मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Showing posts with label जी. ए. कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label जी. ए. कुलकर्णी. Show all posts

Friday, August 22, 2025

२०व्या शतकातील तीन मोठे भारतीय कलावंत (कमी आयुष्य लाभलेले)...Gadkari, Dalal and GA

 २०व्या शतकातील तीन मोठे भारतीय कलावंत (कमी आयुष्य लाभलेले) ह्या पोस्ट मध्ये एकत्र...

जी. ए. कुलकर्णी १९२३-१९८७, २८-१०-१९७८:


"... आम्हाला मॅट्रिकला असता गडकऱ्यांची (एक) 'चिमुकलीच कविता' अभ्यासाला होती. एका छोट्या मुलीवर लिहलेली ही एक मोठी कविता . त्या मुलीच्या एका गालावर तीळ आहे. तर गडकरी सांगतात , की ती तीळ म्हणजे त्या मुलीचे भाग्य लिहिताना विधीने दिलेले दशांश चिन्ह आहे! ते वाचताच (मला आजही आठवते) तो तास कसा कापराप्रमाणे भर्रकन जळून गेला..."

 (पृष्ठ ६५, 'जी.एं. ची निवडक पत्रे: खंड १', १९९५) 


(प्रत्यक्षात कवितेत तीळ नाही तर गोंदण आहे.)

"...
तिलक गोजिरे गोंदवणाचे हिरव्या रंगाचे,
शुभ्र मुखावर तुषार कुठल्या दिव्य तरंगाचे !
निळ्या नभीं वर शुभ्र तारका जमवितात मेळ,
शुभ्रमुखनभीं इथें निळ्याशा तारांचा खेळ !
(इचा) उद्याचा धनी कोण , हें ठरवावें म्हणुनी,
पुण्याईचें गणित करित विधि दशांशचिन्हांनीं ! ..."

राम गणेश गडकरी १८८५- १९१९, "वाग्वैजयंती" 

दीनानाथ दलाल यांच्या अप्रतिम चित्रात   १९१६-१९७१ तीळ आणि गोंदण दोन्ही नाही पण छोट्या मुली आहेत 


Saturday, June 14, 2025

सगळीच मांजरे अंधारात काळीच असतात...Black Cat by Hishida Shunso

 जी. ए. कुलकर्णी, 'यात्रिक', सत्यकथा, ऑगस्ट १९७५, सध्या पृष्ठ २४२, "पिंगळावेळ", १९७७:

 "... सगळीच मांजरे अंधारात काळीच असतात. कसे म्हणतोस, सॅन्को ?... "


 "Black cat", 1910 by Hishida Shunso

 

Wednesday, December 11, 2024

C. P. Cavafy, Aboard the Ship...जी. ए. कुलकर्णी, दीनानाथ दलाल, पाणी, बोट, नावाडी, भारून टाकणारी दुपार... सगळे जुने...वेळ चुकवून पुढे आलेले

 

जीएंनी त्यांच्या उत्तर हिंदुस्थानातील प्रवासाबद्दल जयवंत दळवींना एप्रिल ६ १९७४ रोजी एका पत्रात कळविले (पृष्ठ १४०-१४१, 'प्रिय जी. ए.: स. न. वि. वि.', १९९४) ....
 
जीएंनी केलेल्या त्या गंगा-यमुना संगमाचे लहानसे वर्णन मला झपुर्झा स्थितीत नेवून सोडते. त्यात त्यांच्या होडीचा अबोल नावाडी सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडतो ...

आज मी माझे अत्यंत आवडते कवी सी पी कवाफी (C. P. Cavafy, Greek) यांची एक अप्रतिम कविता वाचली ... 
 
=====Aboard the Ship=====
 
It certainly resembles him, this small
pencil likeness of him.
Quickly done, on the deck of the ship:
an enchanting afternoon.
The Ionian Sea all around us.
It resembles him. Still, I remember him as handsomer.
To the point of illness: that’s how sensitive he was,
and it illumined his expression.
Handsomer, he seems to me,
now that my soul recalls him, out of Time.
Out of Time. All these things, they’re very old—
the sketch, and the ship, and the afternoon.
[1919; 1919]
 
... आणि ती वाचल्यावर दलालांचे तितकेच सुंदर चित्र आठवले ...
 
