मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Monday, July 17, 2023

ही एक मुंगी आणि तिची हायकू ...Glad To Be An Ant

दूर्दैवाने मर्ढेकरांच्या कवितेत (१६, पृष्ठ ८८, 'मर्ढेकरांची कविता, १९५९/१९७७) मुंग्या बोलत नाहीत, हायकू तर लांब राहिल्या... 
 
पण त्यांचे वर्णन मर्ढेकरांनी चपखलपणे केले आहे ... त्यामुळे असे वाटते की त्या बोलल्या असत्या तर....
 Artist: Roz Chast, The New Yorker, June/July 2018


Friday, July 14, 2023

नेपोलियन आणि मीना कुमारी ...Napoleon and Meena Kumari

 नेपोलियन आणि मीना कुमारी  यांच्यात महत्वाचे साम्य काय? 

नेपोलियन यांचा उजवा हात...

"... Ask a group of people to describe Napoleon Bonaparte’s physical appearance and chances are the same two things will come up: he was short – so short that contemporary British cartoonists delighted in depicting him as a pint-sized figure called ‘Little Boney’, in fact – and that he would always walk around with his right hand tucked in between the buttons of his shirt, waistcoat or jacket...." 

(Jonny Wilkes, History Extra, July 2021)

(... But the truth behind the look has little to do with Napoleon at all, and more to do with portraiture in the 18th and 19th centuries. Concealing a hand in a shirt became a common pose in paintings as a symbol of statesmanlike nobility and restraint. According to a 1737 book on etiquette, The Rudiments of Genteel Behaviour by François Nivelon, it symbolised “manly boldness tempered with modesty”. That idea may go back as far as ancient Greece, when eminent orator Aeschines declared that speaking with an arm inside one’s cloak was a sign of modesty.... )


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

... आणि मीना कुमारी यांचा डावा हात पूर्णपणे आपल्याला पडद्यावर कधीच दिसत नाही... 

(Well, turns out that the little finger of her left hand was broken and hence it appeared crooked. In an interview, Kamal Amrohi's son Tajdar Amrohi revealed that on May 21, 1951, Meena Kumari was returning to Mumbai from Mahabaleshwar when her car met with an accident.)

Tuesday, July 11, 2023

GA, Rege@100...सदानंद रेगे, जी. ए. कुलकर्णी १००वा वाढदिवस

#sadanandrege100 #gakulkarni100

जून २१ २०२३ रोजी आपण सदानंद रेगे यांचा १००वा वाढदिवस साजरा केला, जुलै १० रोजी जी. ए. कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा केला... 
 
२०व्या शतकातील जगातील दोन उत्कृष्ट, सुदैवाने मराठीत लिहणारे, माझे आवडते लेखक... दोघे तसे कमी जगले- रेगे ५९ वर्षें, जीए ६४... 
 
दोघेही दोन महायुद्धे आणि भारताची फाळणी ह्या मध्ये जन्माला आलेलं आणि त्याच्या प्रत्यक्ष झळा जरी लागल्या नसल्या तरी भाजलेले...
 
दोघांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या समाजवादी धोरणांमुळे आर्थिक चणचण, गरिबी पाहिलेली ... दोघांची आयुष्यात कोणत्याही शहरात स्वतःच्या मालकीची दोन खोल्यांची घरे सुद्धा झाली नाहीत, दोघेही कॉलेजमध्ये प्राध्यापक, दोघांवरही घराची खूप जबाबदारी...
 
दोघेही अविवाहित...
 
दोघांचे जागतिक वाङ्मयाचे उत्तम वाचन, मनन आणि त्याचा त्यांच्या साहित्यावर पडलेला लख्ख प्रभाव... दोघांनी अनके पुस्तकांचे अनुवाद केले... दोघेही उत्तम चित्रकार... पण त्यातून त्यांना एकही पैसा मिळाला नाही...
 
दोघेही चष्मिश...
 
दोघेही मराठीतील सुधारणावादी, पुरोगामी, जगाला-सुधरवून-सोडतो वगैरे लेखनापासून प्लेटो इतके दूर...
सर्व लक्ष मानवाच्या लाखो वर्षें चालत आलेल्या जीवनाकडे, त्यातील संघर्षाकडे , त्याच्या मर्यांदांकडे, त्याच्या महत्वाकांक्षेकडे, त्याच्या छोट्या-मोठ्या सुखदुःखाकडे, जीवनात सतत तयार होत असलेल्या विनोदाकडे, जगाच्या सतत दिसणाऱ्या सौन्दर्याकडे, नियती कडे...
 
