Wednesday, April 17, 2019

साहित्यातील एक नायक जो त्याच्या जन्मदात्या पुस्तकापासून हळूहळू वेगळा होत गेलाय....GA, Nabokov and Don Quixote

 जी. ए. कुलकर्णी:
"... मी ज्यावेळी माझ्या शौर्याने दलितांचे रक्षण , सौंदर्याचे पूजन व सदाचाराचे आचरण करण्यासाठी माझ्या खेड्यातून बाहेर पडलो , त्यावेळी माझ्यात हीच मनःशांती होती आणि मी तर ठिकठिकाणी वेडा ठरलो !..."
(पृष्ठ २२६, 'यात्रिक', 'पिंगळावेळ', १९७७
 
Vladimir Nabokov, ‘Lectures on Don Quixote‘, 1984:
“We are confronted by an interesting phenomenon: a literary hero losing gradually contact with the book that bore him; leaving his fatherland, leaving his creator’s desk and roaming space after roaming Spain. In result, Don Quixote is greater today than he was in Cervantes’s womb. He has ridden for three hundred and fifty years through the jungles and tundras of human thought—and he has gained in vitality and stature. We do not laugh at him any longer. His blazon is pity, his banner is beauty. He stands for everything that is gentle, forlorn, pure, unselfish, and gallant. The parody has become a paragon.”

याचा मी केलेला अनुवाद :
"आपल्या पुढयात येती एक इंटरेस्टिंग कल्पना: साहित्यातील एक नायक जो त्याच्या जन्मदात्या पुस्तकापासून हळूहळू वेगळा होत गेलाय; त्याची पितृभूमी सोडून, त्याच्या निर्मात्याचे टेबल सोडून आणि फिरतोय अवकाशात, स्पेन फिरून झाल्यावर. त्याचा परिणाम असा की आज डॉन क्विकसोट (कीहोटे) सर्वांटिस यांच्या गर्भातून आला त्यापेक्षा मोठा आहे. गेले साडेतीनशे वर्षे तो मानवाच्या विचाराच्या जंगलातून, टुंड्रा प्रदेशांतून रपेट करतोय - आणि त्याचा जोम आणि उंची वाढली आहे. आपण त्याला आता हसत नाही. त्याच्या अंगरख्यावरचे सुचिन्ह आहे करुणा, त्याचा झेंडा आहे सौन्दर्य. जे जे सभ्य, परित्यक्त, निर्मळ , निःस्वार्थी, आणि स्त्रीदाक्षिण्यवादी आहे त्यासाठी तो उभा आहे. विडंबन एक उत्कृष्ठ वस्तू बनली आहे."

म्हणून जी ए  नाबाकोव्ह यांच्या सारखे डॉन कडे वळले आणि  हे  अविस्मरणीय वाक्य लिहले : ".... दलितांचे रक्षण, सौंदर्याचे पूजन व सदाचाराचे आचरण..."

... चांगला माणूस कसा असावा हे यापेक्षा चांगल्या शब्दात मांडताच येणार नाही....


No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.