अनंत काणेकर आणि दीनानाथ दलाल यांनी उत्तर आणि दक्षिण भारतात प्रवास करून दोन पुस्तके प्रकाशित केली ... त्यातील दलालांचे एक स्केच
 
पाणी, बोट, नावाडी, भारून टाकणारी दुपार... सगळे जुने...वेळ चुकवून पुढे आलेले...खुणावते आहे ...
 
कृतज्ञता : कवाफी यांचे अनुवादक Daniel Mendelsohn आणि दलाल यांच्या कलाकार्याचे कॉपीराईट होल्डर्स
 
 

Wednesday, March 13, 2024

G. A. Kulkarni, Henry van Dyke...जी. ए. कुलकर्णी आणि हेन्री व्हॅन डाईक

 

हे पूर्वी इथे दिले असेल.. पण काहीजणांना कदाचित नव्याने...

जीएंनी 'पिंगळावेळ' मधील यात्रिक ही जबरदस्त अशी रूपक कथा लिहण्या आधी, त्याच नावाची अनुवादीत कथा वाङ्मयशोभाच्या ऑक्टोबर १९६०च्या अंकात प्रसिद्ध केली होती... 
 
मूळ लघुकादंबरी हेन्री व्हॅन डाईक (१८५२-१९३३) यांची आहे, तिचे मूळचे नाव आहे 'The Story of the Other Wise Man', 1895. 
 
जीएंच्या कथेसोबत हेन्री व्हॅन डाईक यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले नव्हते आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता सुद्धा व्यक्त करण्यात आली नव्हती. 
 
पुरषोत्तम धाक्रस 'आकाशफुले : जी. ए. कुलकर्णी', तिसरी आवृत्ती ', २०१० ह्या पुस्तकाच्या "'सिंहा' वलोकन" मध्ये लिहतात:
"...'यात्रिक'.... हे केवळ अनुवाद आहेत एवढेच कळते. मूळ कथा कोणाच्या वगैरे काहीच आढळत नाही..."
 
त्या कथेच्या पहिल्या पानाचा फोटो सोबत. कृतज्ञता: वाङ्मयशोभा आणि जी ए कुलकर्णी यांच्या वाङ्मयाचे कॉपीराईट होल्डर्स
 

 

Thursday, August 17, 2023

जी.एंच्या व्यक्तिमत्वातील विरोधाभास!...Nietzsche, Orwell, GA and Contradictions

"जी.एं. ची निवडक पत्रे: खंड ३", २००६-२०१२ वाचायला सुरवात करायच्या आधी विजय पाडळकरांची प्रस्तावना चाळली आणि खूप गंमत काही वेळा वाटली - त्यांना जी.एंच्या व्यक्तिमत्वातील विरोधाभासांचे आश्चर्य वाटतय (उदा: वाचा एकतीस)!
 
विरोधाभासाशिवाय मनुष्य जिवंत आहे असे म्हणताच येणार नाही.
 
Gerald Frost on George Orwell:
"The contradictions have frequently been noted: he was a socialist intellectual whose finest achievements included a mordant critique of the hypocrisy and double standards displayed by the socialist intellectuals of his day; a patriot who held most of his country’s institutions in contempt; a passionate defender of historical truth who chose to write under an assumed name and who occasionally told lies; a self-styled champion of decency who backed causes that, had they prevailed, would have produced outcomes in which decency would have been difficult to discern; an atheist who decreed that his funeral should be conducted by the Church of England and that he should be buried in a rural parish churchyard. It is often the contradictions in an individual’s character that give it distinction; in the case of Orwell, these were more marked and more numerous than in most, but it is not clear whether he was even aware of them."
 
John Gray on Friedrich Nietzsche :
"... If his writings abound in contradictions, it is not because he was unaware of them, but rather that, believing truth in many areas of philosophical inquiry to be inherently paradoxical, he had no interest in system-building. ..."
 
फक्त दोन उदाहरणे पुरेत!
 

 
 Artist: Barney Tobey, The New Yorker. March 1984

Tuesday, July 11, 2023

GA, Rege@100...सदानंद रेगे, जी. ए. कुलकर्णी १००वा वाढदिवस

#sadanandrege100 #gakulkarni100

जून २१ २०२३ रोजी आपण सदानंद रेगे यांचा १००वा वाढदिवस साजरा केला, जुलै १० रोजी जी. ए. कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा केला... 
 
