Saturday, January 12, 2019

काढायचा राहून गेलेला स्वराज्यातील घोडेस्वार भालाईत.... Rembrandt, T S Shejwalkar and G A Kulkarni

John Berger, 'Portraits: John Berger on Artists', 2015: 
"... THE ESSENTIAL CHARACTER of oil painting has been obscured by an almost universal misreading of the relationship between its ‘tradition’ and its ‘masters’. Certain exceptional artists in exceptional circumstances broke free of the norms of the tradition and produced work that was diametrically opposed to its values: yet these artists are acclaimed as the tradition’s supreme representatives: a claim which is made easier by the fact that after their death, the tradition closed around their work, incorporating minor technical innovations, and continuing as though nothing of principle had been disturbed. This is why Rembrandt or Vermeer or Poussin or Chardin or Goya or Turner had no followers but only superficial imitators..... "

या वर्षी ऑक्टोबर रोजी रेम्ब्राँन्ट यांच्या जाण्याला ३५०वर्षे होणार आहेत. २०१९साल हे अधिकृतपणे रेम्ब्राँन्ट यांचे वर्ष आहे.

जीएंच्या रेम्ब्राँन्ट यांच्या बद्दलच्या दोन भाष्या कडे पहा:

"रेम्ब्राँन्टच्या चित्रांत छाया आणि प्रकाश यांना जे थोर वजन प्राप्त होते, ते कधी एकदा तरी आयुष्यात माझ्या शब्दांना लाभावे एवढीच माझी प्रार्थना आहे."

"... अद्यापही एखाद्या Rembrandt किंवा Vermeer सारख्या अद्वितीय चित्रकाराच्या कृतीची मी Tolerable copy करू शकतो, पण (काव्याप्रमाणेच) मला स्वतंत्र चित्रदृष्टी नाही. पण यामुळे झाले काय , तर एखाद्या मासिकात काव्याकडे ज्याप्रमाणे प्रथम लक्ष जाते, त्याप्रमाणेच चित्राकडे जाते...." 

जॉन बर्जर यांचे वरील अवतरण वाचून जीएंना Tolerable copyबाबत लाज वाटायचे काहीच कारण नाही. 

रेम्ब्राँन्ट यांच्या कलेचा जीएंच्या लेखनावर कसा परिणाम झाला असावा त्याचा एक अंदाज....

Sebastian Smee says : "....As with late Rembrandt, the paint is applied in ways that disrupt or interfere with the viewer’s easy access to the image. Something extra is conveyed—an awkwardness, but also a sense of deepening interest, thickening emotion, urgency...." (Prospect Magazine, 2012)

हेच जीएंच्या लेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे :  

the paint is applied in ways that disrupt or interfere with the viewer’s easy access to the image. Something extra is conveyed—an awkwardness, but also a sense of deepening interest, thickening emotion, urgency...

प्रतिमेंपर्यंत, कथेतील पात्रांपर्यंत, सहज पोचता येत नाही, थोडे जास्त सांगितले जाते- अवघडलेपणा, त्या बरोबरीने खोलावत जाणारा रस, गडद होणाऱ्या भावना, तत्परता... 

De Poolse ruiter, c.1655

कलाकार: रेम्ब्रांट (१६०६-१६६९)

सौजन्य: विकिपीडिया  
जॉन बर्जर या चित्रा बद्दल लिहतात:
 ".....It seemed to me – and it still does – a painting about leaving home.....
.... I love the painting of the Polish Rider as a child might, for it is the beginning of a story being told by an old man who has seen many things and never wants to go to bed.
I love the rider as a woman might: his nerve, his insolence, his vulnerability, the strength of his thighs. Liz is right. Many horses course through dreams here.

In 1939 units of Polish cavalry armed with swords charged against the tanks of the invading Panzer divisions. In the seventeenth century, the ‘Winged Horsemen’ were feared as the avenging angels of the eastern plains. Yet the horse means more than military prowess. Over the centuries Poles have been continually obliged to travel or emigrate. Across their land without natural frontiers the roads never end.

The equestrian habit is still sometimes visible in bodies and the way they move. The gesture of putting the right foot in a stirrup and hoicking the other leg over comes to my mind whilst sitting in a pizza bar in Warsaw watching men and women who have never in their lives mounted or even touched a horse, and who are drinking Pepsi-Cola.