रेगे अत्यंत महान कवी, जीए सुप्त कवी.... रेगे नाटककार...जीए थोर कथाकार... दोघेही भाषाप्रभु, त्यांच्या परिने मराठी घडवली... 
 
दोघेही त्यांच्या वाङ्मयीन वाटेच्या सुरवातीला केळकरांच्या "वाङ्मय शोभा"चे लेखक (रेगे तर नंतर काहीकाळ सल्लागार सुद्धा) आणि केळकरांचे ऋण कधी न विसरलेले, दोघेही नंतर पॉप्युलर प्रकाशनाचे प्रथितयश लेखक...
 
पुन्हा एकदा, थँक यु, सर (स)
 

 

Monday, July 10, 2023

G. A. Kulkarni@100...धों वि देशपांडे यांचे "जी.एं.च्या कथा : एक अन्वयार्थ"

२०२१  सालच्या एप्रिल महिन्यात कित्येक वर्षांनी धों वि देशपांडे यांचे "जी.एं.च्या कथा : एक अन्वयार्थ", १९९० हे पुस्तक हातात घेतले. 
 
त्यात तीन मोठ्या मर्यादा आज जाणवल्या. 
 
१. यांत्रिक कथेमध्ये तत्वज्ञानाच्या चर्चेत लुक्रीशस नाही. 
 
लुक्रीशस (१५ ऑक्टोबर इ. स पू ९९- इ. स पू ५५) यांचे 'ऑन दी नेचर ऑफ थिंग्ज' हे पुस्तक जी. एं.ना खूप आवडत होत.
 
ते म्हणतात: "...स्वच्छ, जळजळीत दृष्टीने Lucretius ने केलेला देव, देवता, भाबड्या कल्पना यांचा विध्वंस मला आवडला होता...".
 
त्यांना लुक्रीशसच्या पुस्तकाचा अनुवाद करायचा होता. तो ते बहुदा करू शकले नाहीत कारण जीए स्वतःच १९८७ डिसेंबर, वरील पत्रानंतर ९-१० महिन्यात वारले. जी ए त्या अनुवादाच्या प्रोजेक्ट मधील अडचणी पण सांगतायत : आपल्याकडे goddess of love नाही वगैरे....
 
२. कवठे कथेवरील चर्चेत अगदी जवळ येऊन सुद्धा जॉर्ज ओरवेल यांच्या १९८४ चा उल्लेख नाही. 
 
In the old days, he thought, a man looked at a girl's body and saw that it was desirable, and that was the end of the story. But you could not have pure love or pure lust nowadays. No emotion was pure, because everything was mixed up with fear and hatred. Their embrace had been a battle, the climax a victory. It was a blow struck against the Party. It was a political act...."
 
पेरवाच्या बागेत, दुपारी संभोग करून, तसाच ठोसा लागावतात, जी. ए. कुलकर्णींच्या 'कवठे', १९७४ या कथेतील, समाजाने वेडसर ठरवलेला हरकाम्या दामू आणि कष्टकरी कमळी.
 
खर म्हणजे दामू अजिबात हिंसक नाहीय पण त्याने संभोगानंतर त्यांना हटकणाऱ्या रखवालदाराचा नुकताच गळा दाबून जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. कमळीमुळे तो रखवालदार वाचलाय. दामू समाधानाने कमळी ला सांगतोय की बाग छान होती. त्याला कमळी ठसक्यात उत्तर देतीये:
 
"… बाग छान नव्हती. आम्ही छान होतो. आम्हाला काय बागच पाहिजे, होय रे आडदांडा ? आयुष्यभर बागेतच पेरवे खात हिंडायला आम्ही काय खुळचट पोर आहोत की बडबड पोपट आहोत ? आम्ही जिथ बसू त्या ठिकाणी आमची बाग. ती बाग म्हणजे काही सगळ जग नव्हे. अरे, एवढ्या मोठ्या मातीत मरायला चार वाव जागा कशीही मिळते, मग चार वाव जागा जगायला मिळणार नाही होय?"
 
