Monday, June 21, 2021

काफ्का , सदानंद रेगे@98, बोल्शेव्हिक क्रांती आणि प्रेमळ कम्युनिस्ट....A marathi Poet, Animal Farm and Bolshevik Revolution

#सदानंदरेगे९८

Franz Kafka in conversation with Gustav Janouch, 1920-1924

"...Franz Kafka turned the pages of a book by Alfons Paquet, The Spirit of the Russian Revolution, which I had brought with me to his office.

‘Would you like to read it?’ I asked.

‘No, thank you,’ said Kafka, and handed me the book across his desk. ‘At the moment I have no time. A pity. In Russia men are trying to construct an absolutely just world. It is a religious matter.’

‘But Bolshevism is opposed to religion.’ 

‘That is because it is itself a religion. These interventions, revolts, the blockade – what are they? They are little rehearsals for the great and cruel religious wars, which will sweep across the world.’

 ...‘You don’t believe in a wider expansion of the Russian Revolution?’

Kafka was silent for a moment, then he said:

‘As a flood spreads wider and wider, the water becomes shallower and dirtier. The Revolution evaporates, and leaves behind only the slime of a new bureaucracy. The chains of tormented mankind are made out of red tape.’..."

सदानंद रेगे, १९७७:

"साठ वर्षांपूर्वी
एक आकाश
अक्राळविक्राळ
अकस्मात्
ठरल्यागत फाटलं
अथपासून इतिपर्यंत.
आकाश फाटलं
नि त्यातून
एक जगड्व्याळ
नांगर खाली आला
नि बेछूट फिरत गेला
प्रासादाप्रासादांच्या
नागड्या पुतळ्यांवरून.
पुतळ्यांच्या पायाशी
झालं रक्ताचं तळंच तळं.
तळ्यातून डोकावली
शाश्वताची रक्ताळ कमळं.
त्या दिवशी उगवला सूर्य
तो कधी मावळलाच नाही.
इथलंही आभाळ
केव्हाचं सोसतंय तो अनद्यतन ठणका.
इथल्या नांगराला कधी जाग येणारेय?
केव्हा उडणार भडका?
इथंही झार आहेत
मुद्दाम
उद्दाम
झारीत अडकून बसलेले.
कधी उडणार हा गंज?
कधी लागणार बोथटाला धार?
'अरोरा' केव्हाची उभी आहे.
मरणगार जळात
खुणेच्या टाळीची वाट पाहात
वाट पाहात
साठ वर्षांपूर्वी
त्यांनी पाहिली तशी!"
 
रेगे बोल्शेव्हिक क्रांतीच वर्णन करतायत आणि विचारतायत : "...
इथल्या नांगराला कधी जाग येणारेय?
केव्हा उडणार भडका?
इथंही झार आहेत
मुद्दाम
उद्दाम... "
 
ज्या प्रतिभावान व्यक्तीने जॉर्ज ऑरवेल यांच्या ऍनिमल फार्म चा अनुवाद मराठीत केला,  ज्याने मार्क्सिसमच्या सद्य स्थितीवर टीका केली (पाहावा तो पावच पाव भाजून घेत होता/ तापल्या तव्यावर) त्यान बोल्शेव्हिक क्रांतीची वाट पाहावी याचे मला वाईट वाटले.   
 
(खाली सदानंद रेगे यांनी दिवाळी १९५७ च्या वाङ्मय शोभा मासिकासाठी केलेल्या ऍनिमल फार्मच्या अनुवादाचे एक पान)


 
 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.