२०व्या शतकातील जगातील दोन उत्कृष्ट, सुदैवाने मराठीत लिहणारे, माझे आवडते लेखक... दोघे तसे कमी जगले- रेगे ५९ वर्षें, जीए ६४... 
 
दोघेही दोन महायुद्धे आणि भारताची फाळणी ह्या मध्ये जन्माला आलेलं आणि त्याच्या प्रत्यक्ष झळा जरी लागल्या नसल्या तरी भाजलेले...
 
दोघांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या समाजवादी धोरणांमुळे आर्थिक चणचण, गरिबी पाहिलेली ... दोघांची आयुष्यात कोणत्याही शहरात स्वतःच्या मालकीची दोन खोल्यांची घरे सुद्धा झाली नाहीत, दोघेही कॉलेजमध्ये प्राध्यापक, दोघांवरही घराची खूप जबाबदारी...
 
दोघेही अविवाहित...
 
दोघांचे जागतिक वाङ्मयाचे उत्तम वाचन, मनन आणि त्याचा त्यांच्या साहित्यावर पडलेला लख्ख प्रभाव... दोघांनी अनके पुस्तकांचे अनुवाद केले... दोघेही उत्तम चित्रकार... पण त्यातून त्यांना एकही पैसा मिळाला नाही...
 
दोघेही चष्मिश...
 
दोघेही मराठीतील सुधारणावादी, पुरोगामी, जगाला-सुधरवून-सोडतो वगैरे लेखनापासून प्लेटो इतके दूर...
सर्व लक्ष मानवाच्या लाखो वर्षें चालत आलेल्या जीवनाकडे, त्यातील संघर्षाकडे , त्याच्या मर्यांदांकडे, त्याच्या महत्वाकांक्षेकडे, त्याच्या छोट्या-मोठ्या सुखदुःखाकडे, जीवनात सतत तयार होत असलेल्या विनोदाकडे, जगाच्या सतत दिसणाऱ्या सौन्दर्याकडे, नियती कडे...
 
रेगे अत्यंत महान कवी, जीए सुप्त कवी.... रेगे नाटककार...जीए थोर कथाकार... दोघेही भाषाप्रभु, त्यांच्या परिने मराठी घडवली... 
 
दोघेही त्यांच्या वाङ्मयीन वाटेच्या सुरवातीला केळकरांच्या "वाङ्मय शोभा"चे लेखक (रेगे तर नंतर काहीकाळ सल्लागार सुद्धा) आणि केळकरांचे ऋण कधी न विसरलेले, दोघेही नंतर पॉप्युलर प्रकाशनाचे प्रथितयश लेखक...
 
पुन्हा एकदा, थँक यु, सर (स)
 

 

Monday, April 24, 2023

एखादी देवता आपले मूल कडेवर घेऊन त्याच्याकडे मातृप्रेमाने पाहात आहे, असे तुला कधी दिसले आहे? ...Yes, G. A. -Sir

 जी. ए. कुलकर्णी, 'ऑर्फियस', "पिंगळावेळ", १९७७,  पृष्ठ १३:
"... एखादी देवता आपले मूल कडेवर घेऊन त्याच्याकडे मातृप्रेमाने पाहात आहे, असे तुला कधी दिसले आहे? नाही...."


 

Monday, January 30, 2023

Cavafy's Below the House (at Miraj)....कुलकर्णी, चाफेकर वाडा , मिरज

जी. ए. कुलकर्णी:

"बेळगाव नावाच्या गावास/ पाऊले जरी दूर भटकत गेली/ तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती / सतत जवळ राहिली आहे." (रमलखुणा, १९७५)

 जीएंचे जसे बेळगाव, तसे माझे मिरज... 
 
ज्यावेळी मी मिरजेला, २०१९ साली ३५ वर्षांनंतर गेलो, आणि मी २० वर्षे राहिलेल्या आमच्या घराजवळ गेलो, आणि काही काही वेळ तिथे घालवून पुढे गेलो, त्यावेळी मला वाटलेले सी पी कवाफी (C. P. Cavafy) यांनी फार सुंदर शब्दबद्ध केले आहे...
 
Below the House
 
Yesterday while strolling through a neighborhood
on the edge of town, I passed below the house
I used to go in when I was very young.
There Eros had taken possession of my body
with his exquisite force.
 
                                                 And yesterday
as I passed along that ancient street,
suddenly everything was made beautiful by desire’s spell:
the shops, the pavements, the stones,
and walls, and balconies, and windows;
there was nothing ugly that remained there.
 
