होता. साहित्यातील त्याला अचूक काही कळत असे. कोण काय लिहतो कसं लिहितो..." (पृष्ठ ८३, 'अक्षर गंधर्व: सदानंद रेगे', १९८७)
एडवर्ड गोरी (Edward Gorey) १९२५-२००० या लेखक-चित्रकारावरती लेख एप्रिल २०१८मध्ये वाचला आणि त्यांचेच आडनाव असलेले , त्यांच्या इतकेच प्रतिभावान प्रभाकर गोरे आठवले..... आता प्रभाकर गोरेंच्या बरोबर जीए नेहमीच आठवतात.... त्याबरोबर त्यांचा 'प्रवासी'....आणि हा पहा एडवर्ड गोरी यांचा भटक्या.... 'प्रवासी'...
आणि ही पहा प्रभाकर गोरेंची काही मुखपृष्ठ....
"... ह्या पुस्तकांच्या चित्रांतून गोरे जीएंवर भाष्य करत होता...." ('जिगसॉ', रामदास भटकळ, पृष्ठ ९२, १९९७/ १९९८)
अर्थात एक लक्षात ठेवा: "... जीएंना ही चित्र फारशी आवडलेली नव्हती..." ! (वरील पुस्तकातच तसा उल्लेख आहे.)
No comments:
Post a Comment