Wednesday, May 29, 2024

रिडर्स डायजेस्ट ची न गेलेली रद्दी...Death of The Digest

"Reader's Digest ceases publication after its May 2024 issue"

महाराष्ट्रातील 'नव्या' अभ्यासक्रमाची १०वी ची परीक्षा झाली खरी पण ११वी साठी तत्कालीन बहुतेक कॉलेज मध्ये  infrastructure तयार नव्हते, त्यामुळे १९७५-७६ सालची अकरावी अनेक शाळांना सक्तीने घ्यावी लागली... 

मिरज हायस्कूल मध्ये ११वी (विज्ञान) चा वर्ग एकेकाळी ड्रॉईंग हॉल नामक मोठ्या जागेत भरवला गेला ... त्याच्या शेजारीच शाळेची एकेकाळची चांगली लायब्ररी होती... 

१९७२ सालापासून आमच्या शाळेला, मॅनेजमेण्ट बदलल्या नंतर, ओहोटी लागली होती, त्याचे एक उदाहरण म्हणजे ती बंद पडलेली लायब्ररी होती ... आम्हाला ७वी पर्यंत वर्गात पत्र्याच्या पेटीतील फिरत्या लायब्ररीतील पुस्तके मिळत असत (Hans Christian Andersen ते वि वा हडप अशा अनेकांची पुस्तके मी त्यामुळे पहिल्यांदा वाचली)... ते सगळे त्या वर्षानंतर बंद पडले... १९६९-१९७२ साला पर्यंत मी आमच्या शाळेचे सर्वांगीण वैभव पहिले...

एकदा आम्ही काही जणांनी त्या बंद लायब्ररी मध्ये ११वीचा वर्गाच्या आतून असलेल्या दारातून त्यात प्रवेश केला. सगळी कडे धूळ , जळमटे पण असंख्य पुस्तके होती. Reader's Digest चे ढीग च्या ढीग होते. मला त्यांचा मोह झाला. मी अनेक अंक घरी वाचायला आणले. ते इतके जीर्ण झाले होते की पान उलगडले की मोडून पडत असे. ते आता वाचता येणार नाहीत हे नक्की झाले. मग मी ते रद्दीच्या दुकानात घेऊन गेलो. रद्दीवाल्याने सुद्धा ती रद्दी घ्यायला नकार दिला.... 

इतके महागडे , अनेक वर्षांचे अंक आमच्या शाळेच्या व्यवस्थापनामुळे ना कुणाला वाचता आले, ना त्याचा दुसरा काही उपयोग झाला, मला खात्री आहे हीच वेळ इतर अनेक पुस्तक आणि मासिकांवर आली असणार... 

 रिडर्स डायजेस्ट कडून स्फूर्ती  मराठीत सुद्धा काही डायजेस्ट सुरु झाली - उदा: अमृत, विचित्रविश्व  आदी. 

मला वाटते  रिडर्स डायजेस्ट काही काळ मराठीत सुद्धा प्रसिद्ध होत होते. 

रिडर्स डायजेस्ट एकेकाळी पुस्तके सुद्धा प्रसिद्ध करत असे, माझ्या मित्राकडून मी वाचायला घातलेले एक पुस्तक आठवते - "High Stakes and Desperate Men", 1974 (आजही अमेझॉन वर उपलब्ध), महाग होते पण त्यांना ते परवडायचे, सर्व गोष्टी जबरदस्त होत्या, त्यातील एक गोष्ट होती "The Thirty-Nine Steps", 1915....



No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.