And while I was standing, gazing at the door,
and standing, tarrying by the house,
the foundation of all my being yielded up
the sensual emotion that was stored inside.
 
('Complete Poems: C. P. Cavafy', 2009 translated by Daniel Mendelsohn)
 
[1917; 1919]
 
(पूर्वी आमचे कौलारू दुमजली साधे घर वेगळे दिसायचे. पण खिडक्या - एक नव्याने झालेली सोडून- आणि दरवाजा यांची स्थाने अजून बदलली नाहीयेत)
 

 

Monday, January 16, 2023

अभ्यासातील फ्लोरा का अंतिम परीक्षेतली ?...Flora and the Zephyrs

जी. ए. कुलकर्णी : "... ऑर्फियसने उत्कंठेने वाद्य हातात घेतले व स्वर निर्माण करण्यास सुरवात केली... त्यावेळी हातांतील कंकणांचा आवाज करत, आंतरसालीसारख्या कोवळ्या पावलांनी सूर्यप्रकाश सरकवत एक सौन्दर्यवती युवती आली, आणि निर्भर आनंदाने तिने ओंजळभर फुले उचलली..." 

(पृष्ठ ५, 'ऑर्फियस', 'पिंगळावेळ', १९७७)

Flora आणि  Zephyrs दोन्ही रोमन/ ग्रीक देव. Zephyrs म्हणजे पश्चिम-पवन (मरुत) आणि फ्लोरा (the goddess of the flowering of plants), त्याची पत्नी. 











हे चित्र आहे (Copyright The Hopkins Collection 2021) जॉन वॉटरहाऊस यांनी १८९८ साली काढलेले. त्या बद्दल मिळालेली माहिती अशी:

"Flora and the Zephyrs takes its subject from Ovid's Fasti, which is a verse chronicle of the Roman calendar, and which incorporates the mythologies and historical legends of Rome where they can he associated with specific times of the year. Waterhouse's painting shows the moment when Zephyr first set eyes upon and fell in love with Flora, as she gathered flowers in the fields with her maidens and children.  He flies down to her, accompanied by his winged companions, and captures her by casting a garland of white flowers around her."

पण या चित्रातील फ्लोरा पेक्षा जॉन वॉटरहाऊस यांनी वरील चित्राच्या तयारीकरता काढलेली फ्लोरा (study of Flora) मला खूप जास्त आवडली. 

किती मानवी वाटते, तिच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता अगदी परिचयाची. 


 

Sunday, July 18, 2021

जीएंची भिंतीतून जाणारा माणूस... Marcel Aymé's Le Passe-muraille

 The passer-through-walls (French: Le Passe-muraille), translated as The Man Who Walked through Walls, The Walker-through-Walls or The Man who Could Walk through Walls, is a short story published by Marcel Aymé in 1941.

मी हे शोधले की ह्या कथेवर आधारित जी. ए. कुलकर्णी यांनी "भिंतीतून जाणारा माणूस" या नावाची कथा लिहली आणि ती सत्यकथेत १९५२ साली प्रसिद्ध झाली. (पहा 'आकाशफुले', आवृत्ती तिसरी, २०१०)

जीए मोघम म्हणतात "मध्यवर्ती कल्पना परकीय", त्याचे एक कारण कदाचित मूळ कथा प्रकशित होऊन अवघी अकरा वर्षें झाली होती. कॉपीराईट् चा गुंता होऊ शकला असता. 

मी  जीएंची कथा वाचली. विनोद अत्यंत बेताचे आहेत. बाकी (मराठीत रूपांतरित) कथा ठीक आहे. 

फ्रेंच कथेचा सारांश विकिपीडिया वर असा आहे :

"A man named Dutilleul lived in Montmartre in 1943. In his forty-third year, he discovered that he possessed the ability to pass effortlessly through walls. In search of a cure he consulted a doctor, who prescribed intensive work and a medicine. Dutilleul made no change to his rather inactive life, however, and a year later still retained his ability to pass through walls, although with no inclination to use it. However, a new manager arrived at his office and began to make his job unbearable. Dutilleul began using his power to annoy his manager, who went mad and was taken away to an asylum. Dutilleul then began to use his ability to burgle banks and jewellery shops. Each time, he would sign a pseudonym "The Lone Wolf" in red chalk at the crime scene, and his criminal exploits soon became the talk of the town. In order to claim the prestige and celebrity status "The Lone Wolf" had gained, Dutilleul allowed himself to be caught in the act. He was put in prison, but used his ability to frustrate his jailers and repeatedly escape.

