Today January 3 2018 is my mother's 12th death anniversary
जी ए कुलकर्णी, ऑर्फियस (१९७३), पिंगळावेळ, १९७७ :
Priam the king of Troy:
हॉफेर-बाईंच्या पागोट्यावरील माशी पहा...त्या उत्कृष्टपणे चितारलेल्या माशीबद्दल असं म्हटल जात: "The superbly detailed black fly that crawls across this
woman’s white headdress is both a proof of the unknown German artist’s skill
and a sinister suggestion of mortality and decay."
उजवीकडचा माझ्या आईचा फोटो, त्यावेळच्या एका प्रसिद्ध (आणि महागड्या), लक्ष्मी रोड, पुणे येथील , फोटो स्टुडिओत काढला आहे. माझ्या वडिलांनी त्यांना अजिबात न परवडणारे पैसे त्यासाठी खर्च केले होते. आईला केसात फुल घालून यायला फोटोग्राफरनी सुचवले होते. ते दोघे त्यावेळी, प्रेमविवाहानंतर नुकतेच, जवळजवळ कफल्लक होते. तिच्या गळ्यातले मणिमंगळसूत्र पहा. तेवढा एकच दागिना तिच्याकडे होता.
त्या फोटोचे खूप कौतुक आजपर्यंत मी बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे. मी ऐकल आहे की फोटोस्टुडिओत काही आठवडे तो 'display' वर सुद्धा होता.
डावीकडील १४७० सालचे, सुन्न करणारे, 'पोर्ट्रेट ऑफ ए वूमन ऑफ दि हॉफेर फॅमिली' चित्र २०१७मध्ये पाहिल्यावर वाटले, मी ती आईच्या फोटोतील माशी आई जाईपर्यंत जणू पहातच नव्हतो...
जी ए कुलकर्णी, ऑर्फियस (१९७३), पिंगळावेळ, १९७७ :
"... उलट
असे पहा, प्रत्येक
सुंदर वस्तू संपणार किंवा
तू स्वतः नाहीसा
होणार हे
जाणवताच तू
जास्त उत्कटपणाने, हावरेपणाने
तिचा भोग घ्यायला
हवास , तुझा प्रवास
अगदी तात्पुरता आहे
आणि या वाटेने पुन्हा
कधी येण्याची तुला संधी मिळणार नाही हे
एकदा हाडात रुजले
, की एखादे रानफुल देखील स्वतःच्या गूढ
, अव्दितीय सौन्दर्याने
तुला भारून टाकील
..."
Priam the king of Troy:
"Only we humans can know, endowed as we are with mortality,
but also with consciousness, what it is to be aware each day of the fading in
us of freshness and youth; the falling away, as the muscles grow slack in our
arms, the thigh grows hollow and the sight dims, of whatever manly vigor we
were once endowed with. Well, all that happens. It is what it means to be a man
and mortal."
on the left, 'Portrait of a Woman of the Hofer Family', ca 1470
Artist: Unknown
on the right, my mother c1957
उजवीकडचा माझ्या आईचा फोटो, त्यावेळच्या एका प्रसिद्ध (आणि महागड्या), लक्ष्मी रोड, पुणे येथील , फोटो स्टुडिओत काढला आहे. माझ्या वडिलांनी त्यांना अजिबात न परवडणारे पैसे त्यासाठी खर्च केले होते. आईला केसात फुल घालून यायला फोटोग्राफरनी सुचवले होते. ते दोघे त्यावेळी, प्रेमविवाहानंतर नुकतेच, जवळजवळ कफल्लक होते. तिच्या गळ्यातले मणिमंगळसूत्र पहा. तेवढा एकच दागिना तिच्याकडे होता.
त्या फोटोचे खूप कौतुक आजपर्यंत मी बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे. मी ऐकल आहे की फोटोस्टुडिओत काही आठवडे तो 'display' वर सुद्धा होता.
डावीकडील १४७० सालचे, सुन्न करणारे, 'पोर्ट्रेट ऑफ ए वूमन ऑफ दि हॉफेर फॅमिली' चित्र २०१७मध्ये पाहिल्यावर वाटले, मी ती आईच्या फोटोतील माशी आई जाईपर्यंत जणू पहातच नव्हतो...
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.