मराठीतील एक अप्रतिम कविता म्हणजे कवी गोविंदांची (१८७४-१९२६)
"सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार !
सुंदर मी होणार । हो । मरणाने जगणार ।धृ.।
....
मी १२ वर्षांचा असताना , माझ्या डोळ्यादेखत, भारतीय हॉकी ची अवस्था १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिक मध्ये वाईट झाली.
त्या वर्षी ब्रॉन्झ मिळाल्यावर प्रचंड टीकेचा आणि उपहासाचा सामना करायला लागला होता. १९७५ साली आपण कसाबसा वर्ल्ड काप जिंकला खरा पण आपली घसरण सुरु झाली आहे अशी भीती वाटायला लागली होती. ती खरी ठरली. नंतर ब्रॉंझ सुद्धा मृगजळ ठरू लागले.
२०२१ सालच्या टोकियो ऑलिम्पिकस पर्यंत मी सर्वआशा सोडल्या होत्या.
पण भारताची मोडलेली, अपंग हॉकी त्या वर्षी पुन्हा सुंदर झाली , आणि आज चार वर्षांनंतर तिचे सौन्दर्य कायम आहे....
माझे बालपण परतले , श्रावण मासी , हर्ष मानसी अशी अवस्था ह्या पदकाने सर्वात जास्त झाली आहे
Indian Hockey team with their bronze on August 8 2024