He then fell in love with a married woman, whose husband went out every night and left her locked in her bedroom. Dutilleul used his power to enter her bedroom and spend the night with her while her husband was away. One morning, Dutilleul had a headache and took two pills he found in the bottom of his drawer. His headache went away, but later that night, as he was leaving his lover's house, he noticed a feeling of resistance as he was passing through the walls. The pills Dutilleul had thought were aspirin were, in fact, the medicine his doctor had prescribed for him a year earlier. As he was passing through the final outer wall of the property, he noticed he was no longer able to move. He realized his mistake too late. The medicine suddenly took effect, and Dutilleul ended up trapped in the wall, where he remains to this day."

जीए यातील अनेक कल्पनांचा वापर करतात (active life, बँकेवरील दरोडे, तरुणीच्या प्रेमात पडणे, शेवटचे गोळी खाणे आणि भिंतीत अडकणे वगैरे), फक्त हे सोडून : "spend the night with her while her husband was away". 

ह्या कथेला चित्र काढले होते दीनानाथ दलालांनी.  (कै. दलाल यांच्या कार्याच्या कॉपीराईट होल्डर्सचे आभार)





चित्रकार : दीनानाथ दलाल

Aymé is so well known in France that a much-photographed statue of him in front of his former home in Montmartre pays hommage to his most famous story. Amazingly, the sculpture was created in 1989 by none other than Jean Marais (1913-1998), the dashing star of Cocteau’s La belle et la bête and Ophée (and thus no stranger to crossing through dimensions himself).

 

 

Friday, June 11, 2021

जी. एंचा पहिला यात्रिक..."मूळ कथा कोणाच्या वगैरे काहीच आढळत नाही"...Henry van Dyke's 'The Story of the Other Wise Man', 1895

पुरषोत्तम धाक्रस , 'सिंहा' वलोकन, 'आकाशफुले : जी. ए. कुलकर्णी', तिसरी आवृत्ती ', २०१०:

"...'यांत्रिक'.... हे केवळ अनुवाद आहेत एवढेच कळते. मूळ कथा कोणाच्या वगैरे काहीच आढळत नाही..."

माझ्या ब्लॉग वरची मार्च १२ २०१६ ची पोस्ट पहा

"...After little research I found out that,  GA's Marathi story is a translation of Henry van Dyke's (1852-1933) short novel 'The Story of the Other Wise Man', 1895. 

Sadly and surprisingly, Henry van Dyke is not even mentioned any where! The credit is normally given like this: 'Original novella : Henry van Dyke, Translator: G. A. Kulkarni' ( 'मूळ लघुकादंबरी: हेन्री व्हॅन डाईक, अनुवादक: जी ए कुलकर्णी)

Also note that van Dyke died in 1933. Therefore, his story was not in public domain in India in October 1960!... "


 Artist: John Flanagan, 'The Story of the Other Wise Man', 1920 , public domain

Friday, May 28, 2021

शृंगारिक नागकेशर...Sensuous Cobra Saffron and Perhaps Clay of Karnataka

 दुर्गाबाई भागवतांचा 'फुलभेट' हा 'प्रासंगिका' १९७५-२००३ मधील लेख मला नुसता आवडतो नाही तर तो मला अतिशय शृंगारिक वाटतो. 

नागकेशराचे (Mesua ferrea) फुल मी काही फार वेळा पहिले नसेल. त्याचा वास सुद्धा मला आठवत नाहीये. त्या फुलावर हा लेख आहे. 

त्यात दुर्गाबाई  एका साठ  वर्षाहून जास्त वय असणाऱ्या बेळगावमधील सौ. तमण्णाचार्य, ज्यांच्या घरी त्यावेळी त्या गेल्या होत्या,  यांचे वर्णन थोडक्यात करतात :

"१९३६ चे वर्ष असावे ... तमण्णाचार्यांची पत्नी साठीपलीकडे पोचली असूनही अत्यंत सुंदर होती. केस फक्त पिकले होते. पण त्या रुपेरी केसांची शोभाही अपूर्व होती. रंग सतेज गुलाबी; चेहरा अतिशय रेखीव, बांधा सुडौल, बाई अत्यंत नीटनेटकी. लुगडे चापूनचोपून नेसलेली. दागिन्यांनी मढलेली. केसांत नेहमी गजरा. नाकात चमकी. आपल्या रूपाची जाणीव क्षणभरही न विसरणारी  व्यक्ती मला अजून दुसरी दिसलीच नाही..." (पृष्ठ ३३)

मला तर लहानपणचा 'चांदोबा' आणि त्यातील एकाहून एक सौष्ठवपूर्ण स्रीया आठवल्या. 


