Rajan Bala, All the Beautiful Boys, 1990:
"Sir Garfield Sobers. The only superman I have seen in the game. Once ran from slip to third man boundary’s edge to try and catch a mishook by Budhi Kunderan. Got his hands to the descending ball but tripped and floored the catch. Had he made it I would have died of a heart seizure. "
सोबर्स आणि मी
जगातील मला माहित झालेला पहिला अभारतीय म्हणजे - गॅरी सोबर्स आणि दुसरा मोहम्मद अली. ते मला पाचव्या वर्षाच्या आत माहित होते.
सोबर्स म्हणजे माझ्या वडिलांच्या आणि पर्यायाने माझ्या भाषेत - अर्जुन , शिवाजी महाराज यांचा क्रिकेटमधील संगम होता.
सॊबर्स म्हणजे अमरत्व (कसे वारले अलीकडे कुणास ठाऊक?). क्रिकेटमधील ते गलिव्हर होते आणि बाकीचे .....
१९७१ ची भारताची वेस्ट इंडिज ची टूर गाजली , पतौडी संघातच नव्हते ....आणि भारताने तिथे जाऊन सोबर्स असलेल्या वेस्ट इंडिज ला हरवले ....माझा आजही त्यावर विश्वास बसत नाही......
त्यांच्या बद्दल नंतर अनेक क्रिकेट आणि बाहेरच्या गोष्टी वाचल्या पण ते कोणीच जाणून घेऊ शकले नाहीत की सोबर्स माझे पर्यावरण होते ...
त्यांचे मन मोठे होते , शारीरिक क्षमता प्रचंड होती , आयुष्याचे ते सिकंदर होते
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.