Thursday, June 27, 2019

सॉल स्टाईनबर्ग, जी.ए. आणि चक्रव्‍यूह....Saul Steinberg, G.A., and Labyrinths

गंगाधर गाडगीळ, जीएंना पत्र , तारीख जुलै १६, १९७४:
"... रूपककथा अर्थातच नको. आपण कथालेखकांनी अशा प्रकारे पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये... रूपककथा ही नायलॉनच्या तलम  धाग्यांनी विणलेली असते. म्हणजे ती मुळातच खोटी असते..."
(पृष्ठ : ९७, 'प्रिय जी.ए.: स. न. वि. वि.', १९९४)
 
Joel Smith, The NYRB April 2019:
"...First, a labyrinth is someplace where a hero has become lost or trapped, and must either do something about it or succumb. Second, a labyrinth is a type of linear construction: a diagram of involution that Steinberg exploits for its aptness in metaphorically picturing (among other things) confusion, bureaucracy, indecision, and self- doubt. Third, a labyrinth is the prototype for anything that proves to be vexingly complicated inside, be it a person, a life, a cube, a line of talk—or a book...." 

(... पाहिलं म्हणजे चक्रव्यूह म्हणजे जिथे नायक हरवलेला आहे किंवा फसलेला आहे, आणि त्याला एकतर काहीतरी करायला पाहिजे किंवा बळी पडल पाहिजे. दुसर म्हणजे चक्रव्यूह हे एक प्रकारची रेषीय रचना आहे : गुंतागुंतीची आकृती जी स्टाईनबर्ग तिच्यामध्ये (इतर काही गोष्टींसकट) गोंधळ, नोकरशाही , अनिश्चितता आणि स्वशंका यांना रूपकात्मक दर्शवण्यात असलेला चोखपणा म्हणून वापरतात. तिसरी गोष्ट, चक्रव्यूह म्हणजे एक कोणत्याही आतून त्रासदायक प्रकारे गुंतागुंतीच्या सिद्ध झालेल्या एखाद्या माणसाचे , आयुष्याचे, घनाचे , बोलण्याच्या दिशेचे - किंवा पुस्तकाचे प्रोटोटाईप आहे...") (अनुवाद माझा)

जीएंच्या कथेतील अनेक labyrinths पैकी काही  पहा: 'प्रवासी' मधील आरसेमहाल, 'विदूषक' मधील मंदिर, 'स्वामी' तील मठ.... हे पटकन माझ्या मनात आले... (आणि रूपक कथांना गाडगीळ "खोट्या" म्हणतायत!.... स्टाईनबर्गची अनेक चित्रे मग खोटीच की.... जीएंनी त्यांचे अर्थातच न ऐकून माझ्यावर उपकार केले... )

पण एक नक्की चक्रव्‍यूह ही जीएंच्या वाङ्मयाच्या केंद्रस्थानी असणारी गोष्ट आहे , जशी ती कदाचित स्टाईनबर्ग यांच्या कलेच्या केंद्रस्थानी सुद्धा होती तशी.... 




Saul Steinberg: The Line (detail), 1959; a spread from Steinberg’s The Labyrinth

कलावंत: सॉल स्टाईनबर्ग, १९५९

१९७७



स्टाईनबर्ग हे वसंत सरवटे यांचे सर्वात आवडते कलावंत... स्टाईनबर्ग यांच्या कलेचा प्रभाव सरवटे यांच्या कलेवर सर्वात जास्त आहे....


No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.