I love the Polish Rider’s horse as a horseman who has lost his mount and has been given another might. The gift horse is a bit long in the tooth – the Poles call such a nag a szkapa – but he’s an animal whose loyalty has been proven.
Finally I love the landscape’s invitation, wherever it may lead."

मला हे चित्र पाहून नेहमी एका गोष्टीची  नेहमी खंत वाटते...असे चित्र एखाद्या मराठी भालाईताचे का नाही... १७वे शतक हा महाराष्ट्रातील स्वराज्याच्या उदयाचा काळ...

 त्र्यं शं शेजवलकर मराठी घोडदळातील स्वाराबद्दल लिहतात :
"...मराठयांचे वाहन शिडशिडीत पण चपळ घोडी असे. पाठलाग झाल्यास हा भालाईत स्वार पळतानां आपला भाला मागे रोखून स्वतःवरील वा घोड्यावरील वार चुकवू शकत असे व मध्ये संधी मिळाली की, आपला घोडा वळवूंन व शत्रूवर हल्ला चढवून त्याला तो त्याच्या घोड्यावरून जमिनीवर पाडी. भाल्याला फडफडणारे रंगीत निशाणही अडकविलेले असे; त्यामुळे उन्हांत चमकणाऱ्या भाल्याचे टोंक व त्याखाली धावताना फडफडणारे निशाण यांची दुरून मोठी शोभा वाटे. मराठ्यांचे घोडे व हत्ती हौसेने फारच शृंगारलेले असत.... "
(पृष्ठ : २५५, 'पानिपत १७६१', १९६१/१९९८)

शेजवलकरांच्या भाषेतील कवीत्व चित्रात बंदिस्त करायला इथे रेम्ब्राँन्ट होते कुठे?

आणखी एक: "It seemed to me – and it still does – a painting about leaving home"... या वाक्याने जीएंची आठवण पुन्हा एकदा होते...

पुस्ती (जानेवारी १३ २०१९):
 (Dr. B K Apte, "Maratha Wall Paintings (Wai, Menavali, Satara, Pune)", 1988, Introduction, Page : IX)

डॉक्टर आपटे म्हणतात की शिवाजी राजांच्या पाच (उपलब्ध) पोर्ट्रेट पैकी एकही मराठी कलावंताचे नाही... पण रेम्ब्रांट यांच्या डच देशबांधवाचे आहे.... 

द ग गोडसेंचे लिहतात:
".... शिवाजी राजांच्या अस्सल रूपाचा दाखला एका उत्साही डच चित्रकाराच्या समयसूचकतेमुळे आज उपलब्ध आहे. शिवाजी राजांना नकळत , पण प्रत्यक्ष ते समोर उभे असताना ज्या अनामिक चित्रकाराने समक्ष टिपलेले त्यांचे व्यक्तिचित्र हेच आज एकमेव अस्सल आहे. 
शिवाजी राजांनी दोन वेळा सुरतेवर चढाई केली. अर्थात कोणत्या तरी चढाईच्या वेळीच हे चित्र टिपले गेले. ....
... वखारीतून शिवाजी राजे शहरातील धुमाकूळ बघत असतानाच तेथे असलेल्या चित्रकाराने शिवाजी राजांचे रेखाचित्र त्यांना नकळत , जलदीने एका कागदावर टिपले. आज कॅमेऱ्याने टिपावे त्याप्रमाणे! असे उस्फुर्त , जलदीने ते टिपले गेले म्हणूनच ते रेखाटन आजही ताजे, टवटवीत वाटते...."
(पृष्ठ २००-२०१, समन्दे तलाश, १९८१)

2 comments:

  1. नमस्कार अनिरुद्ध कुलकर्णी,
    मराठी लोकांपैकी कोणीच कसे महाराजांचे किंवा त्यांचे समकालीन राजकीय किंवा मान्यवर व्यक्तिंचे चित्र काढू शकले नाहीत...
    पोथ्यातून काही दिसतात. पण तीही इतकी ढोबळ आणि बटबटीत असतात की सध्याच्या बालबोध विद्यार्थी देखील त्यापेक्षा जास्त सुबकतेने त्या व्यक्तिचे यथार्थ चित्र काढू शकेल...
    संपर्कात राहायला आवडेल.
    विग कमांडर शशिकांत ओक. पुणे. 9881901049

    ReplyDelete
  2. Thanks for your comment Wing Commander Oak. I will get in touch with you. best wishes,

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.