Thursday, June 27, 2019

सॉल स्टाईनबर्ग, जी.ए. आणि चक्रव्‍यूह....Saul Steinberg, G.A., and Labyrinths

गंगाधर गाडगीळ, जीएंना पत्र , तारीख जुलै १६, १९७४:
"... रूपककथा अर्थातच नको. आपण कथालेखकांनी अशा प्रकारे पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये... रूपककथा ही नायलॉनच्या तलम  धाग्यांनी विणलेली असते. म्हणजे ती मुळातच खोटी असते..."
(पृष्ठ : ९७, 'प्रिय जी.ए.: स. न. वि. वि.', १९९४)
 
Joel Smith, The NYRB April 2019:
"...First, a labyrinth is someplace where a hero has become lost or trapped, and must either do something about it or succumb. Second, a labyrinth is a type of linear construction: a diagram of involution that Steinberg exploits for its aptness in metaphorically picturing (among other things) confusion, bureaucracy, indecision, and self- doubt. Third, a labyrinth is the prototype for anything that proves to be vexingly complicated inside, be it a person, a life, a cube, a line of talk—or a book...." 

(... पाहिलं म्हणजे चक्रव्यूह म्हणजे जिथे नायक हरवलेला आहे किंवा फसलेला आहे, आणि त्याला एकतर काहीतरी करायला पाहिजे किंवा बळी पडल पाहिजे. दुसर म्हणजे चक्रव्यूह हे एक प्रकारची रेषीय रचना आहे : गुंतागुंतीची आकृती जी स्टाईनबर्ग तिच्यामध्ये (इतर काही गोष्टींसकट) गोंधळ, नोकरशाही , अनिश्चितता आणि स्वशंका यांना रूपकात्मक दर्शवण्यात असलेला चोखपणा म्हणून वापरतात. तिसरी गोष्ट, चक्रव्यूह म्हणजे एक कोणत्याही आतून त्रासदायक प्रकारे गुंतागुंतीच्या सिद्ध झालेल्या एखाद्या माणसाचे , आयुष्याचे, घनाचे , बोलण्याच्या दिशेचे - किंवा पुस्तकाचे प्रोटोटाईप आहे...") (अनुवाद माझा)

जीएंच्या कथेतील अनेक labyrinths पैकी काही  पहा: 'प्रवासी' मधील आरसेमहाल, 'विदूषक' मधील मंदिर, 'स्वामी' तील मठ.... हे पटकन माझ्या मनात आले... (आणि रूपक कथांना गाडगीळ "खोट्या" म्हणतायत!.... स्टाईनबर्गची अनेक चित्रे मग खोटीच की.... जीएंनी त्यांचे अर्थातच न ऐकून माझ्यावर उपकार केले... )

पण एक नक्की चक्रव्‍यूह ही जीएंच्या वाङ्मयाच्या केंद्रस्थानी असणारी गोष्ट आहे , जशी ती कदाचित स्टाईनबर्ग यांच्या कलेच्या केंद्रस्थानी सुद्धा होती तशी.... 




Saul Steinberg: The Line (detail), 1959; a spread from Steinberg’s The Labyrinth

कलावंत: सॉल स्टाईनबर्ग, १९५९

१९७७



स्टाईनबर्ग हे वसंत सरवटे यांचे सर्वात आवडते कलावंत... स्टाईनबर्ग यांच्या कलेचा प्रभाव सरवटे यांच्या कलेवर सर्वात जास्त आहे....


Sunday, June 23, 2019

क्लिटोरिस मधून क्रांती ...Alfred Kinsey@125

#AlfredKinsey125 


Stephen Jay Gould :

“....Consider the anatomical site of orgasm in human females.

As women have known since the dawn of our time, the primary site for stimulation to orgasm centers upon the clitoris. The revolution unleashed by the Kinsey report of 1953 has, by now, made this information available to men who, for whatever reason, had not figured it out for themselves by the more obvious routes of experience and sensitivity.