 लोक कबूल करोत अथवा नाही, चांदोबाच्या लोकप्रियतेचे ते एक महत्वाचे कारण होते. पुढे महाबली वेताळ आणि अमर चित्र कथांमध्ये सुद्धा हा अँगल होताच. 

आणखी एक गोष्ट. 

जी. ए. कुलकर्णी: "...मी मॅट्रिकला असताना एकदा शिरसी नावाच्या गावी गेलो होतो. तेथे माझ्या दुपटीहून थोडी जास्त वयाची स्त्री दिसली होती. ती सुंदर होती असे म्हणणे understatement होईल. ती देदीप्यमान होती. तिने लग्न मात्र एका काळ्या सामान्य माणसाशी केले. तो अत्यंत बुद्धिमान होता व विशेष म्हणजे त्याला sense of humour फार आकर्षक होता. तो कुठेही गेला, तर 'मी रमाचा नवरा' अशी ओळख करून देत असे व मग मोठ्याने हसून ''असे सांगितल्याने ओळख पटते. रमालाच ओळखणारे लोक जास्त!" हा प्रेमविवाह होता आणि तो विवाह दोघांनाही अतिशय सुखाचा झाला याचे लोकांना आश्चर्य वाटे... रमा नवऱ्याआधी वारली. नंतर त्याचे जीवन हबकल्यासारखेच  झाले. त्याने नोकरी सोडली. थोडा पैसा होता  खरा, पण तोही त्याने वापरला नाही. बंगळूरला त्याच्या भावाचा कसला तरी छोटा कारखाना होता.  तेथे तो दिवसभर बसून असे म्हणे. आज रमा नाही, की विष्णुदास (हे त्याचे नाव) नाही. पण इतक्या वर्षानंतर ती आठवण झाली, की मोसमाबाहेर जाईची वेल उमलल्यासारखी वाटते. 'रमा' हे नाव आकर्षक नसावेच, पण त्याबद्दलची ही आठवण मात्र ओलसर सुगंधी आहे... "
(पृष्ठ १८९-१९०, 'जी एं. ची निवडक पत्रे', खंड १, १९९५)

मराठीतील दोन आघाडीचे आणि महत्वाचे लेखक (एक स्त्री आणि एक पुरुष) दोन  भिन्न कर्नाटकातील स्त्रियांचे कसे उत्कट पणे  वर्णन करतात हे पाहण्यासारखे आहे!

 


 

Monday, February 03, 2020

ग्रीकांचा नीळांधळेपणा आणि (प्रशियन) निळासांवळा.... GA and Prabhakar Gorey's Prussian Blue

जीएंच्या  ग्रीक साहित्याच्या, विशेषतः नाटकांच्या, प्रेमाच्या अनेक खुणा त्यांच्या विपुल पत्रव्यवहारात दिसतात... उदाहरणार्थ पहा पृष्ठ २८६, "जी.एं.ची निवडक पत्रे: खंड १", १९९५... 


“The color blue is associated with two of Earth’s greatest natural features: the sky and the ocean. But that wasn’t always the case. Some scientists believe that the earliest humans were actually colorblind and could only recognize black, white, red, and only later yellow and green. As a result, early humans with no concept of the color blue simply had no words to describe it. This is even reflected in ancient literature, such as Homer’s Odyssey, that describes the ocean as a “wine-red sea.”

Blue was first produced by the ancient Egyptians who figured out how to create a permanent pigment that they used for decorative arts. The color blue continued to evolve for the next 6,000 years, and certain pigments were even used by the world’s master artists to create some of the most famous works of art. Today it continues to evolve, with the latest shade discovered less than a decade ago...”

 कलाकार: प्रभाकर गोरे 

सौजन्य: मुखपृष्ठाचे कॉपीराईट होल्डर्स आणि पॉप्युलर प्रकाशन

होमरच्या ओडेसी मध्ये सुद्धा निळा रंग नाही कारण बहुदा तो ग्रीकांना दिसतच नव्हता- 

Emma Taggart यांच्या लेखात वरील मुखपृष्ठावरील रंग प्रशियन ब्लू या नावाने येतो असे मला वाटते. 

