मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Showing posts with label वाङ्मय शोभा. Show all posts
Showing posts with label वाङ्मय शोभा. Show all posts

Friday, May 09, 2025

VE-Day in the East@80...Urinating Against the Walls of the Moskva Hotel...वाङ्मय शोभा जुलै १९४५, दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख सुद्धा नाहीये

 Alexander Werth, ‘Russia at War, 1941–1945: A History’, 1964:

“…May 9 was an unforgettable day in Moscow. The spontaneous joy of the two or three million people who thronged the Red Square that evening—and the Moscow River embankments, and Gorki Street, all the way up to the Belorussian Station—was of a quality and a depth I had never yet seen in Moscow before. They danced and sang in the streets; every soldier and officer was hugged and kissed; outside the US Embassy the crowds shouted “Hurray for Roosevelt!” (even though he had died a month before); they were so happy they did not even have to get drunk, and under the tolerant gaze of the militia, young men even urinated against the walls of the Moskva Hotel, flooding the wide pavement. Nothing like this had ever happened in Moscow before. For once, Moscow had thrown all reserve and restraint to the winds. The fireworks display that evening was the most spectacular I have ever seen.

Yet the one-day difference between VE-Day in the West and VE-Day in the East made an unpleasant impression; and at first minor, and then more serious squabbles began between the Allies almost before the ink of Keitel’s signature had dried….”

 

A woman celebrating the defeat of Nazi Germany with members of the victorious Soviet Red Army in 1945

सोबतचे वाङ्मय शोभा या मासिकाचे जुलै १९४५ चे मुखपृष्ठ पहा , दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख तिथे अथवा आत सुद्धा नाहीये... 


 courtesy: Art corner

 

Thursday, April 03, 2025

बालकृष्ण मार्तण्ड दाभाडे यांचा मध्ययुगीन भारतीय चित्रकलेवरील लेख...B M Dabhade's Article on Medieval Indian Drawing Art

वाङ्मय शोभा मासिकातील जानेवारी १९४७ च्या अंकातील  बालकृष्ण मार्तण्ड दाभाडे यांचा 'मध्ययुगीन भारतांतील चित्रलेखन' हा लेख पाहून माझे त्या विषयातील अज्ञान दूर होऊन प्रचंड आनंद झाला...

तो लेख मी कोणतीही टिप्पणी न करता इथे देत आहे... 




Sunday, February 23, 2025

मराठीत तर त्या कबरस्थानात जागाच शिल्लक नाहीये ...Only Test of Literary Merit... The New Yorker@100

George Orwell, ‘LEAR, TOLSTOY AND THE FOOL’, March 1947:

“Ultimately there is no test of literary merit except survival, which is itself an index to majority opinion.”

फेब्रुवारी २१ २०२५ रोजी न्यू यॉर्कर मासिकाला १०० वर्षे पूर्ण झाली. शताब्दी मासिक उत्साहात साजरी करते आहे  करत आहे पण मला फार आवडले पॉल नॉथ यांचे त्या निमित्तासाठी काढलेले सोबतचे कार्टून ...  

न्यू यॉर्कर चा मॅस्कॉट  कबरस्थानातून डोळे पुसता निघाला आहे आणि बाजूला समाध्या कोणा कोणाच्या आहेत ते पहा .... 

मराठीत तर त्या कबरस्थानात जागाच शिल्लक नाहीये ... वाङ्मय शोभा , सत्यकथा , छंद, अभिरुची ...किती नवे घ्यावीत? ...

artist : Paul Noth


Tuesday, July 11, 2023

GA, Rege@100...सदानंद रेगे, जी. ए. कुलकर्णी १००वा वाढदिवस

#sadanandrege100 #gakulkarni100

जून २१ २०२३ रोजी आपण सदानंद रेगे यांचा १००वा वाढदिवस साजरा केला, जुलै १० रोजी जी. ए. कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा केला... 
 
२०व्या शतकातील जगातील दोन उत्कृष्ट, सुदैवाने मराठीत लिहणारे, माझे आवडते लेखक... दोघे तसे कमी जगले- रेगे ५९ वर्षें, जीए ६४... 
 
दोघेही दोन महायुद्धे आणि भारताची फाळणी ह्या मध्ये जन्माला आलेलं आणि त्याच्या प्रत्यक्ष झळा जरी लागल्या नसल्या तरी भाजलेले...
 
दोघांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या समाजवादी धोरणांमुळे आर्थिक चणचण, गरिबी पाहिलेली ... दोघांची आयुष्यात कोणत्याही शहरात स्वतःच्या मालकीची दोन खोल्यांची घरे सुद्धा झाली नाहीत, दोघेही कॉलेजमध्ये प्राध्यापक, दोघांवरही घराची खूप जबाबदारी...
 
दोघेही अविवाहित...
 
दोघांचे जागतिक वाङ्मयाचे उत्तम वाचन, मनन आणि त्याचा त्यांच्या साहित्यावर पडलेला लख्ख प्रभाव... दोघांनी अनके पुस्तकांचे अनुवाद केले... दोघेही उत्तम चित्रकार... पण त्यातून त्यांना एकही पैसा मिळाला नाही...
 
दोघेही चष्मिश...
 
दोघेही मराठीतील सुधारणावादी, पुरोगामी, जगाला-सुधरवून-सोडतो वगैरे लेखनापासून प्लेटो इतके दूर...
सर्व लक्ष मानवाच्या लाखो वर्षें चालत आलेल्या जीवनाकडे, त्यातील संघर्षाकडे , त्याच्या मर्यांदांकडे, त्याच्या महत्वाकांक्षेकडे, त्याच्या छोट्या-मोठ्या सुखदुःखाकडे, जीवनात सतत तयार होत असलेल्या विनोदाकडे, जगाच्या सतत दिसणाऱ्या सौन्दर्याकडे, नियती कडे...
 
रेगे अत्यंत महान कवी, जीए सुप्त कवी.... रेगे नाटककार...जीए थोर कथाकार... दोघेही भाषाप्रभु, त्यांच्या परिने मराठी घडवली... 
 
दोघेही त्यांच्या वाङ्मयीन वाटेच्या सुरवातीला केळकरांच्या "वाङ्मय शोभा"चे लेखक (रेगे तर नंतर काहीकाळ सल्लागार सुद्धा) आणि केळकरांचे ऋण कधी न विसरलेले, दोघेही नंतर पॉप्युलर प्रकाशनाचे प्रथितयश लेखक...
 
पुन्हा एकदा, थँक यु, सर (स)
 

 

Wednesday, December 05, 2018

गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)चे पुनर्निर्माते स आ उर्फ भाऊसाहेब जोगळेकर....S A Jogalekar of Gathasaptasati



James C. Scott , ‘Against the Grain: A Deep History of the Earliest States ‘, 2017:
“...That states would have come to dominate the archaeological and historical record is no mystery. For us—that is to say Homo sapiens—accustomed to thinking in units of one or a few lifetimes, the permanence of the state and its administered space seems an inescapable constant of our condition. Aside from the utter hegemony of the state form today, a great deal of archaeology and history throughout the world is state-sponsored and often amounts to a narcissistic exercise in self-portraiture. Compounding this institutional bias is the archaeological tradition, until quite recently, of excavation and analysis of major historical ruins. Thus if you built, monumentally, in stone and left your debris conveniently in a single place, you were likely to be “discovered” and to dominate the pages of ancient history. If, on the other hand, you built with wood, bamboo, or reeds, you were much less likely to appear in the archaeological record. And if you were hunter-gatherers or nomads, however numerous, spreading your biodegradable trash thinly across the landscape, you were likely to vanish entirely from the archaeological record.

Once written documents—say, hieroglyphics or cuneiform—appear in the historical record, the bias becomes even more pronounced. These are invariably state-centric texts: taxes, work units, tribute lists, royal genealogies, founding myths, laws. There are no contending voices, and efforts to read such texts against the grain are both heroic and exceptionally difficult.The larger the state archives left behind, generally speaking, the more pages devoted to that historical kingdom and its self-portrait....”

ह्या प्रतिपादनाला (argument) एखादीच गोष्ट अपवाद असेल. सुदैवाने ती महाराष्ट्राची आहे..... 


सातवाहन काळात (इ.स.पू. २३० ते इ.स. २२०) दगडांची अनेक सुंदर कामे घडली जी अजून जिवंत आहेत... पण स्कॉट म्हणतात तसे सामान्यांनी स्वतः साठी बांधलेले काहीच शिल्लक नाही. पण लेखनामुळे bias pronounce न होता उलट गाहा सत्तसई सारखे लेखन होऊन सामान्यांचे जीवन, त्यांची भाषा, त्यांची कला अजून जिवंत आहे.
 
. . जोगळेकर ह्यांनी संपादिलेल्या गाहा सत्तसई (हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, १९५६) गाथांचा मराठी अनुवादही दिला आहे.

 सौजन्य : वाङ्मय शोभा , मार्च १९६३

courtesy: Penguin Classics and the artist(s)