The data are unambiguous. Consider only the three most widely read of extensive surveys—the Kinsey report of 1953, Masters and Johnson's book of 1966, and The I file Report of 1976. In his study of genital anatomy, Kinsey reports that the female clitoris is as richly supplied with sensory nerves as the male penis—and therefore as capable of excitation. The walls of the vagina, on the other hand, "are devoid of end organs of touch and are quite insensitive when they are gently stroked or lightly pressed. For most individuals the insensitivity extends to every part of the vagina."

The data on masturbation are particularly convincing. Kinsey reports from his sample of 8,000 women that 84 percent of individuals who have ever masturbated depend "primarily on labial and/or clitoral techniques."...”

(‘Male Nipples and Clitoral Ripples’ from Bully for Brontosaurus, 1991)

Byron Rogers: "...The Victorians, or at least those who wrote on the subject, believed men had only a finite reservoir of semen which had to be husbanded (nice irony, that). It was not just a matter of conservation; the stuff leaked out (which meant that well into the 20th century libertines like Frank Harris tied cords round their cocks). Circumcision was extolled as a means of preventing masturbation.
Then there was Kinsey who did not believe in conservation at all but in the principle of ‘use it or lose it’, and directed his researchers into multiple use with volunteers. For sex had come into the laboratory. A scientist injected himself with the crushed testicles of dogs and guinea pigs and claimed this made him pee 25 per cent further...."

 माझ्या ऑक्टोबर २०१७च्या पोस्ट मधून: " .... (र धों) कर्वे दुर्दैवाने ऑक्टोबर १९५३मध्ये वारले आणि त्याच वर्षी अमेरिकेत आल्फ्रेड किनसे (Alfred Kinsey) आणि इतर लिखित 'Sexual Behavior in the Human Female' हे स्त्रीयांच्या कामजीवनाबद्दलच्या समजांना उध्वस्त करणार पुस्तक प्रसिद्ध झालं!

विकिपीडिया आपल्याला सांगतो: "The Kinsey Reports, which together sold three-quarters of a million copies and were translated in thirteen languages, may be considered as part of the most successful and influential scientific books of the 20th century."

"शास्त्रीय पुस्तके" हे त्यांबद्दल वाचून कर्वेंना अत्यानंद झाला असता पण त्याहून ही जास्त आनंद हे वाचून झाला असतकी त्या पुस्तकामुळे  फ्रॉइडयांच्या स्त्रीयांच्या कामजीवनाबद्दलच्या कल्पनांना सुरुंग लागला...."

 

 
Alfred Kinsey interviewing a woman. 

courtesy: William Dellenback / The Kinsey Institute

Friday, June 21, 2019

कोणी मूर्ख वही भरवेल, रेगे ती कोरी करतात....अंतराळातील द्रष्टा पक्षी...Sadanand Rege@96

#सदानंदरेगे९६
आज सदानंद रेगे यांची ९६वी जयंती आहे.

निरोप 

"तुम्ही गेल्यापासून
तुमच्या कवितांची वही
अत्यवस्थ आहे.

असा एक शब्द जात नाही
 जो तुमच्या नावे
बोटे मोडीत नाही.

 तुम्ही मागे ठेवलेल्या प्रतिमाही
आता संपत आल्या आहेत.

पुड्या बांधायला
कवितांचे कागद घेण्याची
बांधिलकीही
वाण्यांनं पार  झटकून टाकल्येय.

तेव्हा असाल नसाल
तिथंच असा
कविमुखावर दाढी ओढून.
 
तुमची वही
रोज थोडीथोडी
कोरी होत चाललेय;
तिला चांगला भाव यायला
अजून थोडा अवकाश लागेल.

तोवर
तुमची करावी लागतील

तेवढी तेरावी
आम्ही प्रत्यही
करूच करू. "

('ब्रांकुशीचा पक्षी')

ही कविता वाचून ज्या ज्या वेळी एक उत्तम कविता वाचल्याचे मला वाटते तेच वाटते :
अंतर्मुख करणारी, विनोद निर्माण करणारी आणि अंतिम कठोर सत्याजवळ जायचा प्रयत्न करणारी ... माझ्या दृष्टीने त्यातला विनोद सगळ्यात महत्वाचा भाग....