"...Also known as Berliner Blau, Prussian blue was discovered accidentally by German dye-maker Johann Jacob Diesbach. In fact, Diesbach was working on creating a new red, however, one of his materials—potash—had come into contact with animal blood. Instead of making the pigment even more red like you might expect, the animal blood created a surprising chemical reaction, resulting in a vibrant blue.... "

Saturday, April 06, 2019

महान साहित्य आणि बालपण हातात हात घालून असतात....Orson Welles and G. A. Kulkarni

ऑर्सन वेल्स आणि जी. ए. कुलकर्णी पूर्वी सुद्धा या ब्लॉग वर एकत्र आले आहेत, उदा.  एप्रिल ८ २०१८ रोजी इथे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये मी हे पहिले: Christophe Honoré’s यांच्या दहा आवडत्या सिनेमात वेल्स यांच्या 'The Magnificent Ambersons', १९४२चा समावेश आहे. तो सिनेमा माझा सुद्धा अत्यंत आवडता सिनेमा आहे- ती मला कविताच वाटते.

Honoré म्हणतात : "The Magnificent Ambersons is the most important of films for a director. It’s because of Welles, because he repeats to us, again and again, that cinema and childhood go hand in hand. And that theater is the birth of cinema."

हे वाचून मला जी. एंची 'कैरी' ('सुगंध', १९७३ समाविष्ट 'पिंगळावेळ', १९७७) आठवली: "पुन्हा पुन्हा जीए आपल्याला सांगतात की महान साहित्य आणि बालपण हातात हात घालून असतात"

आणि काय योगायोग आहे पहा The Magnificent Ambersons हा जी.एंच्या वाढदिवसाला १९४२साली प्रदर्शित झाला होता!


खाली डावीकडे अँन बॅक्सटर पहा.... ह्या दर्जाचे उत्कृष्ट अभिनय आणि सौन्दर्य यांचे मिश्रण कमी बघायला मिळते...

Sunday, February 10, 2019

...मला ती मोलकरीण राजकन्येसारखी वाटली...Maritornes, the Princess


जी. ए. कुलकर्णी : 
"... मला ती मोलकरीण राजकन्येसारखी वाटली, मद्याच्या पखाली दबा धरून बसलेल्या शिपायांसारख्या वाटल्या, आता तूच सांग, तुझे वाटणे माझ्या वाटण्यापेक्षा जास्त महत्वाचे का आहे ? ..."
(पृष्ठ २२१, "यात्रिक", पिंगळावेळ , १९७७)


Miguel De Cervantes Saavedra , translator Edith Grossman, ‘Don Quixote’, Chapter XVI:

“...And holding her close, in a low, amorous voice he began to say:

“Would that I were able, O beauteous and exalted lady, to repay the great boon thou hast granted me with the sight of thy sublime beauty, but Fortune, which never wearies of pursuing the virtuous, hath chosen to place me in this bed, where I lie so bruised and broken that even if I, with all my heart, desired to satisfy thine own desires, I could not. Further, added to this impossibility is another even greater, which is the promise of faithfulness that I have sworn to the incomparable Dulcinea of Toboso, the sole mistress of my most hidden thoughts; if this great obstacle did not loom between us, I would not be so foolish a knight as to turn away from so gladsome an opportunity as this that thy great kindness affords me.”

Maritornes, extremely agitated and perspiring freely at finding herself held so firmly by Don Quixote, and not understanding or paying much attention to what he was saying, attempted, without saying a word, to break free....” 

btw- तुम्ही वाचला नसल्यास हा सोळावा चॅप्टर वाचा...

 'Duck Soup', १९३३ पासून,  'जाने भी दो यारों', १९८३ पासून 'The Simpsons' (१९८९-) अशा अनेक महान कलाकृतींची जननी कोण हे तुम्हाला लक्षात येईल....

from 'The History of Don Quixote of De La Mancha', 1922

Artist: Jean de Bosschère ( 1878 - 1953)

आज योगायोगाने मोलीये यांच्यावरती गुगल डुडल आहे Known as the greatest of all writers of French comedy today, Moliere premiered his final play, Le Malade Imaginaire (The Imaginary Invalid) on February 10  in 1673.