ती जणू समाज व्यवस्थेला सांगतीय: आम्हाला तुमचा गळा दाबायची गरज नाही, कुठल्याच हिंसेची गरज नाही कारण आमचा पेरवाच्या बागेतला संभोग हेच आमच त्या व्यवस्थेच्या विरुद्धच बंड होत.... It was a political act... Not merely the love of one person, but the animal instinct, the simple undifferentiated desire: that was the force that would tear the Party to pieces. ... Our embrace had been a battle, the climax a victory...
तुम्ही कदाचित आम्हाला तुमच्या व्यवस्थेच्या परिघावरती कायम ठेवाल, आम्हाला बावळट ठरवाल, हसाल, पण तुम्ही आमचा आनंद कधीच हिसकावून घेवू शकणार नाही... 
 


 He knelt down before her and took her hands in his'

ऑरवेल यांची दामू व  कमळी आणि आजूबाजूला आहे पेरवाची बाग

कलाकार : जोनाथन बर्टन

 ३.  देशपांडे 'विदूषक' चे २७ पानी परीक्षण लिहतात! कथा आहे ३६पानाची. मला त्यांनी ते परीक्षण एवढे दीर्घ का केले आहे समजले नाही.

त्या कथेचा गाभा आहे - "सत्तेचे स्वरूप"...ज्याबद्दल आपल्याला चाणक्याकडे न वळता मॅक्यियावेली वळायला लागते आणि The Prince हे पुस्तक वाचायला किंवा चाळायला तरी लागते.

सुदैवाने देशपांडे त्या पुस्तकाचा परीक्षणात सातव्या पानावर मॅक्यियावेलीचा उल्लेख करतात आणि तरी पुढे १९-२० पाने लिहतात.

देशपांडे चाणक्य सुद्धा त्याच पानावर आणतात म्हणतात- चाणक्य म्हणजे कुटीलता + अर्थशास्त्र! दुर्गाबाईंची चाणक्याच्या मर्यादेवरची टिप्पणी जास्त यौग्य वाटते - त्याला इतिहासाचे मॅक्यियावेली सारखे भान नाही...

माझ्यामते 'विदूषक' कथा म्हणजे जी. एं, नी मॅक्यियावेली ला- the father of modern politics- दिलेली दाद आहे.

जीएंचे द्रष्टेपण सिद्ध करणारी, काहीतरी शिल्लक बराच काळासाठी सोडून जाणारी , भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाफ बेमालूम पणे करणारी , न बदलणारे माणसाचे स्वरूप पुन्हा एकदा दाखवून देणारी ही आणखी एक कथा.

"Here a question arises: whether it is better to be loved than feared, or the reverse. The answer is, of course, that it would be best to be both loved and feared. But since the two rarely come together, anyone compelled to choose will find greater security in being feared than in being loved. . . . Love endures by a bond which men, being scoundrels, may break whenever it serves their advantage to do so; but fear is supported by the dread of pain, which is ever present."
― Niccolò Machiavelli, The Prince 


 

Friday, July 07, 2023

Love and Marriage


 “BEFORE AND AFTER” for  “Saturday Evening Post,” cover dated April 8, 1961

Artist : Constantin Alajalov (1900 - 1987)

Wednesday, July 05, 2023

The Birth and Death of The American Dream

The Irish Times, “The Wire, 10 years on: ‘We showed the American dream was dead’”, March 2018:
“...“They were such a unique pair to be writing this show,” says John Doman (deputy commissioner William Rawls). “Their view was from the inside out, not from the outside in. They knew the stories and the characters first-hand. I think The Wire really tore the cover off an American city and showed that, for so many people, the American dream was dead...”
  
Stephen Bayley, ‘How art chronicled the birth – and death – of the American dream’, The Spectator, UK, March 2017:
“....Wesselmann’s deliciously objectified and cartoonishly ridiculous nipples, as luscious as ice cream, and Estes’s mesmerising hyper-realist diners, so superior to their architectural original, are, in the end, more moving than campaigns about Aids, minority rights and feminism. Artists of the American dream were at their best worshipping trash, ironising the military-industrial complex, enjoying cars, teasing celebrities and mocking death: pleasure, sex and beauty being better inspirations than anguish or blame. Consumerism bests activism.