मी रेगेंच्या कुठल्याच कवितेचा शब्द्च्छल करत नाही तर एखाद्या चांगल्या कार्टून कडे बघितल्यासारखे तिच्या कडे पाहतो आणि तिच्या अर्थांच्या पदरांनी अचंबित होतो. (बा सी मर्ढेकरांची कविता तशी 'पहात' नाही तर शब्द न शब्द वाचत अनुभवतो.)

"तुमची वही/ रोज थोडीथोडी / कोरी होत चाललेय".  ही कल्पना पहा....कोणी मूर्ख वही भरवेल, रेगे ती कोरी करतात...

किंवा हे : "तुम्ही मागे ठेवलेल्या प्रतिमाही/ आता संपत आल्या आहेत."... तुम्हीतर संपलाच आणि तुमच्या प्रतिमा सुद्धा संपत आल्या ... किती कठोर पण कसे उत्क्रांतीत बसणारे... मानव जातच कदाचित विनाशाकडे निघाली असताना तिला दिलेली वॉर्निंग... तुमच्या खुणा काय उरणार आहेत तर प्लास्टिकच्या बॅगा आणि चिकनची हाडे!   

अंतराळातील (ब्रांकुशीचा) पक्षी 

कलाकार :Constantin Brâncuși

Tuesday, June 18, 2019

बांबू ,कडबा,फडके,मडके,सुतळी....तुमच्या ट्रेडमिलच्या मागे पहा कोण आहे ते....Chin Vi Joshi's Humour and Death


Anton Chekhov
"And I despise your books, I despise wisdom and the blessings of this world. It is all worthless, fleeting, illusory, and deceptive, like a mirage. You may be proud, wise, and fine, but death will wipe you off the face of the earth as though you were no more than mice burrowing under the floor, and your posterity, your history, your immortal geniuses will burn or freeze together with the earthly globe.”
—from "The Bet"


Paulie Walnuts, The Sopranos:
"In the midst of life, we are in death, or is it, In the midst of death we are in life? Either way we’re up the ass."

तुम्ही पहिली नसेल तर ह्या ब्लॉगवरची "...पोळुं दे आंतून तीतें...Grief-berg Hits C V Joshi, R K Narayan, Mark Twai" ही मे १०, २०१७ची पोस्ट ह्या पोस्टला पूरक म्हणून पहा. 

आचार्य अत्रे यांच्या 'हुंदके'. १९८९/ १९९७ पुस्तकात 'विनोद चिंतामणी' हा चिं वि जोशी यांच्या वर लिहलेला मृत्युलेख आहे- मूळ प्रसिद्धी  नोव्हेंबर २३, १९६३.

त्यातील एक उतारा अत्रे यांच्या कार्याच्या कॉपीराईट होल्डर्स च्या सौजन्याने सोबत देत आहे. गरज पडल्यास, डाउनलोड करून मोठा करून वाचा.

(मोठे करून वाचा)
ही गोष्ट जरी आताच्या काळात शहरातील तरुणांना समजली नाही तरी  विनोदी आहे.  पण मला विशेष वाटले चिं विं नी निवडलेल्या गोष्टीचे.

मृत्यू दुसऱ्या व्यक्तीला आलेला आहे पण अंत्यसंस्कारांच्या 'चिन्हां'मुळे चाळीतील शेजाऱ्यांचा गैरसमज होतोय.

पण तो खरंच खूप गैर समज आहे? का ती भविष्याची , कदाचित नजीकच्या, नांदी आहे? मृत्यू तुम्हाला आला नसेल पण तो तुमच्या दरवाजाच्या बाहेरच आहे. बांबू , कडबा , फडके, मडके , सुतळी हेच अंतिम सत्य , बाकीचे फसवे आहे... ट्रेडमिल वर मागे पहा कोण आहे ते!... हे तर सूचवित नाहीयत चिं विं?


आर्टिस्ट: Joe Dator

पुस्ती: स्वत: चिं वि जोशींनी व्यंगचित्रे काढली आहेत!