Can the dream be salvaged in a dismayed, deindustrialised, ethnonationalist America?...”



'Preliminary Painting for Tit and Telephone', 1968


Artist: Tom Wesselmann

“The prime mission of my art, in the beginning, and continuing still, is to make figurative art as exciting as abstract art. I think I have succeeded, but there is still a lot further to go.” 
 

Saturday, July 01, 2023

मॉर्गन पार्कर, विलास सारंगांच्या कथेतील 'सुवासिक कंट' आणि जी ए कुलकर्णी यांचे पत्र ...Vaginal Spray In a Marathi Short Story From 1974

Morgan Parker, 'Hottentot Venus', 2016:
"I wish my pussy could live
in a different shape and get
some goddamn respect.
..." 
('There Are More Beautiful Things Than Beyoncé')

Claire Luchette:
"....The subtle differences between profane words pose significant challenges to literary translators. In choosing equivalents between languages, context is as important, and can be as hard to determine, as the cultural taboo of particular words. According to Idra Novey, an American novelist and poet who translates Spanish literature into English, “What sounds violent or shocking in one language may not resonate the same way in translation.”
As an example, Novey points to the Chilean concha tu madre. “Its literal meaning is ‘shell of your mother,’ with ‘concha’ shell being a vulgar word for vagina along the lines of pussy or cunt. Its intended profane meaning is ‘your mother's pussy,’” Novey says. She explains that the phrase is used in contemporary Chilean poetry to “indicate rage or informal exclamatory speech, but translating its connotations and what they reveal about the speaker, using the phrase in one context or another, is tricky.”..."

Dennis Zhou, The Spectator, UK, April 2018:
"....In Tropic of Cancer, you were only a sex and a stomach. In Black Spring, you begin to have eyes, a heart, ears, hands. By and by, with each book, you will create a complete man, and then you will be able to write about woman..."


Philip Larkin:
“....Someone else feeling her breasts and cunt,
Someone else drowned in that lash-wide stare,
And me supposed to be ignorant,
Or find it funny, or not to care,
Even … but why put it into words?
Isolate rather this element
...”

२०१९ साली बहुतेकांना सेक्स, हिंसाचार आणि त्याला  अनुसरून वापरली जाणारी भाषा यामुळे धक्का बसायचे केंव्हाच थांबले आहे. जी. एं. नी तो इशारा खालील पत्रात श्री. पु. भागवतांना दिला होता.  



सौजन्य: जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स 

 जी एं. ना 'सुवासिक कन्ट' या शब्दाचा वापर हा एक 'आचरट धीटपणा' वाटतो.

जी ए हेन्री मिलर यांचे वाचक पूर्वीपासून होते, आणि मिलर त्यांना 'त्यामानाने कितीतरी सुसंगत' वाटायचे. १७/१/१९६० च्या पत्रात जीए श्री. पु. भागवतांना हेन्री मिलर यांची पुस्तके मुबईहून पोस्टाने पाठ्वण्याबद्दल विनंती करताना दिसतात.  त्यातले एक पुस्तक असावे 'ट्रॉपिक ऑफ कॅन्सर', १९३४.

मिलर यांचे  हे  पुस्तक अत्यंत वादग्रस्त ठरले. त्यावर  अमेरिकेत १९६१पर्यंत बंदी होती. त्या पुस्तकात कन्ट या शब्दाची नुसती पखरण आहे. त्या पुस्तकात एक वाक्य अस आहे : "...It's disgusting. I tell you, I'm actually beginning to hate cunt!..." काही वाचकांना पण कन्ट शब्द वाचून वाचून कदाचित हेच म्हणावस वाटत असेल!

दुसर एक वाक्य पहा: "..."That's just a line with her," says Van Norden. "Don't let her work on your sympathies. Just the same, I wish she'd talk about something else. How the hell can you get up any passion when you've got a starving cunt on your hands?"..."

इथे कन्ट 'starving' आहे.

कन्टला  वापरलेली पुस्तकातील इतर विशेषणे पहा : rich, foolish, Danish, new, married, fucking, Georgia, laboratory, warm, young, old, bastardly, real, French, fucked-out.....

'आचरट धीटपणा'....पण कितीवेळा आणि कोणकोणत्या प्रकारे!